Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Udise plus 2023-24 Update | सन 2023-24 यु-डायस प्लस प्रणाली मध्ये Dropbox मधील विद्यार्थ्यांची माहिती अद्यावत करणेबाबत.

सन 2023-24 यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये शाळा, विद्यार्थी व शिक्षकांची माहिती नोंदविण्यात आलेली आहे. सन २०२३-२४ U-DISE प्रणाली मध्ये Dropbox मधील विद्यार्थ्यांची माहिती अद्यावत करणेबाबत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. 


Udise Plus Update - 28 February 2024

सन २०२३-२४ U-DISE + प्रणाली मध्ये Dropbox मधील विदयार्थ्यांची माहिती अद्यावत करण्याच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडून सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

दि २८/२/२०२४ रोजीच्या U-DISE+ प्रणाली मधील Drop box अहवालानुसार राज्यामध्ये एकूण १२,४०,६५१ एवढे विदयार्थी Dropbox मध्ये दिसून येत आहेत, म्हणजेच एकूण विदयार्थ्यांच्या तुलनेमध्ये ५.८४% विदयार्थी Dropbox मध्ये आहेत. यामधील बरेच विदयार्थी पोलिटेक्निक, व्यवसायिक शिक्षण, आयटीआय, डिपलोमा प्रवेश घेलेले आहेत, दुबार नोंदणी झालेली आहे त्यामुळे ते Dropbox मध्ये असल्याबाबत शाळांकडून सांगण्यात आले आहे. Dropbox मधील विदयार्थ्यांचा शोध घेऊन माहिती U-DISE+ प्रणाली मध्ये अपटेड करण्यासाठी शाळा, तालुका, जिल्हास्तरावर सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. सोबत दिलेल्या तक्त्यानुसार सर्व विदयार्थ्यांचा शोध घेऊन माहिती अपडेट करण्यासाठी VC घेवून सुचना देण्यात याव्यात. जेणे करुन जिल्ह्यातील एक ही विद्यार्थी Dropbox/Drop out/Out of School राहणार नाही याची नोंद घेण्यात यावी. याबाबत आपल्या स्तरावरुन शाळांना Drop box मधील माहिती तात्काळ अपटेड करण्यात यावी आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास ई-मेल द्वारे पाठविण्यात यावा. शासन परिपत्रक 28 February - Click Here

Usise plus update - 24 January 2024

राज्यातील सर्व शाळांनी सन २०२३-२४ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये शाळा, शिक्षक व विद्यार्थी पोर्टलचे काम १००% करणेबाबत वारंवार कळविण्यात आले होते.  
याबाबत केंद्र शासनाकडूनही वारंवार पाठपुरावा केला जात आहे. तरी आपल्या जिल्हयातील संबंधित सर्व माध्यम सर्व व्यवस्थापनाच्या मुख्याध्यापकांकडून उर्वरित शिक्षक व विद्यार्थी यांचे Adhar Validation चे काम दि.३१/०१/२०२४ पर्यंत पूर्ण करून घ्यावे. 


Udise plus update -28 December 2023


उपरोक्त विषयाबाचत आपल्या वारंवार सूचना देऊन शंभर टक्के शाळांमधील १०० टक्के विद्यार्थ्यांची युद्मयस प्रणालीमधील संबंधित सर्व मुद्दे पडताळणी करुन यु-डायस प्लस प्रणालीवर वर्ग करण्याची कार्यवाही दि.३१.१२.२०२३ पर्यंत करणेबाबत निर्देश देण्यात आलेले होते.

यु-डायस प्रणालीवरील १,०८,३२६ शाळांमधील २,०८,७६,६२५ विद्यार्थ्यांपैकी २,०३,७७,७३७ विद्याथ्यांची माहिती यु- डायस प्लस प्रणालीमध्ये वर्ग करण्यात आलेली असून अद्यापही ४,९८,८८८ विद्याथ्यांची माहिती वर्ग करण्याची कार्यवाही प्रलंबित आहे. यु-डायस प्लस प्रणालीवरील शासकीय ७५,१०३, खाजगी अनुदानित १,५५,४२३, खाजगी विनाअनुदानित ३८,७८५, स्वयंअर्थसहव्यित २,२३,४४० व अनाधिकृत ६,१३७ विद्यार्थ्यांची माहिती यु-डायस प्लस प्रणालीवर वर्ग करण्याची कारवाई प्रलंबित आहे.

यु-डायस प्रणालीवरील माहिती तपासून यु-डायस प्लस प्रणालीमध्ये वर्ग करण्याची कार्यवाही विहित मुदतीत म्हणजेच दि.३१.१२.२०२३ पर्यंत १०० टक्के न झाल्यास राज्याच्या प्राप्त होणाऱ्या निधीवर परिणाम होणार आहे.

