Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग | National Commission For Protection Of Child Rights

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग National Commission For Protection Of Child Rights

राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग स्थापना - राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना बालहक्क संरक्षण आयोग अधिनियम, २००५ अंतर्गत ५ मार्च २००७ रोजी करण्यात आली.

राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाचे प्रथम अध्यक्ष - शांती सिन्हा

बालकांच्या घटनात्मक कायदेशीर हक्कांचे संरक्षण अंमलबजावणी करणे. तसेच बालकांविषयक धोरणांची व कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणे हे आयोगाचे मुख्य कार्य आहे.

राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग (National Commission for Protection of Child Rights-(NCPCR) ही एक वैधानिक संस्था आहे.



 NCPCR आयोगाची रचना

(१) आयोगामध्ये एक अध्यक्ष व ६ सदस्य असतात.

(२) ६ सदस्यांपैकी कमीत कमी २ महिला सदस्य असल्या पाहिजे.

(३) बालकल्याण क्षेत्रात मौत्रिक योगदान दिलेल्या व्यक्तीची अध्यक्षपदी नेमणूक जाते.

(४) ६ सदस्य हे शिक्षण, बालआरोग्य, समाजकार्य क्षेत्रातील नेमले जातात.

नेमणूक - केंद्र सरकारद्वारे, मंत्री MWCD यांचे अध्यक्षतेखालील 3 सदस्यीय समितीच्या शिफारशीने केली जाते. 


राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाचे मुख्यालय दिल्ली येथे आहे. 


NCPCR full form - National Commission for Protection of Child Rights

NCPCR Portal link - Click Here



राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाची कार्ये

1) बालहक्क संरक्षणावर परिणाम करणाऱ्या कायद्यांचे व सुरक्षा उपायांचे परीक्षण व प्रभावी अंमलबजावणीसाठी सल्ला देणे.

(2) सुरक्षा उपायांबाबत वार्षिक किंवा सांगेल त्या वेळी अहवाल केंद्र सरकारला सादर करणे.

(3) बालहक्क भंगाची चौकशी करून कारवाई करण्याचा सल्ला देणे.

(4) अन्यायग्रस्त बालकांना बाल हक्कांपासून वंचित ठेवणाऱ्या घटकांचे परीक्षण करणे व उपाययोजना सुचविणे.

(5) विशेष काळजीची गरज असणाऱ्या मुलांच्या प्रकरणात लक्ष घालून योग्य उपाययोजना सुचविणे. 

(6) आंतरराष्ट्रीय करार व साधनांचा अभ्यास करून आणि धोरण व कार्यक्रमाचे पुनर्विलोकन करून चांगल्या अंमलबजावणीसाठी उपाययोजना सुचविणे.

(7) बालहक्काच्या क्षेत्रात संशोधन करणे.

(8) समाजात बालहक्क साक्षरता पसरवणे व जागृती करणे. 

(9) बालगृहे व बालसुधारगृहांची पाहणी करणे, सुधारणा सुचविणे.

(10) बालकांच्या तक्रारीबाबत चौकशी करून स्वताहून कृती करणे.

केंद्रप्रमुख भरती घटक निहाय Video मार्गदर्शन / Notes - Click Here

केंद्रप्रमुख भरती अभ्यासक्रम PDF व प्रश्नपत्रिका स्वरूप - Click Here

केंद्रप्रमुख भरती पात्रता निकष पहा - Click Here

केंद्रप्रमुख भरती स्व हस्तलिखित प्रतिज्ञापत्र PDF - Click Here

Post a Comment

0 Comments

close