Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अशक्तपणा / थकवा दूर करण्यासाठी काय कराल?

आधुनिक लाईफस्टाईल आणि धकाधकीचे जीवन यामुळे दैनंदिन जीवनात तसेच आहारात कमालीचे बदल झाल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे याचा अनपेक्षितपणे परिणाम आपल्या आरोग्यावर आणि शरीरावर होतो आहे. 
असंतुलित आहार घेतल्यामुळे अशक्तपणा, थकवा वाटतो. याचे रुपांतर पुढे जाऊन मोठमोठ्या आजारांमध्ये होते. या सर्वांवर रामबाण उपाय म्हणजे तुमच्या रोजच्या आहारात खालील काही गोष्टींचा समावेश करणे. 

1. *केळी* : अनेक आजारांवर हा महत्वपूर्ण उपाय आहे. केळीत ग्लुकोज, सुक्रोज आणि फ्रुटोज अशी महत्त्वाची सत्त्वं आहेत. याने आपल्याला ताकद मिळून  थकवा कमी होतो. 

2. *नारळ पाणी* : यामध्ये कार्बोहायड्रेट असल्यामुळे थकवा दूर होऊन शरीराला ऊर्जा मिळते. तसेच त्यात व्हिटॅमिन सी, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम असल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित करता येते. 

3. *डाळिंब* : यामध्ये असणारे फायबर्स आणि व्हिटॅमिन्स शारिरीक थकवा कमी करतात. तसेच यातील लाल दाणे आपल्या शरीरातील रक्ताची मात्रा नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतात.
4. *टोमॅटो* : यामध्ये असलेले व्हिटॅमिन A आणि C चा डोळ्यांसाठी फायदेशीर असते. तसेच याने शरीरातील थकवा दूर होऊन शरीर निरोगी आणि सुरक्षित राहते. 

5. *आवळा* : यात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन C असते, जे आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे. मात्र जर तुम्हाला आवळा आवडत नसेल मुरांबाद्वारे याचे सेवन करा. याने शरीरातील थकवा दूर होतो.

जर तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात थोडा बदल करुन वरील गोष्टींचा आहारात समावेश केल्यास शरीरातील थकवा किंवा अशक्तपणा नक्कीच दूर होईल.

Post a Comment

0 Comments

close