Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार | पुरस्काराच्या अटी व शर्थी, निकष, प्रस्ताव, मूल्यांकन, निवड प्रक्रिया

विद्यापीठ / पारंपारिक व अभियांत्रिक महाविद्यालये /तंत्रनिकेतने आणि चित्रकला, उपयोजित कला येथील शिक्षकांना देण्यात येणारे आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार चे नांव डॉ. जे.पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार असे करणेबाबत व सदर पुरस्काराच्या अटी, निकष, निवड प्रक्रिया कार्यपद्धतीबाबत शासन निर्णय जाहीर. 


महाविद्यालयीन शिक्षण, विद्यापीठ शिक्षण, अभियांत्रिकी शिक्षण, चित्रकला / उपयोजित कला हया क्षेत्रात अध्ययन / अध्यापनासह शैक्षणिक क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या शिक्षकांचा यथोचित गौरव व्हावा, तसेच त्यांच्या कार्याची प्रेरणा इतर शिक्षकांना मिळावी या हेतूने राज्यातील शिक्षकांचा आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार देऊन, शासनाकडून सन्मान करण्यात येत होता.


कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडी, ता. आजरा येथे 05 सप्टेंबर, 1907 रोजी जन्मलेल्या डॉ.जे.पी. नाईक यांच्या शैक्षणिक कार्याची दखल भारत सरकार बरोबरच अनेक देश आणि युनेस्कोनेदेखील घेतली आहे. त्यांच्या या योगदानाबद्दलची कृतज्ञ आठवण म्हणून महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत दरवर्षी ०५ सप्टेंबर शिक्षक दिनी बहुमोल शैक्षणिक योगदान देणारे प्राचार्य / शिक्षक यांना देण्यात येणारा आदर्श राज्य शिक्षक पुरस्काराचे नाव बदलण्यात येऊन " डॉ. जे.पी नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार" या नावाने पुरस्कार देण्यात येणार आहे.


तसेच, आदर्श राज्य शिक्षक पुरस्काराकरीता शिक्षकांची होणारी निवड अधिक पारदर्शक आणि गुणवत्तापूर्वक व्हावी, खऱ्या अर्थाने समर्पित भावनेने शैक्षणिक क्षेत्रात अध्ययन अध्यापन करुन, मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांची निवड उक्त पुरस्काराकरीता व्हावी या करीता निवड प्रक्रियेच्या संदर्भात शासन निर्णय, दिनांक 26 डिसेंबर, 2012 अधिक्रमित करण्यात येत असून, पुरस्काराचे निकष आणि कार्यपद्धती मध्ये सुधारणा करुन, सुधारित शासन निर्णय 05 सप्टेंबर 2025 प्रसिद्ध करण्यात येत आहे.


महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत दरवर्षी 05 सप्टेंबर शिक्षक दिनी बहुमोल शैक्षणिक योगदान देणारे प्राचार्य / शिक्षक यांना देण्यात येणारा आदर्श राज्य शिक्षक पुरस्काराचे नाव "डॉ. जे.पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार" असे करण्यात येत आहे.


डॉ. जे.पी नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कारांची एकूण संख्या 31 राहील आणि त्यार्च विगतवारी खालीलप्रमाणे राहील. 




डॉ. जे.पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्काराकरीता प्राथमिक अटी:

खालील अटी पूर्ण करणारे प्राचार्य/शिक्षक, डॉ. जे.पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कारासाठी अर्ज करण्यास / प्रस्ताव पाठविण्यास पात्र राहतील.

(एक) शासनाने विहीत केलेल्या सेवाप्रवेश नियमानुसार नियुक्ती झालेले शिक्षक.

(दोन) शिक्षकाने नियमित वर्ग अध्यापनाचे कार्य केलेले असावे. अध्यापनाव्यतिरिक्त अन्य क्षेत्रात प्रतिनियुक्तीवर गेलेले प्रतिनियुक्तीवर आहेत असे शिक्षक पुरस्कारासाठी अपात्र राहतील. याबाबतचे प्रमाणपत्र संबंधित संस्थेचे प्राचार्य / अधिष्ठाता / संचालक देतील.

(तीन) शिक्षकाने कमीत कमी १५ वर्षांची अध्यापन सेवा केलेली असावी, याबाबतचे प्रमाणपत्र संबंधित संस्थेचे प्राचार्य / अधिष्ठाता / संचालक देतील,

(चार) डॉ. जे.पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक, पुनःश्च अशा पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत. तसेच सेवानिवृत्त झालेले शिक्षक पात्र राहणार नाहीत. याबाबतचे प्रमाणपत्र संबंधित संस्थेचे प्राचार्य / अधिष्ठाता / संचालक देतील.

(पाच) विभागीय चौकशीत दोषी आढळलेले, विभागीय चौकशी प्रलंबित असलेले शिक्षक पुरस्कारासाठी अपात्र राहतील, याबाबतचे प्रमाणपत्र संबंधित संस्थेचे प्राचार्य / अधिष्ठाता संचालक देतील.

