PM SHRI योजनेतंर्गत शाळा, जिल्हा आणि राज्य स्तरावर राबवायचे उपक्रम - १.विद्या वैभव (Olympiad) २. मंथन मंडळ वाद विवाद संघ (Debat Club) ३. डिजिटल शोध (Digital Quest) ४. शोध घेणे आणि स्थानिक परिसराचा अभ्यास करणे. (Discover and Learn Local Sites)
PM SHRI Portal login - शाळेचा UDISE व HM Registered Mobile वरुन लॉगीन करता येईल.
PM SHRI Schools Login link - Click Here
केंद्र शासन पुरस्कृत PM SHRI योजनेतंर्गत महाराष्ट्र राज्यात पहिल्या टप्प्यात निवड झालेल्या ५१६ शाळा व दुसऱ्या टप्प्यात निवड झालेल्या ३११ अशा एकूण ८२७ शाळांना उत्तम गुणवत्तेच्या दृष्टीने इतर शाळांना मार्गदर्शक ठरतील अशा उदाहरण दाखल शाळा विकसित करावयाच्या आहेत. PM SHRI शाळांमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP २०२०) मधील शिफारशीच्या अनुषंगाने PM SHRI शाळांमध्ये उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावयाची आहे हे आपणांस ज्ञात आहे. म्हणजेच PM SHRI शाळांव्दारे इतर नजिकच्या शाळांना समतापूर्ण व आनंददायी वातावरणात उच्च गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी मार्गदर्शक शाळा म्हणून नेतृत्व करावयाचे आहे.
केंद्र शासनाच्या दि.२७/०९/२०२४ च्या पत्रान्वये शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने PM SHRI शाळांमध्ये १. Vidya Vaibhav (Olympiad) २. Manthan Mandal (Debate Club) ३. Digital Quest आणि Discover and Learn Local Sites इत्यादि उपक्रम पुढील २५ दिवसांत शाळा, जिल्हा आणि राज्य स्तरावर अंमलबजावणी करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
PM SHRI योजनेतंर्गत राबवायच्या उपक्रमांचे फायदे
- PM SHRI शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास चालना मिळेल.
- चिकीत्सक विचारास प्रोत्साहन मिळेल.
- सर्जनशीलतेस प्रोत्साहन मिळेल परिणामी PM SHRI शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व विकास विकसित होईल.
- सदर उपक्रमांमुळे तळागाळातील विद्यार्थ्यांच्या प्रतिभांची जोपासना होण्यास मदत होईल आणि त्यांना शाळा, जिल्हा आणि राज्य स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करण्याची संधी प्राप्त होईल.
- विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या वाढीस चालना मिळेल.
PM SHRI योजनेतंर्गत उपक्रमांची अंमलबजावणी
सर्व उपक्रमांची अंमलबजावणी जिल्हा व महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये वेळापत्रकानुसार करण्यात यावी. अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या नियमित उपक्रमांची अद्ययावत माहिती PM SHRI शाळांच्या सोशल मीडिया हँडलवर (फेसबुक, एक्स इ.) पोस्ट टाकण्यात यावीत. परिणामी PM SHRI योजनेविषयी जनजागृती निर्माण होण्यास मदत होईल.
तसेच जिल्हा व महानगरपालिकांनी PM SHRI शाळांमध्ये अंमलबजावणी करण्यात आलेल्या नियमित उपक्रमांची अद्ययावत माहिती गुगल ट्रॅकर भरण्यात यावी.
PM SHREE Google Tracker Link
https://docs.google.com/spreadsheets/d/1E1AslwYXxVMrerLepNG7UalL3Pwsw13JyuPuAJMPw80/edit?usp=sharing
सदर उपक्रमांची आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी शाळांना व अधिनस्त अधिकाऱ्यांना प्रोत्साहीत करावे. तसेच तालुका नोडल अधिकारी यांनी PM SHRI शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दररोज जिल्हा नोडल अधिकारी यांना सादर करणे. आणि जिल्हा नोडल अधिकारी यांनी या कार्यालयास अंमलबजावणी करण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती नियमित या कार्यालयास सादर करावी.
