Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 - ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना सन 2024 चा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा २०२४ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत केली. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्यातील सर्वौच्च नागरी सन्मान आहे. २५ लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह व शाल असे या पुरस्कारचे स्वरूप आहे.




मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, १२ मार्च २०२५ रोजी झालेल्या निवड समितीच्या बैठकीत राम सुतार यांचे नाव २०२४ च्या पुरस्कारासाठी निश्चित करण्यात आले. राम सुतार हे ज्येष्ठ शिल्पकार आहेत. त्यांचे वय सध्या १०० वर्ष असून अजूनही ते शिल्प तयार करण्याचे काम करीत आहेत.


महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्य शासनाकडून देण्यात येणारा हा सर्वात मोठा पुरस्कार आहे. आरोग्यसेवा, उद्योग, कला, क्रीडा, पत्रकारिता, लोकप्रशासन, विज्ञान आणि समाजसेवा या क्षेत्रांत केलेल्या विशेष योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो. या क्षेत्रात महाराष्ट्राचे नाव देशात आणि जगभर नेणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यास सन १९९५ पासून सुरुवात झाली. यावर्षी राम सुतार यांचे नाव २०२४ च्या पुरस्कारासाठी निश्चित करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांचा 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' निर्माण करून देशाच्या अस्मिताचिन्हाचा गौरव करणारे राम सुतार हे शिल्पकलेतील भीष्माचार्य आहेत, असे गौरवोद्‌गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.


सुतार यांनी गुजरातमध्ये स्थित जगातील सर्वात उंच पुतळा 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ची रचना केली. त्यांनी ४५ फूट उंच चंबळ स्मारक तसेच महात्मा गांधींचा एक अर्धपुतळा देखील उभारला, ज्याची प्रत बनवून इतर देशांमध्ये पाठवण्यात आली. त्यांनी भारतीय संसदेत बसलेल्या स्थितीत महात्मा गांधींचा पुतळा डिझाइन केला. 



महाराष्ट्राच्या मातीत घडलेला शिल्पकार

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार हे मुळचे धुळे जिल्ह्यातील आहेत.

मुंबईतील जेजे स्कूल ऑफ आर्टमधून त्यांनी त्याचं शिक्षण पूर्ण केलं. तेव्हापासून आत्तापर्यंत त्यांनी स्वतःला शिल्पकलेला वाहून घेतलं आहे.

त्यांनी बनवलेल्या अनेक कलाकृती भारतात आणि जगभरात कौतुकाच्या विषय ठरल्या.

त्यांनी घडवलेल्या महात्मा गांधींच्या अर्धपुतळ्याचंही खूप कौतुक झालं आहे.

फ्रान्स, अमेरिका, इटली, अर्जेंटिना, रशिया, इंग्लंड, मलेशिया, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, चीन, इजिप्त, पोलंड, दक्षिण आफ्रिका आणि इतर अनेक शहरांसह जगभरातील 450 हून अधिक शहरांमध्ये त्याची स्थापना करण्यासाठी निवड देखील झाली आहे.

त्यांच्याकडून शिल्पकला शिकण्यासाठी जगभरातील अनेक कलाकारांनी त्यांच्या स्टुडिओला भेट दिली आहे. अनेकांनी त्यांच्या कलाकृतींची तुलना रोडिन आणि मायकेल एंजेलो यांच्या कौशल्याशी देखील केली आहे.

आज 'राम सुतार आर्ट क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड' आणि 'राम सुतार फाइन आर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड' या भव्य शिल्पं तयार करणाऱ्या त्यांच्या कंपन्यांची जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये गणना होते.

उत्तर प्रदेशातील नोएडा येथे त्यांचा भव्य स्टुडिओ आहे.

जगातील सर्वात मोठा पुतळा बनवण्याची होती इच्छा

शालेय जीवनात असताना त्यांनी पहिल्यांदा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचे फोटो पाहिले होते तेव्हापासून त्यांना जगातील सर्वात मोठा पुतळा बनवण्याची खूप इच्छा होती.

दरम्यान, गुजरातमधील साधू बेट येथील सरदार सरोवर धरणावर स्टॅच्यू ऑफ युनिटी स्थापित झाल्यानंतर त्यांचं हे स्वप्न पूर्ण झालंच.

522 फूट उंच असलेला सरदार वल्लभ भाई पटेल यांचा हा पुतळा जगातील सर्वात मोठा पुतळा मानला जातो.


राज्य शासनाने प्रख्यात लेखक पु. ल. देशपांडे यांना पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांच्या साहित्य सेवेतील योगदानाबद्दल गौरविले होते. त्यानंतर गानसम्राज्ञी लता मंगेशकर (संगीत), ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावसकर (क्रीडा),  ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर (विज्ञान), क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर (क्रीडा), पंडीत भीमसेन जोशी (कला/संगीत), सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग व राणी बंग (सामाजिक प्रबोधन), ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे (सामाजिक प्रबोधन), ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर (विज्ञान), उद्योगपती रतन टाटा (उद्योग), रा. कृ. पाटील (समाजरप्रबोधन), कवीवर्य मंगेश पाडगावकर (साहित्य), नानासाहेब धर्माधिकारी (समाजप्रबोधन), ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर (मराठी चित्रपट), ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर (विज्ञान), ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर (विज्ञान), शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (साहित्य), ज्येष्ठ गायिका आशा भोसले (संगीत) आणि निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (समाजप्रबोधन) श्री. अशोक सराफ (नाटक/चित्रपट) यांना राज्य शासनाने यापूर्वी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन  गौरविले आहे.


Post a Comment

0 Comments

close