(सहा) शिक्षकाविरुद्ध फौजदारी कारवाईत शिक्षा झालेली नसावी, तसेच पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल नसावा. तसे प्रतिज्ञापत्र संबंधित शिक्षक देतील.

(सात) शिक्षक खाजगी शिकवणी करीत नसावा, तसे प्रतिज्ञापत्र संबंधित शिक्षक देतील.

(आठ) प्राथमिक अटीचा भंग झाल्यास, पुरस्कार व त्याअनुषंगिक सोयी-सुविधा परत घेण्यात येतील व संबंधितांवर उचित कारवाई करण्यात येईल.

(नऊ) प्राचार्यांच्या बाबतीत अर्ज करतेवेळी प्राचार्य उमेदवार यांची प्राचार्य पदावरील किमान सेवा ३ वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे.



डॉ. जे.पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कारार्थी निवड करण्याकरीता निकष 

परिच्छेद क्र.०४ येथे नमूद केलेल्या प्राथमिक अटी पूर्ण करणाऱ्या प्राचार्य / शिक्षकांचेच प्रस्ताव, डॉ. जे.पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार निवडीसाठी विचारात घेण्यात येतील. त्याकरीता निकष खालीलप्रमाणे राहतील -

(अ) प्राचार्य निवडीकरीता निकष, मुल्याकंन व गुणांकन.

(ब) महाविद्यालये/विद्यापीठ / अध्यापक महाविद्यालये/विज्ञान संस्था / न्याय सहाय्य विज्ञान संस्था /अभियांत्रिकी महाविद्यालये / औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालये/ तंत्रनिकेतने येथील शिक्षकांकरीता डॉ. जे.पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कारासाठी निकष :

क) चित्रकला / उपयोजित कला महाविद्यालयातील शिक्षकांकरीता डॉ. जे.पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कारासाठी निकष :


प्राथमिक अटी व निकष यांचे पालन करणाऱ्या प्राचार्य / शिक्षकांनाच डॉ. जे.पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार देण्यात येतील. एखाद्या वर्षी प्राथमिक अटी व निकषांची पूर्तता होत नसल्यास, त्या वर्षी त्या प्रवर्गात पुरस्कार दिला जाणार नाही.


डॉ. जे.पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव तयार करण्याची पद्धती.

(एक) संचालक व विद्यापीठांचे कुलगुरु सदर पुरस्कार निवडीसाठी महाराष्ट्र राज्यातील वर्तमानपत्रात जाहिरात देऊन व त्यांच्या अधिनस्त सर्व क्षेत्रीय कार्यालयाकरीता परिपत्रक निर्गमित करुन, व्यापक प्रसिद्धी देतील आणि पुरस्कारासाठी अर्ज मागवतील.

(दोन) पुरस्कार इच्छुक प्राचार्य / शिक्षक अथवा एखाद्या शिक्षकाकरीता शिफारस करणाऱ्या संस्था त्यांचे प्रस्ताव, शासन निर्णयात विहित केलेल्या कार्यपद्धतीने तयार करुन, असे शिक्षक जेथे कार्यरत आहेत त्या शिक्षण संस्था प्रमुखांच्यामार्फत (प्राचार्य / संचालक इत्यादि) संबंधित विद्यापीठ आणि संचालक यांच्याकडे सादर करतील. तसेच, राज्यातील सर्व शासकीय पारंपारिक महाविद्यालये / अध्यापक महाविद्यालये / शासकीय शिक्षण संस्था येथील शिक्षकांचे प्रस्ताव, असे शिक्षक जेथे कार्यरत आहेत त्या शिक्षण संस्था प्रमुखांच्यामार्फत (प्राचार्य / संचालक इत्यादी) संबंधित विद्यापीठाकडे पाठवतील.

(तीन) प्रत्येक प्रस्ताव हा शिक्षकनिहाय स्वतंत्र राहील. प्रस्तावाच्या सुरुवातीची पृष्ठे, शिक्षकाची वैयक्तिक माहिती (उदा. शिक्षकाचे नाव, संस्थेचे नाव, जन्मतारीख (वय), शैक्षणिक पात्रता, प्रथम नियुक्तीचा दिनांक, सेवेचा कालावधी इत्यादि बाबतच्या कागदपत्राची राहतील. प्रस्तावात त्यानंतरची पृष्ठे शिक्षकाने प्राथमिक अटी पूर्ण केल्याची प्रमाणपत्रासह क्रमवार कागदपत्रे असतील. प्रस्तावातील त्यानंतरची पृष्ठे त्या-त्या पुरस्काराकरीता जे निकष विहीत केलेले आहेत, त्याची पूर्तता आणि त्याबाबतची प्रमाणित कागदपत्राची असतील.

(चार) प्रत्येक संचालनालय आणि प्रत्येक विद्यापीठ यांच्याकडे प्राप्त होणारे सर्व प्रस्ताव, संचालक आणि विद्यापीठाचे कुलगुरु त्यांच्यास्तरावर गठीत करण्यात आलेल्या छाननी समितीपुढे ठेवतील व छाननी समिती तपासून, मुल्यांकन करील. विद्यापीठाकडे खालील तीन प्रकारचे प्रस्ताव येतील.