PM SHRI योजनेतंर्गत राबवायचे उपक्रम
- १.विद्या वैभव (Olympiad)
- २. मंथन मंडळ वाद विवाद संघ (Debat Club)
- ३. डिजिटल शोध (Digital Quest)
- ४. शोध घेणे आणि स्थानिक परिसराचा अभ्यास करणे. (Discover and Learn Local Sites)
PM SHRI योजनेतंर्गत राबवायच्या उपक्रमांचा कालावधी
- पुर्वतयारी - दि. १८ नोव्हेंबर, २०२४ ते दि. २२ नोव्हेंबर, २०२४
- शालेय स्तरावरील उपक्रम - दि.२६ नोव्हेंबर, २०२४ ते दि.२९ नोव्हेंबर, २०२४
- जिल्हा-स्तर स्पर्धा - दि.४ डिसेंबर, २०२४ ते दि.९ डिसेंबर, २०२४
- राज्यस्तरीय स्पर्धा दि.१० डिसेंबर, २०२४ ते दि.१२ डिसेंबर २०२४
PM SHRI शाळांमधील विद्यार्थ्यांना पुढील चार उपक्रमांचा परिचय करून देणे. उपक्रमाची पुढील २५ दिवसांत अंमलबजावणी करणे. सदर उपक्रमांची प्रगती शाळास्तरापासून ते राज्यस्तरापर्यंत पाहण्यात येईल. यशस्वी विद्यार्थ्यांना शाळा, जिल्हा व राज्यस्तरावर बक्षीसे प्रदान करण्यात येईल.
PM SHREE योजनेंतर्गत शाळा स्तरावरील उपक्रम व अंमलबजावणी बाबत मार्गदर्शक सूचना
१. विद्या वैभव (ऑलिम्पियाड)
विद्या वैभव (ऑलिम्पियाड) उपक्रमातंर्गत PM SHRI शाळांमध्ये प्रश्नमंजुषा, वादविवाद, सर्जनशीलता कला आणि खेळ अशा विविध प्रकारचे उपक्रमांचे आयेजन करण्यात यावेत.
उद्दिष्टः विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास चालना देणे, प्रतिभांचे संगोपन करणे, निरोगी स्पर्धेस प्रोत्साहित करणे आणि सर्जनशीलता आणि उपक्रमासाठी प्रोत्साहन देणे.
उपक्रम :- प्रश्नमंजुषा, वादविवाद, सर्जनशील कला आणि खेळ
अंमलबजावणी :- सदर उपक्रमात PM SHRI शाळांनी तयार केलेल्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांची नोंदणी करणे, सदर नोंदणी डिजिटल पध्दतीने करणे. विद्यार्थ्यांची नोंदणी सुलभ पध्दतीने करण्याच्या अनुषंगाने Google Forms लिंक तयार करणे, PM SHRI शाळा सर्वप्रकारच्या स्पर्धामधील विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे निरीक्षण करण्याच्या अनुषंगाने निष्पक्ष मूल्यमापन करण्यासाठी पंचाची नियुक्ती करणे.
२. मंथन मंडळ वाद विवाद संघ (Debat Club)
मंथन मंडळ वाद विवाद संघ (Debat Club) अंतर्गत सर्व PM SHRI शाळा मध्ये सद्य:स्थितील चालू घडामोडींवर आधारित चर्चा सत्रांचे आयोजन करणे. जसे, विकसित भारत आणि एक राष्ट्र, एक निवडणूक यावर चर्चा करणे.
उद्दिष्टः नेतृत्व आणि संघकार्याची भावना रुजविणे, विश्लेषणात्मक कौशल्ये, वादविवाद, सहयोगी शिक्षणास चालना देणे आणि चिकीत्सक विचार कौशल्ये विकसित करणे.
उपक्रम :- १. विकसित भारत आणि त्याचे आकृतिबंधक स्वरूप २. एक राष्ट्र एक निवडणूक
अंमलबजावणी :- PM SHRI शाळा विकसित भारत आणि एक राष्ट्र एक निवडणूक या विषयांवर विविध वर्गातंर्गत औपचारिक वादविवाद स्पर्धांचे आयोजन PM SHRI शाळांमध्ये करतील.
वादविवाद, तथ्य-तपासणी आणि युक्तिवाद कसे करावे याबाबत कार्यशाळेचे आयोजन PM SHRI शाळांमध्ये करतील.
शाळांमधे छोट्या-छोट्या गटांमध्ये गट चर्चेचे आयोजन करतील यामध्ये विद्यार्थी निवडलेल्या विषयांवर विविध दृष्टिकोनातून आपले सादरीकरण करतील यामध्ये विशेषतः संघकार्याची भावना आणि सर्व सहभागाने अध्ययन होईल असे पाहावे.
छोट्या विद्यार्थ्यांना प्रेक्षक म्हणून सदर उपक्रमात सहभागी करणे.
प्रश्न आणि उत्तरांच्या फेऱ्यांमध्ये प्रेक्षकांना सहभागी करून घेणे.
वादविवाद विषयांचे संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या समित्यांचे गठन करणे.
