पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 09 फेब्रुवारी 2025 रोजी होत आहे. या परीक्षेसाठी तुम्ही वर्षभर खूप मेहनत घेतली आहे. वर्षभर घेतलेली मेहनत, केलेला अभ्यास याचे चीज व्हावे यासाठी शिष्यवृत्ती परीक्षेला सामोरे जाताना काही महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवा.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत परीक्षार्थी व पालक यांच्या साठी दिलेल्या सूचना पहा. - Click Here
शिष्यवृत्ती परीक्षेला सामोरे जाताना खालील महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाच.
१) परीक्षेला जाताना तुमचे प्रवेशपत्र / हॉलतिकीट (Admit card ) सोबत ठेवा. प्रवेशपत्र असल्याशिवाय तुम्हाला परीक्षा गृहात प्रवेश दिला जाणार नाही.
२) चांगले चालणारे, रुळलेले 2 बॉल पेन सोबत घ्या. बॉलपेन काळ्या किंवा निळ्या एकाच रंगाचे घ्या.
३) तुमच्या सोबत दोन रूमाल असायलाच हवेत कारण तुमच्या तळ हाताला नेहमी घाम येत असतो. घामामुळे उत्तरपत्रिका खराब होऊ नये म्हणून घाम आल्यानंतर तळहात आठवणीने पुसा.
४)तुमची पाण्याची बाटली बेंचवर ठेवू नका.. तुम्हांला पाणी हवे असल्यास पेपर बाजूला करून पेपर वर पाणी पडणार नाही या पद्धतीने पाणी प्या.
५) पेपर सोडविताना तुम्हांला पूर्ण दीड तास वेळ घ्यायचा आहे हे लक्षात ठेवा. गडबड करून पेपर लवकर सोडवू नका. वेळेचे नियोजन करा.
६) पेपर सोडविताना प्रत्येक प्रश्न पूर्ण वाचा. त्यानंतरच प्रश्नाचे अचूक उत्तर पर्यायातून निवडा.
७) प्रश्न व गोल करावयाचा उत्तरपत्रिकेतील क्रमांक योग्य असल्याची खात्री करुनच पर्यायाला गोल करा.
८) इ. 8वी साठी काही प्रश्नांच्या उत्तरात दोन पर्याय राहू शकतात. जिथे दोन पर्याय असतील तिथे दोन गोल रंगवा.
९) उतारा, कविता, जाहिरात आणि संवाद व्यवस्थित वाचून घ्या. त्यानंतरच एक एक प्रश्न सोडवायला सुरूवात करा.
१०) प्रत्येक प्रश्न प्रश्नचिन्हापर्यंत व्यवस्थित वाचा. आकलन करुन घ्या. (प्रश्नातील आहे - नाही ,चूक - बरोबर, अचूक - चूक, योग्य- अयोग्य, correct -incorrect ,right -wrong हे महत्त्वाचे शब्द वाचूनच नंतर प्रश्न सोडवायला घ्या.)
११) जेव्हा तुमचे गणित, बुद्धिमत्ता विषयाचे उदाहरण सोडवून होईल तेव्हा प्रत्येक वेळेस रिचेक म्हणजेच परत तपासून घ्या. पडताळा घेत जा. कारण अशा वेळेतच सोपी उदाहरणे चूकत असतात.
१२) बुद्धिमत्ता विषया मधील आकृत्या व्यवस्थित निरीक्षण करून सोडवा. (आरशातील प्रतिबिंब व पाणी म्हणजेच जल प्रतिबिंब यात गोंधळ करू नका.)
१३) संख्येतील परस्परसंबंध, संख्यामालिका, विसंगत पद, वर्गीकरण ह्या प्रश्नांना थोडा वेळ जादा द्या. हे प्रश्न मेरीट लावणारे असतात.
१४) एखादा प्रश्नांचे उत्तर मिळत नसेल तर त्या प्रश्नावरच विचार करत थांबून राहू नका किंवा जास्त वेळ घालवू नका. पुढील प्रश्न सोडवा. नंतर वेळ मिळाल्यानंतर तो प्रश्न सोडवायला घ्या. असे करताना पुढील प्रश्नांचा पर्याय लिहित असताना बरोबर त्याच क्रमांकाच्या प्रश्नाचा पर्याय गोल करा.
१५) गणितातील प्रश्न सोडविताना सर्वात अगोदर एक लक्षात ठेवा गणितातील प्रत्येक प्रश्न सोडविल्याशिवाय उत्तर अंदाजे करू नका. कितीही सोपा प्रश्न असू द्या तो सोडवाच.
१६) गणितातील उदाहरणे कितीही सोपी असली तरी तोंडी सोडविण्याचा प्रयत्न करु नका. ती लिहुनच सोडवा.
१७) कधी कधी सुरूवातीला 5 ते 6 प्रश्न खूपच सोपे येतात आणि आपण Relax होतो आणि उत्तरे तोंडी करायचा प्रयत्न करतो आणि इथेच खऱ्या चूका होत असतात हे लक्षात ठेवा.
१८) कोणतेही दडपण, भिती, मनात न ठेवता पेपर सोडवा. पेपरला घाबरून जाऊ नका.
१९) पहिला पेपर झाल्यानंतर कोणत्याही प्रश्नांबाबत चर्चा करु नका. दोन्ही पेपर झाले नंतर घरी आल्यावर निवांत चर्चा करा.
20) उत्तरपत्रिकेवर परीक्षार्थ्यांचा बैठक क्रमांक, माध्यम, केंद्र क्रमांक व हॉल क्रमांक छापलेला आहे. त्यामुळे संबंधित परीक्षार्थ्याला त्याच्याच बैठक क्रमांकाची व संबंधित पेपरचीच उत्तरपत्रिका मिळाली आहे याची काटेकोरपणे खात्री करावी.
21) उत्तरपत्रिका फाटल्यामुळे उत्तरपत्रिकेवर रंगवलेले पर्याय दिसत नसल्यास त्या प्रश्नांचे गुण दिले जात नाहीत त्यामुळे उत्तरपत्रिका फाटणार नाही याची दक्षता घ्यावी.
२5) तुम्ही वर्षभर केलेला अभ्यास आणि परीक्षेच्या दीड तासाच्या वेळेत, त्या अभ्यासाची उजळणी अचूक व वेळेत कशी करता यावर सर्व यश अवलंबून आहे.
0 Comments