Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

NTSE Exam 2021-22 state level and national level | School Registration and application | राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा 2021-22 राज्यस्तर व राष्ट्रीयस्तर परीक्षा | शाळा नोंदणी व आवेदनपत्रे भरणे.

NTSE Exam 2021-22 राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (NTS) २०२१-२२ इ. १० वी साठी राज्यस्तर परीक्षा दि. १६ जानेवारी, २०२२ राष्ट्रीयस्तर परीक्षा दि. १२ जून, २०२२ घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील प्रज्ञावान विद्यार्थी शोधण्याच्या दृष्टीने या परीक्षचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे.

NTS Exam प्रश्नपत्रिका संच | NTSE Exam Question papers

NTSE Exam New update

NTS Exam - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे १ यांचे मार्फत सन २०२१-२२ साठी राज्यस्तर राष्ट्रीय प्रज्ञाशोध (NTS) परीक्षा रविवार दि. १६ जानेवारी २०२२ रोजी घेण्यात येणार होती, तथापी काही प्रशासकीय कारणास्तव सदर परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. सदर परीक्षेची आवेदनपत्रे भरण्यासाठीची सुविधा आजपासून उपलब्ध करुन देण्यात येत आहे. 

शासन परिपत्रक

NTSE EXAM 2021-22 बाबतचे परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. 

सन १९६३ पासून राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा योजना हो राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT), नवी दिल्ली यांचेमार्फत राबविली जाते. प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपसना करणे हा या योजनेचा गाभा आहे. प्रज्ञावान विद्याथ्यांना दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येते. मूलभूत विज्ञान, सामाजिक शास्त्र आणि वाणिज्य यामधील पीएच.डी. (विद्यावाचस्पती) पदवी प्राप्त करेपर्यंत सदर शिष्यवृत्ती मिळते. अभियांत्रिकी, वैद्यकीय व्यवस्थापन आणि विधी यामधील व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सदर शिष्यवृत्ती फक्त पदव्युत्तर पदवीपर्यंत देण्यात येते. निवड वर्ष २०१२-१३ पासून राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (NTS) इ. १० वी साठी करण्यात आली आहे.


NTSE Exam 2021-22 साठी शाळा नोंदणी व विद्यार्थी अर्ज भरण्यासाठी लिंक

लिंक १-  Click Here 

लिंक २- Click Here


शाळा नोंदणी व विद्यार्थी आवेदनपत्रे भरण्यास मुदत


NTSE परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत - 22/04/2022

NTSE परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत विलंब शुल्कासह - 26/04/2022

NTSE परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत अति विलंब शुल्कासह - 26/04/2022


Post a Comment

0 Comments

close