३. डिजिटल शोध (Digital Quest)
PM SHRI शाळांमध्ये डिजिटल शोध (Digital Quest) आयोजित करून जेथे विद्यार्थी सामाजिक समस्यांचा शोध घेतील जसे, पर्यावरण, खेळ आणि समाज माध्यमाव्दारे मोहिमा राबविण्यासाठी डिजिटल साधनांचा (संगणक, टॅबलेट) इत्यादिचा वापर करून सोशल मिडिया मोहिमे चालवतील व यासाठी शिक्षकांचे सहाय्य घेणे.
उद्दिष्टः डिजिटल साक्षरता विकसित करणे. आणि नैतिक आणि जबाबदारपणे समाज माध्यमाचा उपयोग करून सामाजिक जागृकतता निर्माण करणे.
उपक्रम :- सामाजिक प्रश्नांवर डिजिटल शोध (उदा. पर्यावरण, क्रीडा, शिक्षण, लैंगिक समानता, लोकशाही, मानवी हक्क इ.)
अंमलबजावणी :- सामाजिक समस्या ओळखण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण व्हावा यासाठी विचारमंथन सत्राचे आयोजन करणे.
सदर उपक्रमासाठी सोशल मीडियासाठी साधने (इन्स्टाग्राम, द्विटर, फेसबुक, कॅनव्हा) इत्यादिंचा वापर करणे.
PM SHRI शाळांमधील विद्यार्थ्यांनी पर्यावरण, क्रीडा, शिक्षण, लैंगिक समानता, लोकशाही, मानवाधिकार इत्यादी विषयांवर सोशल मीडियाव्दारे मोहीमा राबविणे,
शाळानिहाय हॅशटॅग चॅलेंजेस्चे आयोजित करणे ज्यामध्ये विद्यार्थी सामाजिक समस्यांना ओळखून सृजनशील दृष्टीकोनातून हॅशटॅग तयार करतील.
प्रतिमा, व्हिडिओज्, पोस्टर इत्यादिचा कृति आराखडा तयार करण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना मदत करतील.
PM SHRI शाळांमध्ये विद्यार्थ्यांना नैतिक आणि सोशल मीडियाचा वापर, सायबर सुरक्षितता, जबाबदारपणे डिजिटल साहीत्य वापरण्याबाबतच्या वर्तनास प्रोत्साहीत करणे इत्यादिंसाठी कार्यशाळेचे आयोजन करणे.
विद्यार्थ्यांच्या नियमित शिक्षणाचा भाग म्हणून सहभागी झाल्याबाबत त्यांचे नियमित माहिती अद्ययावत ठेवणे. जसे, आवडी, अभिप्राय आणि आंतरक्रिया कृती इ.
४. शोध आणि स्थानिक परिसराचा अभ्यास करणे. (Discover and Learn Local Sites)
शोध घेऊन स्थानिक परिसराचा अभ्यास करणे. यामध्ये, PM SHRI शाळा त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी छोटया-छोट्या गटांमध्ये त्यांच्या स्थानिक परिसरातील इतिहास, ऐतिहासिक बाबी जाणून घेण्यासाठी जुने चित्रणे, वर्तमानपत्रांची कात्रणे आणि अक्षरे आणि वर्तमान स्थितीतील शोधाबाबत आपल्या सर्जनशिलतेच्या कल्पनांव्दारे सादरीकरण करणे जसे, स्थानिक परिसरातील वेशभूषा आणि कलात्मक छायाचित्रे.
उद्दिष्टेः सांस्कृतिक आणि ऐतिहासिक जागरूकता वाढविण्यास प्रोत्साहन देणे, सामुदायीक आणि आपलेपणाची भावना निर्माण करणे, निरीक्षण आणि माहिती जाणून घेण्याबाबत सक्षमीकरण आणि सादरीकरणे कौशल्ये विकसित करणे.
उपक्रम :- संशोधन सत्रांचे आयोजन करणे यामध्ये जुने चित्रणे, वर्तमानपत्रांची कात्रणे आणि स्थानिक कथांची माहिती घेऊन स्थानिक परिसरातील महत्त्वाच्या बाबी जाणून घेणे.
अंमलबजावणी :- शाळांमध्ये स्थानिक इतिहासकार किंवा जुने जाणकार असलेल्या ज्येष्ठांना त्या परिसरातील सखोल माहिती असल्यामुळे ते जाणून घेण्यासाठी त्यांना आमंत्रित करणे.
महत्त्वाच्या स्थानिक स्थळांना भेटी देण्यासाठी भेटीचे आयोजन करणे.
प्रकल्प कृती कार्यासाठी विद्यार्थ्यांचे छोट्या-छोट्या गटांमध्ये गठण करणे,
PM SHRI शाळांमध्ये यशोगाथांचे सादरीकरण करण्यासाठी लघु- प्रदर्शनांचे आयोजन करणे.
0 Comments