शिक्षक पात्रता परीक्षा सराव टेस्ट 2 - महाराष्ट्राचा भूगोल | TET Online Test 2 - Geography of Maharashtra
शिक्षक पात्रता परीक्षेच्या तयारीसाठी सराव टेस्ट मालिका घेऊन आलो आहोत. सदर सराव टेस्टमध्ये परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले प्रश्न अंतर्भूत केलेले आहेत. शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आपणास फायदा होईल हे नक्की.
या टेस्ट सिरीज मध्ये tet परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असे प्रश्न घेण्यात आलेले आहेत.
समाविष्ट घटक
महाराष्ट्रातील नद्या
महाराष्ट्राचे हवामान
शिक्षक पात्रता परीक्षा सराव टेस्ट 2 - महाराष्ट्राचा भूगोल
TET Online Test 2 - Geography of Maharashtra
प्रश्न 1 - खालीलपैकी दक्षिण वाहिनी नदी कोणती?
- गोदावरी
- नर्मदा
- सावित्री
- प्राणहिता
प्रश्न 2 - खालीलपैकी वेगळा पर्याय निवडा?
- तापी
- उल्हास
- सावित्री
- कृष्णा
प्रश्न 3 - खालीलपैकी कोणती नदी अरबी समुद्रास मिळत नाही?
- नर्मदा
- पूर्णा
- जगबुडी
- कृष्णा
प्रश्न 4 - नदी व शहरे अयोग्य जोडी ओळखा.
- गोदावरी - नांदेड, गंगाखेड, नाशिक
- कृष्णा - कराड, सांगली, मिरज
- तापी - भुसावळ
- भीमा - सोलापूर
प्रश्न 5 - नदी व उपनदी योग्य जोडी असलेला पर्याय निवडा?
- वैनगंगा - वर्धा, नाग
- तापी - पूस, कयाधु, वाघाडी
- भीमा - सीना, पवना, इंद्रायणी
- कृष्णा - वारणा, पंचगंगा, येरळा
प्रश्न 6 - नदी व धरणे अचूक पर्याय निवडा.
- कोयना - उजनी
- पंचगंगा - राधानगरी
- कृष्णा - धोम
- वारणा - चांदोली
प्रश्न 7 - नदी व धरणे चुकीचा पर्याय निवडा.
- वैतरणा - मोडकसागर
- मुठा - खडकवासला
- निरा - वीर धरण
- मुळा - पानशेत धरण
प्रश्न 8 - नदी व धरण योग्य पर्याय निवडा.
- प्रवरा - भंडारदरा
- पैनगंगा - गोसी खुर्द
- पेंच - तोतलाडोह
- वर्धा - अप्पर वर्धा
प्रश्न 9 - नद्यांचा संगम व संगमावरील तीर्थक्षेत्र यांची अयोग्य जोडी कोणती?
- गोदावरी प्राणहिता - सिरोंचा
- कृष्णा वेण्णा - माहुली
- कृष्णा पंचगंगा - कराड
- प्रवरा मुळा - नेवासे
प्रश्न 10 - जिल्हा व तलाव / सरोवर योग्य जोडी कोणती?
- गोंदिया - नवेगाव तलाव
- सातारा - पानसा तलाव
- ठाणे - मायणी तलाव
- बुलढाणा - वुलर सरोवर
प्रश्न 11 - महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे कोणत्या नदीला म्हणतात?
- कोयना
- गोदावरी
- कृष्णा
- प्राणहिता
प्रश्न 12 - जिल्हा व गरम पाण्याचे झरे अचूक जोडी निवडा.
- यवतमाळ - कापेश्वर
- रत्नागिरी - वज्रेश्वरी
- पालघर - आरवली
- रायगड - उपनदेव
प्रश्न 13 - सह्याद्री पर्वताला मान्सून वारे अडून कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो?
- आरोह पाऊस
- प्रतिरोध पाऊस
- अवरोह पाऊस
- आवर्त पाऊस
प्रश्न 14 - महाराष्ट्राला सर्वाधिक पाऊस कोणत्या वाऱ्यामुळे पडतो?
- नैऋत्य मोसमी वारे
- ईशान्य मोसमी वारे
- खारे वारे
- मतलई वारे
प्रश्न 15 - महाराष्ट्रातील प्रजन्यछायेचा प्रदेश कोणता?
- कोकण
- सह्याद्री घाटमाथा
- सह्याद्रीच्या पूर्वेकडील भाग
- विदर्भ
प्रश्न 16 - महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो ?
- महाबळेश्वर सातारा
- माथेरान रायगड
- सिरोंचा गडचिरोली
- आंबोली सिंधुदुर्ग
प्रश्न 17 - संपूर्ण महाराष्ट्र कोणत्या हवामान विभागात येतो?
- उष्ण कटिबंधीय हवामान
- थंड हवामान
- उष्ण व दमट
- सदाहरित
प्रश्न 18 - साधारणतः कोणत्या महिन्यामध्ये महाराष्ट्रात पावसाळा ऋतू असतो?
- जून ते ऑक्टोबर
- एप्रिल ते जुलै
- मार्च ते मे
- जून ते सप्टेंबर
प्रश्न 19 - खालीलपैकी कोणती खाडी रत्नागिरी जिल्ह्यात आहे?
- जयगडची खाडी
- वसईची खाडी
- देवगडची खाडी
- तेरेखोलची खाडी
प्रश्न 20 - खालीलपैकी कोणती नदी गोदावरी नदीची उपनदी नाही?
- सिंदफणा
- प्रवरा
- मांजरा
- इंद्रायणी
प्रश्न 21 - खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांना तलावांचे / सरोवरांचे जिल्हे असे म्हणतात?
- भंडारा गोंदिया
- रत्नागिरी सिंधुदुर्ग
- कोल्हापूर सातारा
- वर्धा गडचिरोली
शिक्षक पात्रता परीक्षा सराव टेस्ट 1 महाराष्ट्राचा भूगोल उत्तरसूची
1-4, प्राणहिता वैनगंगा वेण्णा वर्धा मूल पेंच
2-1, तापी सह्याद्री पर्वतात उगम पावत नाही.
3-4,
4-4, पंढरपूर
5-2 या पैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत. तापी - पुर्णा, वाघुर, नळगंगा, गिरणा
6-2 भोगावती नदीवर
7-4 अंबी नदीवर पानशेत धरण आहे
8-2 वैनगंगा नदीवर आहे
9-3 नृसिंहवाडी
10-1
11-1
12-1
13-2
14-1
15-3
16-4
17-1
18- 4
19-1
20-4
21- 1



0 Comments