शालेय विद्यार्थ्यांच्या दफ्तरांचे ओझे कमी करण्यासाठी, पुढील वर्षीपासून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची जोड देण्यात येणार आहे. असे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी घोषित केले आहे.
पाठ्यपुस्तकांना वह्यांची जोड देणेबाबत शाळेत प्रत्यक्ष शिकवणाऱ्या शिक्षकांकडून या संदर्भाने वास्तववादी माहिती मिळवण्यासाठी ही छोटीशी प्रश्नावली तयार केलेली आहे. पाठ्यपुस्तकातील वह्यांची पाने समाविष्ट करण्याची निकड जाणून घेण्यासाठी आपल्या कामातून पाच मिनिटे वेळ यासाठी काढून ही प्रश्नावली जरूर भरून पाठवावी. तसेच विद्यार्थ्यांसाठी तळमळीने काम करणाऱ्या इतर शिक्षकांनादेखील ही प्रश्नावली भरण्यास प्रवृत्त करावे.
पाठ्यपुस्तकांना वह्यांची जोड देणेबाबत आपले मत नोंदवा.
आपले मत नोंदवा 👆 येथे टच करा.
शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक मा. शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंडळ पुणे येथे घेण्यात आली. या वेळी शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, सचिव अनुराधा ओक, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक महेश पालकर यांच्यासह उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शालेय विद्यार्थ्यांच्या दफ्तरांचे ओझे कमी करण्यासाठी या पाठ्यपुस्तकांमध्ये धडा संपला की, काही कोरी पाने देण्यात येतील. विद्यार्थ्यांना या पानांचा उपयोग वहीसारखा करता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेमध्ये वेगळ्या वह्या आणण्याची गरज भासणार नाही. पुढील शैक्षणिक वर्ष 2023-2024 पासून या उपक्रमाची सुरुवात करण्यात येईल, असे केसरकर यांनी सांगितले.
0 Comments