दिनांक 02 ऑक्टोबर 2026 ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत चंद्रपूर येथे अग्निवीर सैन्य भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर सैन्य भरती प्रक्रियेदरम्यान भाषिक समन्वयाकरिता आवश्यक सूचना स्थानिक भाषेत प्रसारित करण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्याबाबत निर्देश प्राप्त झाले आहेत.
चंद्रपूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या या पत्रानुसार 2 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत अग्निवीर सैन्य भरतीच्या कामासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित शिक्षकांनी सकाळी 8 वाजता तालुका क्रीडा संकुल, विसापूर येथे उपस्थित राहायचे आहे. दररोज वेगवेगळ्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून उपस्थितीची नोंद ठेवण्यात येणार आहे. त्याकरिता संबंधित शिक्षकांना कार्यमुक्त करणेबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.
वा! 👏शिक्षक म्हणजे शिक्षक कमी आणि “सर्व कामांसाठी उपलब्ध मनुष्यबळ” जास्त!
अग्निवीर भरती ही महत्त्वाची शासकीय प्रक्रिया आहे, यात दुमत नाही. पण त्यासाठी विशेष प्रशिक्षित मनुष्यबळ, संबंधित विभागातील कर्मचारी किंवा स्वतंत्र भरती पथक उपलब्ध करून देण्याऐवजी पुन्हा शिक्षकांचीच निवड का?
कारण शिक्षक उपलब्ध असतात?
की “शिक्षकांना आणखी एक काम दिलं तरी ते करतील” असा प्रशासनाचा समज झाला आहे?ज्या शिक्षकांना त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पूर्ण वेळ देणे अपेक्षित आहे, त्यांनाच वारंवार शैक्षणिकेतर कामांसा
सवाल?
शिक्षकांना अजून एक काम मिळालं! शिक्षणाचं काम थोडं कमी झालंय की काय? म्हणून आता शिक्षकांना आणखी एक जबाबदारी देण्यात आली आहे. असा सवाल शिक्षकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.



0 Comments