जिल्हा परिषद शाळा व अंगणवाड्या एकाच परिसरात असणेबाबत करावयाची कार्यवाही
संदर्भ - मा. शालेय शिक्षण मंत्री व मा. महिला व बालविकास मंत्री यांच्या दि. १४/५/२०२६ च्या बैठकीतील निर्देश
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार ६ ते १४ वयोगटातील सर्व बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची वैधानिक जबाबदारी राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० (NEP-२०२०) मधील तरतुदीनुसार भविष्यात पूर्व प्राथमिकचे वर्ग प्राथमिक शाळांना जोडावे लागतील.
यासाठी बऱ्याच ठिकाणी जिल्हा परीषदेच्या शाळा व अंगणवाड्या या वेगवेगळ्या ठिकाणी अस्तित्वात असल्याचे दिसून येते. ज्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शाळेला आवश्यक वर्गखोल्यांव्यतिरिक्त जास्तीची एखादी वर्गखोली सुस्थितीत असेल तर ती वर्गखोली अंगणवाडी साठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून उपलब्ध करून देण्यात यावी. ही कार्यवाही तात्काळ करून अहवाल संचालनालयास पाठवावा असे आदेश शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य पुणे-१ यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषद सीईओ यांना दिले आहेत.
त्यानुसार आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आता पूर्व प्राथमिकचे वर्ग जिल्हा परिषद शाळांना जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे अंगणवाडी केंद्र आता जिल्हा परिषद शाळांमध्येच सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शैक्षणिक वर्ष 2026-2027 पासून अंगणवाडी जिल्हा परिषद शाळांना जोडण्यात येणार आहेत.



0 Comments