Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यू उपदान / सेवा उपदान मंजूर करणेबाबत विकल्प नमूना फॉर्म PDF डाउनलोड करा.

राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यु उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ति उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान मंजूर करणेबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी नमूना विकल्प भरुन द्यावे लागणार आहेत. कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यू उपदान / सेवा उपदान मंजूर करणेबाबत विकल्प नमूना फॉर्म PDF डाउनलोड करा.  

शासनाने आता असा निर्णय घेतला आहे की, दिनांक ०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त झालेल्या व परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांचा 

(अ) सेवेत असतांना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यु उपदान, 

(ब) रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवा उपदान लागू करण्यात येत आहे.

(क) तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान लागू करण्यात येत आहे.


कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यू उपदान / सेवा उपदान मंजूरीसाठी नमूना विकल्प डाउनलोड करा. 

Download Sample Form PDF for Sanction of Family Pension and Death Gratuity / Service Gratuity.


1) दिनांक ०१.११.२००५ ते या निर्णयाच्या दिनांकापर्यंत मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास मृत्यू उपदान, कुटुंब निवृत्तिवेतनाची थकबाकी तसेच नियमित कुटुंब निवृत्तिवेतन मिळण्यासाठी सदर शासन निर्णयासोबतचा नमुना- ३ मधील विकल्प कार्यालय प्रमुखाकडे सादर करावा लागेल, त्यानुसार कुटुंब निवृत्तिवेतनधारकास त्याला मिळालेल्या सानुग्रह अनुदानाची रक्कम व परिभाषित निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत शासनाच्या अंशदानाची व्याज / लाभांशासह रक्कम समायोजित करण्याच्या अटीवर कुटुंब निवृत्तिवेतनाचा लाभ अनुज्ञेय होईल, सदर रक्कम समायोजित झाल्यानंतर कुटुंब निवृत्तिवेतनधारकास नियमितपणे कुटुंब निवृत्तिवेतन अनुज्ञेय राहील.

विकल्प नमुना - 3 डाउनलोड करा. - Click Here


2) राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत सध्या कार्यरत असलेल्या व यापुढे शासकीय सेवेत नियुक्त होणारा कर्मचारी यांनी त्यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास किंवा रुग्णता सेवानिवृत्त झाल्यास, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ प्रमाणे कुटुंब निवृत्तिवेतन किंवा रुग्णता निवृत्तिवेतन अनुज्ञेय करण्याबाबत अथवा राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत त्याची कायम निवृत्तिवेतन लेखा क्रमांक (PRAN) मध्ये जमा असलेली संचित रक्कम निवृत्तिवेतन निधी विनियमक व विकास प्राधिकरण (PFRDA) यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार अनुक्रमे कुटुंबास किंवा त्याला मिळण्याबाबतचा सोबतचा नमुना-२ मध्ये विकल्प कार्यालय प्रमुखाकडे सादर करावा.

विकल्प नमुना - 2 डाउनलोड करा. - Click Here


3) जे शासकीय कर्मचारी महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ प्रमाणे कुटुंब निवृत्तिवेतन किंवा रुग्णता निवृत्तिवेतन अनुज्ञेय करण्याबाबतचा विकल्प सादर करतील. त्यांनी नमुना-१ प्रमाणे कुटुंबाचा तपशील सादर करणे अनिवार्य आहे.



कुटुंब तपशील नमुना-1 व  जुन्या फॅमिली पेंशन- ग्रॅच्युटी चा  विकल्प नमुना-2 भरून जमा करणेबाबत


सर्व कार्यरत NPS/DCPS धारक कर्मचारी /शिक्षक/ अधिकारी बांधवांनी ( DCPS/NPS खाते असले नसले तरीही...) 31 मार्च 2023 च्या  GR मधील कुटुंब तपशील (नमुना-१)  व  1982- फॅमिली पेंशन व ग्रॅच्युटी विकल्पा चा फॉरमॅट (नमुना-२) असे दोन्ही फॉर्म पूर्ण भरून  स्वाक्षरी करून आपापल्या आस्थापना / विभाग प्रमुख कार्यालयात लवकरात लवकर  जमा करा.. 

➡️तर मयत झालेल्या किंवा रुग्णता मुळे सेवा समाप्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नमुना - 3 भरून द्यायचा आहे, मात्र तो आत्ताच देऊन उपयोग नाही, जेव्हा फॅमिली पेंशन - ग्रॅच्युटी  प्रस्ताव सादर करणार तेव्हा तो त्या प्रस्तावासोबत द्यावा..

फॅमिली पेंशन ग्रॅच्युटी चा प्रस्ताव नमुना लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल... संबंधित विभागाने नवीन प्रस्ताव नमुना दिल्यास तो वापरावा लागणार आहे, म्हणून सध्या कोणी फॅमिली पेंशन ग्रॅच्युटी चा प्रस्ताव टाकण्याची घाई करू नये, सुधारित परिपत्रक/ निर्देश येण्यासाठी थोडी वाट बघूया.. तोपर्यंत मयत कर्मचाऱ्यांचे मूळ मृत्यू दाखला, मूळ वारस प्रमाणपत्र, इत्यादी कागदपत्रे कुटूंबास तयार ठेवायला सांगा.. 
👇 शासन निर्णय डाउनलोड करा.

➡️ सर्व सेवानिवृत्त DCPS/NPS कर्मचाऱ्यांना *विनाअट ग्रॅच्युटी मिळणार आहे,* त्यासाठी त्यांना ग्रॅच्युटी चा प्रस्ताव सादर करावा लागेल.. त्याबाबत ग्रॅच्युटी प्रस्ताव नमूना लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल..

(टीप- सोबत नमुना-1,2,व 3 च्या फॉर्म ची PDF पाठवत आहे, ज्यात NPS वर काट मारली आहे, व जुनी पेंशन विकल्प कोरा ठेवला आहे, तो कोरा भाग तेवढा आपण भरून द्यावा.
पुन्हा एकदा लक्षात घ्या की कार्यरत कर्मचाऱ्यांनी फक्त नमुना 1 व 2 भरायचा आहे..) 

Post a Comment

0 Comments

close