Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पवित्र प्रणाली - शिक्षक पद भरतीच्या अनुषंगाने विद्यमान तरतूदी सुधारित करणे/ वगळणे व नवीन तरतूदी समाविष्ट करणे बाबतचा शासन निर्णय 13 ऑक्टोबर 2023, 10 नोव्हेंबर 2022

पवित्र (PAVITRA-Portal For Visible To All Teachers Recruitment) या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येणाऱ्या शिक्षक पद भरतीच्या अनुषंगाने विद्यमान तरतूदी सुधारित करणे/ वगळणे व नवीन तरतूदी समाविष्ट करणे बाबतचा शासन निर्णय जाहीर


राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित व विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील. रात्र शाळांमधील तसेच, शासकीय व अनुदानित अध्यापक विद्यालयातील (डी.एल.एड कॉलेज) शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवकाची भरती "अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी" यामध्ये प्राप्त गुणांच्या आधारे पवित्र (PAVITRA Portal For Visible to All Teachers Recruitment) या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यासाठी 07-02-2019 या शासन निर्णयान्वये पारदर्शक पध्दती विहीत करण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात पवित्र या प्रणालीद्वारे भरती प्रक्रिया राबविताना सदर कार्यपध्दतीमध्ये बदल / सुधारणा करणे व काही तरतूदी नव्याने समाविष्ट करण्याची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले. यासाठी विविध स्तरावर घेण्यात आलेल्या बैठका व आयुक्त, शिक्षण यांच्या दिनांक १२.१०.२०२२ रोजी प्राप्त प्रस्तावाच्या आधारे शासन निर्णय क्र. सीईटी-२०१५/ प्र.क्र. १४९/टिएनटि १, दि.०७.०२.२०१९ यामधील काही तरतूदी वगळणे / सुधारणा करणेबाबतचा निर्णय घेण्याची व नव्याने तरतूदी समाविष्ट करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

पवित्र पोर्टल website वर जाण्यासाठी येथे टच करा - Click Here


पवित्र प्रणाली शिक्षक भरती -

इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमांसाठी शिक्षक भरती बाबत शिक्षण आयुक्त यांच्या महत्त्वपूर्ण सूचना / परिपत्रक डाउनलोड करा. (28-01-2024)- Click Here

राज्यातील शिक्षक पदभरतीसाठी संदर्भाधिन पत्रान्वये शासनाने शासन निर्णय दिनांक १९/०६/२०१३ मधील तरतुदी विचारात घेवून मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मागणी प्रमाणे इंग्रजी माध्यमाचे शिक्षक उपलब्ध करुन देण्याबाबत कळविले आहे. यानुसार पवित्र पोर्टलवर सेमी इंग्रजी शाळांकरीता नोंदविण्यात येणा-या मागणीस अनुसरून शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी-२०२२ मध्ये प्राप्त झालेल्या गुणांनुसार इंग्रजी माध्यमातून व्यावसायिक अर्हता धारण करणाऱ्यामधून शिफारस करण्यात येणार आहे. तथापि, अशा शिक्षण सेवकांच्या नियुक्तीनंतर शिक्षण सेवक कालावधीमध्ये त्यांची कौशल्य चाचणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, म.रा.पुणे यांच्या अधिनस्त प्रादेशिक विद्या प्राधिकरण, छत्रपती संभाजीनगर या इंग्रजी भाषेशी संबंधित संस्थेकडून घेण्यात येणार आहे. सदर कौशल्य चाचणीतील गुणवत्तेनुसार संबंधित शिक्षण सेवकांचे कौशल्य/ज्ञान असमाधानकारक असल्याचे आढळल्यास त्याची सेवा समाप्त करण्यात येईल अशी अट नियुक्ती आदेशामध्ये स्पष्ट नमूद करावी,

२. स्थानिक स्वराज्य संस्थातील इंग्रजी माध्यमाचे प्रचलित शासन धोरणानुसार बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२३/प्रक्र ५०९/ टीएनटी-१ दिनांक १३/१०/२०२३ मधील निर्देशास अनुसरून प्रत्यक्ष कार्यवाही करण्याची कार्यपध्दती निश्चित करण्यासाठी समिती गठीत करण्यात येत आहे. समितीकडून शिफारशी प्राप्त झाल्यानंतर पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात येईल.

