Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके शालार्थ प्रणालीमधून ऑनलाईन अदा होणार

शालार्थ प्रणालीमधून ऑनलाईन अदा होणार वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके. शालार्थ प्रणालीत लवकरच सुरु होणार ही सुविधा. दि. २६/१०/२०२३ रोजी व्हीसीमध्ये वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके अदा करण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयाकडून लेखाशीर्षनिहाय मागणी करण्यात आली होती. तसेच विविध संघटनेकडून मागणी करण्यात आली होती.


तथापि शासन पत्र क्र. वेतन-१२२३/प्र.क्र.१०१/टिएनटी-३ दि. २० नोव्हेंबर, २०२३ अन्वये ऑनलाईन पद्धतीन देयक अदा करण्याची प्रणाली विकसित करण्यास साधारणपणे १ महिन्याचा कालवधी लागणार असल्याने सदर प्रणाली मार्फतच थकीत देयक अदा करण्याची कार्यवाही करण्यात यावी असे शासनाने निर्देश दिलेले आहे.


सन २०२३-२४ मध्ये वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके ऑनलाईन पद्धतीने अदा करणेसाठी शालार्थ प्रणालीमध्ये सुविधा विकसित करण्याची कार्यवाही सुरू असून शालार्थ प्रणालीमध्ये सदरची सुविधा उपलब्ध झालेनंतर २२०२०४४२, २२०२०४७८ व २२०२०४६९ या लेखाशीर्षाखाली उपलब्ध तरतूदीमधून वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यास परवानगी देण्यात येत आहे.

राज्यातील शिक्षकांचे वेतन CMP प्रणाली मार्फत करणेबाबत परिपत्रक


तथापि सदरची वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके ही आपल्या कार्यालयास प्राप्त झालेल्या आवक क्रमांकानुसार अदा करण्याची दक्षता घ्यावी. तसेच वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके अदा करणेबाबत वित्त विभाग, आरोग्य विभाग आणि शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार व शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके अदा करण्यात यावी. शासनाच्या ध्येयधोरणाच्या विसंगत कार्यवाही केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी. 

वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके ऑनलाईन पद्धतीने अदा करणेसाठी शालार्थ प्रणालीमध्ये सुविधा उपलब्ध बाबत शासन परिपत्रक डाउनलोड करा. Click Here

Post a Comment

0 Comments

close