Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जनगणना 2027 | पहिला टप्पा - घरयादी व‌ घरगणना | विचारले जाणारे 33 प्रश्न व द्यावयाची उत्तरे | जनगणना 2027 वेबसाईट https://se.census.gov.in

जनगणना 2027 | भारताची जनगणना दोन टप्प्यांत केली जाईल : (i) घरांची यादी आणि गृहनिर्माण जनगणना - 16 मे ते 14 जून, 2026 आणि (ii) लोकसंख्या गणना (PE) - फेब्रुवारी 2027 पहिला टप्पा - घरयादी व‌ घरगणना | या टप्प्यात प्रगणकांकडून विचारले जाणारे 33 प्रश्न व द्यावयाची उत्तरे 

Join with us on WhatsApp 



जनगणना 2017 अंतर्गत पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना करण्यात येणार आहे. यामध्ये खालीलप्रमाणे 33 प्रश्न विचारले जाणार आहेत.

जनगणना 2027 वेबसाईट 


घरांची स्थिती विषयक प्रश्न

1. इमारत क्रमांक (नगरपालिका/ स्थानिक संस्था अथवा गणना क्रमांक)

2. गणना घर क्रमांक

3. गणना घराच्या जमिनीसाठी मुख्यतः वापरलेले साहित्य

4. गणना घराच्या भिंतीसाठी मुख्यतः वापरलेले साहित्य

5. गणना घराच्या छप्परासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य

6. गणना घराच्या वापरासंबंधी खात्री करा

7. गणना घराची स्थिती

8. कुटुंब क्रमांक


कुटुंबाची माहिती विषयक प्रश्न

9. कुटुंबात सामान्यतः निवास करणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या

10. कुटुंब प्रमुखाचे नाव

11. कुटुंब प्रमुखाचे लिंग

12. जर कुटुंब प्रमुख अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/इतर प्रवर्गातील असल्यास

13. गणना घराच्या मालकी हक्काची स्थिती

14. केवळ या कुटुंबाच्या ताब्यात असलेल्या निवासयोग्य खोल्यांची संख्या

15. या कुटुंवात राहत असलेल्या विवाहित जोडप्यांची संख्या


कुटुंबास उपलब्ध असलेल्या सोयी विषयक प्रश्न 

16. पिण्याचा पाण्याचा मुख्य स्रोत

17. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता असलेला खोत

18. प्रकाशाचा मुख्य स्त्रोत

19. शौचालयाची उपलब्धता

20. शौचालयाचा प्रकार

21. सांडपाणी सोडण्यासाठी जोडलेली व्यवस्था

22. स्नानगृहाची उपलब्धता

23. स्वयंपाकघराची उपलब्धता आणि एलपीजी /पीएनजी जोडणी

24. स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे मुख्य इंधन


कुटुंबाने धारण केलेली मालमत्ता व इतर माहिती विषयक प्रश्न 

25. रेडिओ/ट्रान्झिस्टर

26. दूरचित्रवाणी

27. इंटरनेट उपलब्धता

28. लॅपटॉप / संगणक

29. दुरध्वनी / मोबाइल फोन / स्मार्ट फोन

30. सायकल / स्कूटर / मोटरसायकल / मोपेड

31. कार/जीप/व्हॅन

32. कुटुंबात सेवन केले जाणारे मुख्य धान्य

33. मोबाइल क्रमांक (फक्त जनगणनेसंबंधी संपर्काकरिता)


जनगणना-२०२७

जनगणना संचालनालय, महाराष्ट्र घरयादी व घरगणना (पहिला टप्पा)

स्व-गणना (Self-Enumeration) : दि. १ मे, २०२६ ते दि. १५ मे, २०२६

प्रगणकाद्वारे घर गणना (House-Listing Operations) : दि. १६ मे, २०२६ ते दि. १४ जून, २०२६


जनगणना अधिनियम, १९४८ च्या कलम (८) उप कलम (१) अंतर्गत वरील ३३ प्रश्न विचारले जातील.

गृह मंत्रालय भारत सरकार



जनगणना 2027 साठी  Android version 12.0 व 4GB रॅम असणारा मोबाईल असणेबाबत...


भारत सरकारकडून सन 2027 मध्ये होणाऱ्या जनगणनेच्या अंमलबजावणी, जनगणना अधिनियम 1948 च्या कलम 3 नुसार अचलपुर तालुक्यातील जनगणना 2027 चे दुसऱ्या फेरीतील प्रशिक्षण दिनांक 27.04.2026 ते 29.04.2026 पर्यंत जगदंबा महाविद्यालय अचलपुर येथे चालु असुन सदर प्रशिक्षणामध्ये प्रगणक व पर्यवेक्षक यांनी या कार्यालयात निवेदन सादर केले आहे की, जनगणना 2027 या कामाकरीता आपल्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार Version-12.00 व 4.00 GB RAM च्या भ्रमणध्वनी सांगीतले सदर Version-12.00 व 4.00 GB RAM मोबाईल आमच्याकडे नाही.

करीता चौकशी केली असता अंदाजे 20000 ते 25000 रुपयाचा येतो आमचे कडे Android Mobil उपलब्ध आहे परंतु प्रशिक्षक (ट्रेनर) यांच्या म्हणण्याप्रमाणे तो नाही. आपणास नम्र विनंती करण्यात येते की, आपण आम्हाला जनगणना 2027 च्या कामाकरीता सदर Mobil उपलब्ध करुन दयावा. जेणेकरुन जनगणनेचे काम सुरळीतपणे पार पाडता येईल व त्यामुळे कोणत्याही प्रकारची त्रुटी जनगणनेच्या कामात राहणार नाही असे प्रगणक व पर्यवेक्षक यांचे निवेदन या कार्यालयात प्राप्त झाले आहे. करीता सदर निवेदन माहीती सविनय सादर.

जनगणनेसाठी मोबाईल उपलब्ध करुन देणेबाबत परिपत्रक - Click Here

Post a Comment

0 Comments

close