३. यास्तव सध्या पचित्र प्रणालीमध्ये नोंद केलेल्या मागणीमध्ये शासन निर्णय दिनांक १९/०६/२०१३ नुसार सेमी इंग्रजीसाठी व शासन निर्णय दिनांक १३/१०/२०२३ मधोल तरतुदीनुसार साधन व्यक्तीसाठी अशा दोन्ही प्रकारच्या शिक्षकांची मागणी नोंद केली असल्यास, साधन व्यक्तीसाठी केलेली मागणी कमी करून केवळ सेमी इंग्रजीसाठी शिक्षक पदांची मागणी नोंद करावी, सध्या केंद्र शाळांसाठी मागणी केलेल्या साधन व्यक्तीच्या जागा तूर्त राखून ठेवण्यात याव्यात.

शासन पत्रातील निर्देशानुसार दिनांक ३०/०१/२०२४ अखेर पर्यंत पवित्र पोर्टलवरील जाहिरात विषयक कार्यवाही पूर्ण करावी.


पवित्र प्रणाली शिक्षक भरती - 

शासन निर्णय 13 ऑक्टोबर 2023 नुसार विद्यमान तरतुदी सुधारणा करणे / वगळणे आणि नवीन तरतुदी समाविष्ट करणेबाबत

01) पवित्र पोर्टल मार्फत घेण्यात येणाऱ्या भरती प्रक्रिया व अर्हता तसेच इंग्रजी विषयातून अध्यापनाकरीता केंद्रस्तरावर साधन व्यक्तीची निवड व निकष याअनुषंगाने पुढीलप्रमाणे तरतूदी सुधारित करण्यास व नव्याने समाविष्ट करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे:- शासन निर्णय दिनांक १०.११.२०२२ मधील अ.क्र. ५ येथील "विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवडीसाठी शिफारस झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी पात्र राहील"

या तरतूदी ऐवजी,

" विविध टप्प्यांमध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अर्हतेनुसार पदांसाठी पात्र राहील. उमेदवारास पुर्वी निवड झालेल्या त्याच गटासाठी अर्ज करावयाचा झाल्यास नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तेनुसार पुन्हा त्याच गटासाठी पात्र ठरेल" असे समाविष्ट करण्यात येत आहे.


०2) उच्च माध्यमिक (इ. ११ वी ते इ. १२ वी ) या विभागाकडील दोन विषयाचा मान्य कार्यभार विचारात घेऊन पूर्ण वेळ मान्य रिक्त पदावर नियुक्ती करण्यासाठी दोन्ही विषयात पदव्युत्तर पदवीची मूळ अर्हता धारण करणारे उमेदवार नियुक्तीस पात्र असतील. सदर पदे पवित्र पोर्टलमार्फत भरण्यात येतील.

०3) उच्च माध्यमिक (इ ११ वी ते इ १२ वी) या गटातील संच मान्यतेत मूळ मंजूर पैकी रिक्त असलेली अर्धवेळ पदे (तासिका तत्वावरील वगळून) पवित्र या प्रणालीमार्फत पद भरती करण्यात येईल.

०4) जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळास्तरावर केंद्रांतर्गत अन्य शाळांमधील शिक्षकांना इंग्रजी भाषेचे तंत्र शिकविण्याकरीता खालील निकषांनुसार शिक्षक पदावर निवड झालेले उमेदवार केंद्र शाळांतर्गत शाळांसाठी साधन व्यक्ती म्हणून काम करेल. सदरची नियुक्ती जिल्हा परिषदेकडील उपलब्ध रिक्त पदांमधुन होईल. सदरची निवड करताना पुढील निकष / प्राधान्यक्रम विचारात घेण्यात यावेत :-


१. पदांच्या अर्हतेनुसार संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेले उमेदवार (शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण )

२. पदांच्या अर्हतेनुसार संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून व व्यावसायिक अर्हता अन्य कोणत्याही माध्यमातून शिक्षण झालेले उमेदवार.

