Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणार मोफत गणवेश, बुट व पायमोजे ( युनिफॉर्म, शुज व सॉक्स )

शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत गणवेशासोबत, बुट व पायमोजे विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. याबाबत अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने परिपत्रक काढून सूचना दिल्या आहेत. 

शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी करणेबाबत च्या सूचना वाचा. येथे क्लिक करा. 



शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी विद्यार्थ्यांना बुट व पायमोजे वितरण करणेबाबत सूचना

सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून शासकीय तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इ. १ ली ते ८ वी मध्ये शिक्षण घेत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना एक जोडी बुट व दोन जोडी पायमोजे यांचा लाभ शालेय व्यवस्थापन समितीमार्फत देण्याची नवीन योजना शासनाने सुरु केली आहे. त्याअनुषंगाने दि.०६ जुलै, २०२३ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. प्रस्तुत्त योजनेंतर्गत एक जोडी बुट व दोन जोडी पायमोजे याकरिता प्रति लाभार्थी विद्यार्थी रु.१७०/- असा दर निश्चित करण्यात आला आहे. तसेच, सदर योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणारे बुट एक समान दर्जाचे असण्याकरिता शासनाने दि.१६ जानेवारी, २०२४ रोजीच्या परिपत्रकान्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. 

सदर मार्गदर्शक सूचनांनुसार शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ मध्ये बुट व पायमोजे यांचा लाभ शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यानुसार आवश्यक ती पुढील कार्यवाही विहित वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे.


याकरिता संदर्भाधिन शासन निर्णय दि.०६ जुलै, २०२३शासन परिपत्रक दि.१६ जानेवारी, २०२४ नुसार शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना एक जोडी बुट व दोन जोडी पायमोजे यांचा लाभ देण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीमार्फत आवश्यक ती कार्यवाही होणे आवश्यक असल्याने शाळा व्यवस्थापन समितींना सूचना आपल्या स्तरावरुन देण्यात याव्यात. 

06 जुलै 2023 चे परिपत्रक डाउनलोड करा.

16 जानेवारी 2024 चे परिपत्रक डाउनलोड करा.



Post a Comment

0 Comments

close