आदर्श शाळा लांजा नं. 5 मध्ये शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. आदर्श शाळा जि. प. शाळा लांजा नं. 5 मध्ये शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व नवागतांना राजमुकुट घालून त्यांचे औक्षण करण्यात आले.
नवागतांची लेझीम पथक व ढोलताशांच्या गजरात जंगी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सर्व अधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, पालक यांनी मुलांच्या वर पुष्पवृष्टी करुन शाळेतील वातावरण चैतन्यमय व उत्साहवर्धक करण्यात आले. त्यानंतर सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मुलांना मोफत गणवेश व मोफत पुस्तक वाटप करण्यात आले. त्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
याप्रसंगी इयत्ता पहिली ते आठवी मध्ये दाखल झालेल्या सर्व मुलांचे स्वागत मा.श्री.प्रमोद कदम तहसीलदार लांजा, मा. श्री.संतोष म्हेत्रे गटविकास अधिकारी लांजा, मा. श्री. विजयकुमार बंडगर गटशिक्षणाधिकारी लांजा, मा. श्री. विनोद सावंग शिक्षण विस्तार अधिकारी लांजा, मा. श्री. साहेब पाशापटेल केंद्र प्रमुख लांजा कन्या, मा. श्री. चंद्रकांत मणचेकर माजी शिक्षण सभापती, मा. श्री. गुरुप्रसाद देसाई अध्यक्ष, मा. श्री. राजेंद्र धावणे व सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती लांजा नं. 5, मा. श्रीम. विमल चव्हाण मुख्याध्यापिका शाळा लांजा नं. 5 व सर्व शिक्षक वर्ग यांच्या हस्ते करण्यात आले.
0 Comments