शालेय शिक्षण अपडेट-
दुसऱ्या यादीनंतरही मेडिकल प्रवेश प्रक्रियेत(Medical Admissions 2020-21) राज्यातून केंद्रीय कोट्यातील २२२ जागा रिक्त राहिल्याने त्या पुन्हा महाराष्ट्राच्या कोट्यात वर्ग करण्यात आल्या आहेत. यामुळे राज्यातील वैद्यकीय प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. त्या 222 जागांवर आता महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार असून डॉक्टर होण्याचे आपले स्वप्न साकार करण्यासाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
एमबीबीएस अभ्यासक्रमासोबतच दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ४० जागा वर्ग करण्यात आल्या आहेत. मेडिकल प्रवेश प्रक्रिया सुरू असताना दुसऱ्या फेरीनंतर बहुतांश सरकारी तसेच पालिका रुग्णालयांतील जागा भरल्या गेल्या आहेत. मात्र केंद्रीय कोट्यातील जागा रिक्त राहिल्याने केंद्राकडून राज्यांना २०९७ जागा पुन्हा वर्ग करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रातून देण्यात येणाऱ्या एमबीबीएसच्या २२२ आणि दंतवैद्यकच्या ४० जागा राज्याकडे पुन्हा वर्ग करण्यात आल्या आहेत.प्रवेशास पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही, तर काहींनी प्रवेश रद्द केल्याने या जागा रिक्त राहिल्या आहेत. यामुळे या जागा पुन्हा राज्यांना देण्यात आल्याचे केंद्राने स्पष्ट केले.
राज्यात वर्ग करण्यात आलेल्या २२२ जागांपैकी ५९ जागा या मुंबई व ठाण्यातील कॉलेजांतील आहे. यातील २० जागा कूपर रुग्णालय, १३ लोकमान्य टिळक रुग्णालय आणि १२ नायर रुग्णालयाशी जोडलेल्या कॉलेजमध्ये आहेत.
0 Comments