३. इ. १२ वी पर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून व व्यावसायिक अर्हता अन्य कोणत्याही माध्यमातून शिक्षण झालेले उमेदवार.

४. इ. १० वी पर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून व व्यावसायिक अर्हता अन्य कोणत्याही माध्यमातून शिक्षण झालेले उमेदवार. 

५. पदाच्या अर्हतेनुसार संपूर्ण शिक्षण कोणत्याही माध्यमातून व व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेले उमेदवार

०६. उक्तप्रमाणे नमूद निकषांस अनुसरुन निवड झालेल्या उमेदवारांना साधन म्हणून निवड करण्यासाठी त्यांची राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने एक परीक्षा घ्यावी व यांना आवश्यकतेनुसार प्रशिक्षित करण्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करावे. यासंदर्भात आयुक्त (शिक्षण) यांनी या प्रक्रियेचा आराखडा निश्चित करुन या योजनेची अंमलबजावणी करावी.पवित्र प्रणाली शिक्षक भरती - 

शासन निर्णय 10 नोव्हेंबर 2022 नुसार विद्यमान तरतुदी सुधारणा करणेबाबत / वगळणेबाबत


शासन निर्णय दिनांक ०७.०२.२०१९ मधील पुढील तरतूदी सुधारित करण्यास व वगळण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.


१. शासन निर्णय क्रमांक: सीईटी२०१५/प्र.क्र.१४९/ टीएनटी-१, दि.०७.०२.२०१९ मधील परिच्छेद क्र.३.४ येथील एका उमेदवारास गुण सुधारण्यासाठी जास्तीत जास्त पाच वेळा परीक्षेची संधी उपलब्ध राहील." या तरतूदी ऐवजी "उमेदवारास प्रत्येक वेळी नव्याने होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होणे अनिवार्य राहील. उमेदवाराचे त्यापूर्वीच्या चाचणीतील गुण नवीन चाचणीचा अंतिम निकाल प्रसिध्द झाल्यानंतर नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत" असे समाविष्ट करण्यात येत आहे.


२. शासन निर्णय क्रमांक: सीईटी२०१५/प्र.क्र. १४९/ टीएनटी-१, दि. ०७.०२.२०१९ मधील परिच्छेद क्र. ३.६ येथील तरतूद यान्वये वगळण्यात येत आहे, परंतु उर्वरित तरतूदी यापुढेही लागू राहतील.

३. पवित्र पोर्टलमार्फत घेण्यात येणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे तरतूदी समाविष्ट करण्यात येत आहेत:

०१. शिक्षक पदभरतीसाठी व्यवस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या दिनांकास असलेले उमेदवाराचे वय विचारात घेण्यात येईल. तथापि, सन २०२२ मध्ये होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीनुसार येणाऱ्या जाहिरातीसाठी उमेदवारांचे वय कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर २ वर्षासाठी शिथिलक्षम करण्यात येत आहे.

केंद्रप्रमुख पद भरती शासन निर्णय PDF व केंद्रप्रमुख परीक्षेबाबत संपूर्ण माहिती - Click Here

०२. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होण्यासाठी उमेदवारास किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणे अनिवार्य असेल.

०३. शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणीकरीता उमेदवाराने निवडलेले माध्यम हे केवळ चाचणी परीक्षेपुरते मर्यादित राहील. या चाचणीच्या माध्यमाचा निवड प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही.

०४. शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणीनंतर पदभरतीसाठी आवश्यकतेनुसार तीन महिन्यातून एकदा व्यवस्थापनाकडून पोर्टलवर जाहीराती घेण्यात येतील. त्या कालावधीमध्ये आलेल्या जाहीरातीसाठी पात्र उमेदवारांकडून एकत्रित प्राधान्यक्रम घेऊन शिफारस पात्र उमेदवारांची व्यवस्थापन निहाय यादी प्रसिध्द करण्यात येईल. 

०५. विविध टप्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवडीसाठी शिफारस झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी पात्र राहील.

पवित्र प्रणाली - शिक्षक भरती सुधारित तरतुदी शासन निर्णय 10 नोव्हेंबर 2022 डाउनलोड करा. Click Here

Post a Comment

0 Comments

close