Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शाळा/तुकड्यांवरील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी यांना अनुदान देण्याची कार्यवाही तात्काळ करणे तसेच, अनुदानाचा पुढील टप्पा अनुज्ञेय करणेबाबत

अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शाळा/तुकड्यांवरील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी यांना अनुदान देण्याची कार्यवाही तात्काळ करणे तसेच, अनुदानाचा पुढील टप्पा अनुज्ञेय करण्यासाठी प्रस्ताव सादर करणेबाबत शासन परिपत्रक 09 नोव्हेंबर 2023, तसेच 22 नोव्हेंबर 2023 रोजीचे शिक्षण संचालक यांचे निर्देश वाचा. 


1. मा. मंत्रीमंडळाच्या दि. १३.१२.२०२२ रोजी झालेल्या बैठकीत त्रुटी पूर्तता झालेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा/ तुकड्या, वर्ग / अतिरिक्त शाखा यांना अनुदानासाठी पात्र करणे, तसेच यापूर्वी २० टक्के व ४० टक्के वेतन अनुदान घेत असलेल्या शाळा/तुकड्यांना २० टक्के अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर करणे, तसेच, अघोषित असलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा / वर्ग / अतिरिक्त शाखा यांना अनुदानासाठी पात्र घोषित करुन २० टक्के अनुदान मंजूर करण्याचा निर्णय विहित अटी शर्तीच्या अधीन राहून घेण्यात आला आहे. सदर शाळांना/ तुकडयांना शासन निर्णय दि. ०६.०२.२०२३ अन्वये दि. ०१.०१.२०२३ पासून अनुदान अनुज्ञेय करण्यात आले आहे.



२. तसेच, अनुदानाची कार्यवाही शीघ्रतेने व्हावी याकरीता शासन परिपत्रक दि.२४.०४.२०२३ अन्वये सूचना दिलेल्या आहेत. याव्यतिरिक्त खाजगी अनुदानित / अंशत: अनुदानित शाळेतील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी यांना शालार्थ आयडी देण्याबाबतच्या निकषामध्ये शासन पत्र, दि.२६.०९.२०२३ अन्वये सूट देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त शासन परिपत्रक दि. २५.०९.२०२३ आरक्षण धोरणाच्या संदर्भात मा. उच्च न्यायालय, मुंबई तसेच, मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांनी दिलेल्या आधारे सुधारणा करण्यात आलेली आहे.


३. संदर्भीय शासन निर्णय / परिपत्रक/ पत्रातील सर्व अटी व शर्तीनुसार तपासणी करुन अंमलबजावणी करण्यात यावी व अनुदानासाठी पात्र होणाऱ्या शाळा / तुकड्यांवरील पात्र शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी यांना अनुदान मंजूर करण्याची कार्यवाही कोणत्याही परिस्थितीत दिनांक ३१-१२-२०२३ पर्यंत पूर्ण करावी. अशी कार्यवाही करत असताना कोणत्याही शिक्षकांवर / कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना आपले स्तरावरुन आपले अधिनस्त सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना द्याव्यात. तसेच, पुढील प्रत्येक वर्षी माहे सप्टेंबर पर्यंत आधार प्रमाणित संचमान्यता पूर्ण करण्यात यावी. त्यानंतर माहे ऑक्टोबर मध्ये या संचमान्यतेनुसार अनुदानासाठी पात्र ठरत असलेल्या शाळा / तुकड्यांवरील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी यांना अनुदानाचा पुढील टप्पा देण्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव (आर्थिक भारासह) शासनास सादर करण्यात यावा.


वरील संदर्भिय परिपत्रक डाउनलोड करा.09 नोव्हेंबर 2023 - Click Here


कर्मचाऱ्यांना अनुदान देणे व पुढील वाढीव टप्पा अनुदान प्रस्ताव सादर करणेबाबत शिक्षण संचालक यांचे परिपत्रक 22 नोव्हेंबर 2023 - Click Here

Post a Comment

0 Comments

close