Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

होळी विशेष

होळी हा रंगांचा सण आहे. या दिवशी सर्व लोक आपले जुने राग रोष विसरून एकमेकांना रंग, गुलाल लावतात. लहान मुले आणि तरुणांमध्ये या दिवसाची जास्त उस्तुकता असते.
फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. ह्या सणाविषयी अनेक कथा जोडलेल्या आहेत. होळीच्या दिवशी रात्री होळी जाळली जाते या मागे एक आख्यायिका आहे.
राजा हिरण्यकश्यप हा स्वतःला देव समजत असे, पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णू भक्त होता. राजाने भक्त प्रल्हाद ला विश्णु भक्ती करण्यापासून थांबवण्याचा प्रयन्त केला , पण प्रळाडणे नकार दिल्यानंतर राजाने त्याला मारण्याचा प्रयत्न केला.

शेवटी राजाने प्रल्हादला मारण्यासाठी बहिण होळीका ची मदत घेतली.
होळीकाला अग्नीत न जळण्याचे वरदान प्राप्त होते. राजाच्या सांगण्यावरून प्रल्हादला आपल्या मांडीवर बसवून अग्नीत प्रवेश केला. परंतु विष्णूच्या कृपेने भक्त प्रल्हाद वाचले आणि होळीका भस्म झाली.

या कथेमधून हा संकेत मिळतो कि वाईटावर चांगल्याच विजय होतोच. आजतागायत फाल्गुन पौर्णिमेला होळी जाळली जाते आणि दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. हा एक रंगाचा सण आहे.

या सणाची लहान मुलेआतुरतेने वाट पहात असतात. या सणामुळे घरात अतिशय आनंदाचे वातावरण असते.

फाल्गुन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा. होळीच दुसरं नांव म्हणजे हुताशनी पौर्णिमा. होळी हा सण शहरात तसेच खेड्या-पाड्यातून मोठ्या आनंद आणि उत्साहाने साजरा केला जातो.
होळी आली की होळीसाठी लाकडं गवऱ्या गोळा करणारी पोरं गल्ली बोळातून गात सुटतात.
"होळी रे होळी पुरणाची पोळी" ..
किंवा
"होळीला गवऱ्या पाच पाच... डोक्यावर नाच नाच".
लाकडं गवऱ्या गोळा केली जातात. मग घराच्या अंगणांत किंवा चौकात एक मोठी एरंडाची फांदी उभी करतात. त्याच्या भोवती लाकडं गोवऱ्या रचतात. संध्याकाळ झाली की होळी पेटवतात. सवाष्णी. मुलं-मुली, मोठी माणसं सर्वजण ह्या होळीची पूजा करतात. होळीला पुरण पोळीचा नैवेद्य दाखवतात. जे जुनं आहे, कालबाह्य आहे, अमंगल आहे त्या सर्वांचा जाळून नाश करायचा. नव्याचा चांगल्याचा उदात्ततेचा स्विकार करायचा हाच होळीचा खरा संदेश आहे.

Post a Comment

0 Comments

close