तरी, आपल्या सनियंत्रणाखाली असलेल्या शाळांची माहिती १०० टक्के वर्ग करण्याची कार्यवाही दि.३१.१२.२०२३ पूर्वी पूर्ण करणे अनिवार्य असल्याने विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी ऑनलाईन व्ही.सी. व्दारे दररोज क्षेत्रीयस्तरावर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा दररोज आढावा घेऊन कार्यवाहीचा संख्यात्मक अहवाल संचालनालयास दररोज सादर करावा. तसेच शिक्षणाधिकारी यांनी क्षेत्रीयस्तरावर दररोज झालेल्या कामाचा ऑनलाईन आढावा घेऊन सदर कामकाज तत्परतेने पूर्ण करण्याची कार्यवाही करण्याबाबत सूचित करावे.

यु-डायस प्रणालीवरील माहिती यु-डायस प्लस प्रणालीवर १०० टक्के वर्ग करण्याची कार्यवाही दि.३१.१२.२०२३ नंतर करता येणार नसल्याने सदर काम पूर्ण करण्याच्या अनुषंगाने दि.२९.१२.२०२३ या कार्यालयीन दिवसाबरोबर दि.३०.१२.२०२२ व दि.३१.१२.२०२३ या अनुक्रमे शनिवार व रविवार या सुट्टी दिवशीचे नियोजन करुन कार्यवाही पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी. आपल्या विभागातील कार्यक्षेत्रामधील यु-डायस प्रणालीवरील माहिती यु-डायस प्लस प्रणालीवर वर्ग करण्याची १०० टक्के कार्यवाही न झाल्यास शासन निर्देशानुसार संबंधितांविरुध्द जबाबदारी निश्चित करण्यात येवून प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे याची गांभिर्याने नोंद घ्यावी.


Previous update
30 November update

राज्यातील मान्यता प्राप्त सर्व शाळांची माहिती दि. ३१ ऑक्टोबर, २०२३ रोजी पर्यंत भरून अंतिम करण्याकरिता कळविण्यात आले आहे परंतू दि. २२ ऑक्टोबर, २०२३ रोजीच्या यु-डायस प्लस प्रणालीमधील अहवालानुसार ८८.०८% शाळांची भौतिक माहिती अद्ययावत केलेली आहे, ७६.२७% शाळांमधील शिक्षकांची माहिती अंतिम केलेली आहे, ७१.७०% विद्यार्थ्यांची माहिती अंतिम केलेली आहे. २५,७८८ शाळांनी शिक्षकांची अद्यापपर्यंत माहीती भरण्याकरिता सुरुवातही केली नाही, तर १२,९४७ शाळांनी भौतिक माहिती भरणेकरिता चालढकल करित असल्याकारणाने माहिती पूर्ण न झाल्यामुळे राज्य व केंद्र शासनास सन २०२४-२५ व सन २०२५-२६ समग्र शिक्षा, स्टार्स व PM Shri योजनांचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक सादर करण्यासाठी विलंब होत आहे.


याबाबत आपणास कळविण्यात येते की, जिल्ह्यातील शासकीय व अनुदानित शाळांना दि. ३० नोव्हेंबर, २०२३ पर्यंत यु-डायस प्लस प्रणालीमध्ये माहिती अंतिम करण्याकरिता कळविण्यात यावे. शाळांनी माहिती अद्ययावत न केल्यास सदर शाळांमधील शिक्षकांचे वेतन अदा करण्यात येवू नये.


जिल्हा व तालुका स्तरावरून वेतन पथकांनी सदर शाळांकडून यु- डायस प्लस प्रणालीमध्ये शाळा, विद्यार्थी व शिक्षक यांची सर्व माहिती अद्ययावत केल्याचे मुख्याध्यापक यांचेकडून प्रमाणित करून घ्यावे, त्यानंतरच वेतन अदा करण्यासाठी आदेशित करावे. माहिती अद्ययावत न झाल्यास सदर शाळेमधील विद्यार्थी शासनाकडून देण्यात येणाऱ्या लाभापासून (उदा. मोफत गणवेश, पाठयपुस्तके, शैक्षणिक सोयी-सुविधा, स्कॉलरशिप इ.) वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.


माहिती भरतांना तांत्रिक अडचण येत असल्यास तालुका, जिल्हा व राज्य स्तरावरील टेक्नोसेव्ही शिक्षक, एम.आय.एस. कोऑर्डीनेटर व संगणक प्रोग्रामर यांचेशी संपर्क करण्यात यावा.

Udise plus ऑनलाईन शाळा, विद्यार्थी व शिक्षक माहिती नोंदविणेबाबत शासन परिपत्रक डाउनलोड करा. - Click Here

Post a Comment

0 Comments

close