Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

फेर परीक्षा | पुरवणी परीक्षा | श्रेणीसुधार परीक्षा | SSC-HSC Re-Exams 2025 होणार जून-जुलै 2025 मध्ये

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावी आणि बारावीची फेरपरीक्षा जून-जुलै 2025 मध्ये होणार असल्याची घोषणा राज्य मंडळाने केली आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.10वी / इ.12वी) परीक्षेस पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेवून प्रविष्ट होणाऱ्या ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेव्दारे ) Transfer of Credit घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. 





ज्या विद्यार्थ्यांना या फेरपरीक्षेला बसायचे आहे, ते विद्यार्थी बोर्डाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत. अर्ज भरण्याच्या तारखा राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केल्या आहेत.


पुरवणी परीक्षा | फेरपरीक्षा | श्रेणीसुधार परीक्षा जुलै ऑगस्ट 2025 वेळापत्रक




इ. १० वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा दि. 18 जुलै 2023 ते दि. 1 ऑगस्ट, 2023

इ. १२ वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा दि. 18 जुलै 2023 ते दि. 8 ऑगस्ट, 2023 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.

उपरोक्त कालावधीमध्ये आयोजित केलेले दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

इयत्ता बारावी फेरपरीक्षा किंवा पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे -

नियमित शुल्कासह अर्ज करणे - 07 मे ते 17 मे 2025
विलंब शुल्कासह अर्ज करणे - 18 मे ते 22 मे 2025


इयत्ता दहावी फेरपरीक्षा किंवा पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे -

नियमित शुल्कासह अर्ज करणे -  मे ते  जून 2025
विलंब शुल्कासह अर्ज करणे -  जून ते  जून 2025


जे विद्यार्थी अनुत्तीर्ण आहेत ते किंवा ज्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण असूनही श्रेणी सुधारायची आहे, असे सर्व विद्यार्थी ही पुरवणी परीक्षा देऊ शकतील. श्रेणीसुधारसाठी जून-जुलै 2025, फेब्रुवारी-मार्च 2026 आणि जून-जुलै 2026 अशा लगतच्या तीन संधी उपलब्ध राहणार आहेत. नियमित शुल्कासह अर्ज भरण्याच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचेही राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.


सदर परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत भरावी. सर्व उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी खालील बाबी लक्षात घ्याव्यात.




१. ऑनलाईन आवेदनपत्र भरताना मार्च - एप्रिल 2025 परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेतील माहिती आवेदनपत्रात ऑनलाईन घेता येईल. 

२. श्रेणीसुधार करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जून-जुलै 2025, फेब्रुवारी-मार्च 2026 आणि जून-जुलै 2026 अशा लगतच्या तीनच संधी उपलब्ध राहतील याची नोंद घ्यावी.

३. नियमित शुल्कासह आवेदनपत्रे सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क चलनाव्दारेच भरण्यात यावे. 

४. सर्व विभागीय मंडळातील उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रचलीत शुल्क मंडळाने निश्चित केलेल्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करुन चलनाची प्रत व विद्यार्थ्याच्या याद्या दिलेल्या मुदतीतच संबंधित विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात. 

५. आवेदनपत्रे नियमित शुल्काने भरावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही.

Post a Comment

0 Comments

close