शिष्यवृत्ती परीक्षा ४थी - घटक - उपसर्गघटित व प्रत्ययघटित शब्द माहिती व सराव टेस्ट
उपसर्गघटित व प्रत्ययघटित शब्द शब्दाच्या मूळ रूपाला सुरुवातीला उपसर्ग किंवा शेवटी प्रत्यय जोडल्याने नवीन शब्द तयार होतो.
Information on words formed with prefixes and suffixes
१. उपसर्गघटित शब्द
मूळ शब्दाच्या सुरुवातीला एखादा शब्दांश जोडून तयार झालेल्या शब्दाला उपसर्गघटित शब्द म्हणतात.
उदाहरणे:
उपसर्ग - मूळ शब्द - तयार झालेला शब्द
अ - न्याय - अन्याय
अ - ज्ञान - अज्ञान
अन् - आदर - अनादर
नि/निर् - आशा + निराशा
सु - विचार - सुविचार
प्र - वास - प्रवास
उप - कार - उपकार
प्रति - दिन - प्रतिदिन
अव - गुण - अवगुण
उपसर्गघटित व प्रत्ययघटित शब्द सराव टेस्ट सोडवा - Click Here
२. प्रत्ययघटित शब्द
मूळ शब्दाच्या शेवटी एखादा शब्दांश जोडून तयार झालेल्या शब्दाला प्रत्ययघटित शब्द म्हणतात.
उदाहरणे:
मूळ शब्द - प्रत्यय - तयार झालेला शब्द
गोड - वा - गोडवा
सुंदर - ता - सुंदरता
शहाणा - पण - शहाणपण
लहान - पण - लहानपण
माणूस - की -माणुसकी
आपला - की - आपुलकी
शेत - करी - शेतकरी
दूध - आळ - दुधाळ
धन - वान - धनवान
गुण - वान - गुणवान
कला - कार - कलाकार
समाज - सेवक - समाजसेवक



0 Comments