विद्यार्थ्यांचे पोषण सुधारण्यासाठी आदिवासी क्षेत्रातील शाळांमध्ये आता बाजरी, ज्वारी व नाचणीचे चॉकलेट वितरित केले जात आहेत. राज्यातील पाच जिल्ह्यांत हा उपक्रम राबविला जात असून त्यात खान्देशातील तिन्ही जिल्ह्यांचा समावेश आहे.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतील नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. राज्यातील जळगाव, धाराशिव, नांदेड, नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील पात्र शाळांमधील आदिवासी आणि आकांक्षित क्षेत्रात पोषक तत्त्वांचा पुरवठा करण्याकरिता त्यांचे वाटप केले जात आहे.
त्या अंतर्गत या उपक्रमात नाचणीसह चॉकलेट पौष्टिक बार, ज्वारीसह मिश्र फळ बाजरी पौष्टिक बार आणि पीनट बटर बाजरी पौष्टिक बार बाजरी असे तीन प्रकारचे चॉकलेट वाटप करण्यात येत आहेत. त्यासाठी वरील जिल्ह्यातील पात्र शाळांची संख्या आणि इतर संबंधित माहिती जिल्ह्यांमधून आधीच गोळा करण्यात आली होती. रोज चॉकलेट बार, तसेच विविध धान्यांचे बार विद्यार्थ्यांना मिळत असल्यामुळे विद्यार्थीही खूष आहेत.
जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांना पूरक आहार अंतर्गत विविध प्रकारचे पदार्थ देणेबाबत शासन परिपत्रक
0 Comments