Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टीतही मिळणार पोषण आहार | दुष्काळग्रस्त भागात प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचा लाभ देणेबाबत परिपत्रक व महत्त्वाच्या सूचना

राज्यातील जाहिर करण्यात आलेल्या दुष्काळग्रस्त भागामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना आता उन्हाळी सुट्टीतही मध्यान्ह भोजन म्हणजेच पोषण आहाराचा लाभ मिळणार आहे. 


राज्यातील तालुक्यांमध्ये माहे जून ते सप्टेंबर कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दूरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र व पीकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करुन या घटकांनी प्रभावित झालेल्या १५ जिल्ह्यांतील ४० तालुक्यांमध्ये 31/10/2023 च्या शासन निर्णयाद्वारे दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे. दुष्काळग्रस्त परिस्थिती घोषित केलेल्या भागाकरीता शासनाने विविध सवलती लागू केलेल्या आहेत.


दिर्घकालीन सुट्टीच्या कालावधीमध्ये पोषण आहार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.


१. दिर्घ सुट्टी माहे मे व जून २०२४ कालावधीकरीता शासकीय सुट्टया वगळून इतर कार्यदिन विचारात घेऊन कार्यवाही करावी.

२. दिर्घ सुट्टी कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना शाळास्तरावर शिजविलेला आहार उपलब्ध करुन देणेकरीता मुख्याध्यापक/शिक्षक (किमान १ जण) शाळेत उपस्थित राहील. याबाबत आपल्या स्तरावरुन सूचना देण्यात याव्यात.

३. सद्यस्थितीत राज्यामध्ये तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ हा सकाळ सत्रामध्ये (सकाळी ०९:३० वाजेपर्यंत) देण्यात यावा. तद्नंतर विद्यार्थ्यांना घरी पाठवावे.

४. शाळा प्रशासनाने आहार शिजविणेकरीता स्वयंपाकी/मदतनीस यांना तशा सूचना द्याव्यात.

५. शाळास्तरावर आहार शिजवून दिलेल्या कालावधीकरीता स्वयंपाकी/मदतनीस मानधन अदा करण्यात येणार आहे.

६. विद्यार्थी शाळेत उपस्थित राहून लाभ घेत असतील तर त्याची माहिती (विद्यार्थ्यांनी आहार घेतलेबाबतची माहिती) दैनंदिनरित्या ऑनलाईन पोर्टलवर भरली जाईल याची दक्षता घेण्यात यावी.

७. विद्यार्थ्यांना शाळेमध्ये आहार उपलब्ध करुन देण्याकरीता आपल्या स्तरावरुन क्षेत्रीय यंत्रणेस आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात.

८. ४० दुष्काळग्रस्त घोषित तालुक्यातील विद्यार्थी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या लाभापासून वंचित राहू नयेत, याबाबत दक्षता घ्यावी.

दिर्घकालीन सुट्टीच्या कालावधीमध्ये पोषण आहार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निर्देश बाबत परिपत्रक (30 April) डाउनलोड लिंक - Download


31/10/2023 च्या शासन निर्णयातील मुद्दा क्र. १० मध्ये नमूद केल्यानुसार दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या तालुक्यामधील शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजना (पीएम-पोषण योजना) दिर्घ सुट्टीच्या कालावधीत देखील राबविण्यात यावी. उक्त शासन निर्णयान्वये शासनाने दिलेल्या निर्देशानुसार आपल्या कार्यक्षेत्रातील दुष्काळग्रस्त भागामध्ये आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात.

पोषण आहार मध्यान्ह भोजन योजना दिर्घ सुट्टीत शासन परिपत्रक डाउनलोड करा. 



यापूर्वीच टंचाईग्रस्त / दुष्काळग्रस्त भागातील इ.10 वी व इ.12वी च्या विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती ही राज्यमंडळ स्तरावरून करण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. 

10वी, 12वी च्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करणे बाबत शासन निर्णय पहा.


सन 2024 सालातील शासन निर्णय - शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन- Click Here

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन महत्त्वाचे शासन निर्णय व परिपत्रके - Click Here

Post a Comment

0 Comments

close