Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

इ. १० वी व इ. १२ वी च्या विद्यार्थ्यांना मिळणार क्रीडा सवलतीचे गुण

सन २०२1-२2 या वर्षात परीक्षा देणाऱ्या इ. १० वी व इ. १२ वी च्या विद्यार्थ्यांना क्रिडा सवलतीचे गुण देण्याबाबतचे नियम एका परिपत्रकान्वये जाहीर करण्यात आलेले आहेत. 

इयत्ता 10वी साठी क्रीडा सवलतीचे गुण

कोविड १९ या रोगामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे सन २०२०-२१ या वर्षात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता 7 वी इ. 8 वी मध्ये सदर विद्यार्थ्याचा क्रिडास्पर्धेतील सहभाग विचारात घेण्यात यावा व सदर विद्यार्थ्यास सन २०२1-२2 करिता सवलतीचे क्रिडा गुण देण्यात यावेत. 

इयत्ता 10वी चे मूल्यमापनाचे निकष पहा. 100 पैकी कसे दिले जातील मार्क


निकाल तयार करण्यासाठी Excel sheet डाउनलोड करा. 


इयत्ता 12वी साठी क्रीडा सवलतीचे गुण

सन २०२1-२2 या वर्षात इ.१२ वी परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांच्या बाबतीत इ.१२ वी पूर्वी इ. 9 वी व इ. 10वी मधील विद्यार्थ्याचा क्रिडास्पर्धेतील सहभाग विचारात घेण्यात यावा व सदर विद्यार्थ्यास सन २०२1-२2 करिता सवलतीचे क्रिडा गुण देण्यात यावेत.

सदर सवलत ही केवळ सन २०२1-२2 च्या परीक्षेकरिताच देण्यात येत आहे.

Concession of marks for sport circular - Click Here

क्रीडा सवलतीचे गुण देण्याबाबतचे परिपत्रक डाउनलोड करा - Click Here

Post a Comment

0 Comments

close