(१) प्राचार्यांचे प्रस्ताव,

(२) विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पारंपारिक महाविद्यालये (अनुदानित, विनाअनुदानित आणि खाजगी)

(३) विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील शासकीय महाविद्यालये, अध्यापक महाविद्यालये आणि शासकीय शिक्षण संस्था येथील शिक्षकांचे प्रस्ताव.

असे तिन्ही प्रकारचे प्रस्ताव, संबंधित कुलगुरु त्यांच्या स्तरावर गठित झालेल्या छाननी समितीपुढे स्वतंत्रपणे ठेऊन, स्वतंत्रपणे तपासून, मुल्यांकन करतील.


डॉ. जे.पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार छाननी समितीची रचना:-

संचालक व विद्यापीठ स्तरावर छाननी समिती खालीलप्रमाणे राहील. छाननी समिती गठीत करण्याची कार्यवाही संचालक आणि विद्यापीठ प्रत्येक वर्षी करतील.

अ) प्राचार्य पुरस्कार प्रस्तावांची छाननी करण्यासाठी विद्यापीठ स्तरावरील छाननी समितीः-

आ) शिक्षक पुरस्कार प्रस्तावांची विद्यापीठ स्तरावरील छाननी समितीः

इ) तंत्र शिक्षण संचालनालय, छाननी समिती :-

ई) कला संचालनालय, छाननी समिती::-




डॉ. जे.पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार छाननी समितीचे कार्य आणि जबाबदारी:-

या शासन निर्णयात विहीत करुन दिलेल्या प्राथमिक अटी प्रत्येक प्रस्तावात पूर्ण झालेल्या आहेत याची तपासणी छाननी समिती करील. प्राथमिक अटी पूर्ण करणारे प्रस्ताव, असा प्रस्ताव ज्या पुरस्काराकरीता असेल, त्या पुरस्काराकरीता विहीत केलेल्या निकषांकरीता छाननी समिती विचारात घेईल. पुरस्कारासाठी निश्चित केलेले निकष, प्रस्तावात पूर्ण झालेले आहेत याची तपासणी छाननी समिती करील आणि सत्यता तपासून, या शासन निर्णयात विहित केलेल्या पद्धतीने प्रत्येक निकषाचे गुणांकन करुन, पुरस्काराची गुणवत्ता यादी छाननी समिती तयार करील. विद्यापीठाकडे प्राप्त होणारे, शासकीय पारंपारिक महाविद्यालये, अध्यापक महाविद्यालये आणि शासकीय शैक्षणिक संस्था येथील शिक्षकांच्या प्रस्तावांची गुणवत्ता यादी विद्यापीठ स्तरावरील छाननी समिती स्वतंत्रपणे करील. छाननी समितीने तयार केलेली पुरस्कारनिहाय गुणवत्ता यादी आणि छाननी समितीच्या बैठकीचे कार्यवृत्त याची प्रत्येकी एक प्रत प्रत्येक वैयक्तिक प्रस्तावाच्या नस्तीत छाननी समिती ठेवील. छाननी करुन, गुणांकन केलेल्या प्रत्येक प्रस्तावाच्या दहा प्रती, राज्य निवडसमिती पुढे ठेवण्याकरिता, प्रत्येक वर्षी शासनाकडे, छाननी समिती सादर करील. प्रत्येक प्रस्ताव Spiral Binding स्वरुपात राहील. दुसरी प्रत संचालक / कुलगुरु त्यांच्या दफ्तरी जतन करुन ठेवतील.


वरीलप्रमाणे, विहीत केलेल्या निकषानुसार पुरस्कारासाठी पात्र असणाऱ्या प्रस्तावांची छाननी समितीव्दारे छाननी झाल्यानंतर, सदरहू प्रस्ताव अंतिम केंद्रीय छाननी समितीकडे सादर करतील


डॉ. जे.पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार अंतिम केंद्रीय छाननी समितीः-


डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार्थांची अंतिम निवड करण्याकरीता राज्य निवड समिती रचना:-

अंतिम केंद्रीय छाननी समितीद्वारे छाननी केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने डॉ. जे.पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्काररथांची अंतिम निवड करण्यासाठी खालीलप्रमाणे राज्यस्तरीय निवड समिती राहील-


डॉ. जे.पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार वेळापत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल.


पुरस्काराचे स्वरुप पुरस्कार प्राप्त करणाऱ्या प्रत्येक पुरस्ककारर्थीना, रु.२५,०००/-रोख, शाल, श्रीफळ आणि राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र असे राहील.


यासाठी होणारा खर्च खालील लेखाशिर्षाखाली मंजूर तरतूदीतून भागविण्यात यावा.

10/11लेखाशिर्ष- मागणी क्र. डब्ल्यू-४, २२०५- कला व संस्कृती, ८०० इतर खर्च (०१) समित्या व समारंभ (०१) (०१) समित्या व समारंभ-०५ बक्षिसे (२२०५ ०४५८)"


सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक २०२५०९०५१६२०५७६८०८ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करण्यात येत आहे.

शासन निर्णय डाउनलोड करा. Click Here

Post a Comment

0 Comments

close