Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कृषी पदवी अभ्यासक्रम; प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना २२ जूनपर्यंत नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. सीईटी कक्षाच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाडामुळे विद्यार्थ्यांना प्रक्रिया पूर्ण करताना अडचणी येत आहेत.
कृषी विद्याीपठांतर्गत असलेल्या बीएससी ऑनर्स-कृषी, बीएससी ऑनर्स-उद्यानविद्या, बीएससी ऑनर्स-वनविद्या, बी. टेक. कृषी अभियांत्रिकी, बी. टेक. अन्न-तंत्रज्ञान, बीएससी ऑनर्स-सामाजिक विज्ञान, बी. टेक. जैवतंत्रज्ञान, बीएफएससी मत्स्यशास्त्र या अभ्यासक्रमांसाठीची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना सीईटी गुण, शैक्षणिक माहिती, पसंतीक्रम भरावयाचा आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना मूळ प्रमाणपत्र स्कॅन करून अपलोड करायचे आहेत. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे प्रक्रिया सुरू आहे. प्रक्रिया सुरू असलेल्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने प्रक्रिया ठप्प आहे. अभियांत्रिकी, औषधिनर्माणशास्त्र, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट अशा अभ्यासक्रमासाठी कागदपत्र तपासणीची, तर कृषी अभ्यासक्रमांसाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. सर्व्हरमध्ये तांत्रिकमध्ये बिघाड असल्याने विद्यार्थी, पालकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. यामुळे महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने प्रवेशाचे दिलेले वेळापत्रकही लांबण्याची शक्यता आहे. प्रवेशाची प्रक्रिया चार फेऱ्यांमध्ये होणार आहे.

Post a Comment

0 Comments

close