Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांचे मुंबईत उपोषण

म. टा. वृत्तसेवा
२००५ पूर्वी नियुक्त परंतु त्यानंतर शंभर टक्के अनुदान प्राप्त राज्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना रद्द केल्याच्या निषेधार्थ शिक्षण संघर्ष समितीतर्फे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे. राज्यभरातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा या उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी जोपर्यंत मंजूर होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नसल्याची माहिती शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्ष संगीता शिंदे यांनी दिली आहे. राज्यातील १ नोव्हेंबर २००५ पुर्वी नियुक्त परंतु त्यानंतर शंभर टक्के अनुदान प्राप्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना रद्द करून नवी पारिभाषित अंशदान पेन्शन योजना शासनाने लागू केली आहे. या शासन निर्णयाला राज्यभरातील सर्व शिक्षक आमदारांसह सर्व शिक्षक संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या निर्णयाचा फटका राज्यातील सुमारे तीस हजार शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बसला आहे. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी सर्व शिक्षक संघटनांची एकीकृत अशी शिक्षण संघर्ष संघटनेतर्फे संगीता शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर सोमवारपासून उपोषण सुरू आहे. या उपोषणासाठी नाशिक जिल्ह्यातून नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ, नाशिक जिल्हा टीडीएफ, नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, शिक्षकेतर संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत. जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करून नवीन पेन्शन योजनेचा शासननिर्णय रद्द होत नाही तोपर्यंत उपोषण सुरुच ठेवण्याचा या सर्व शिक्षक संघटनांने पक्का निर्धार केला आहे. या उपोषणात नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख, मोहन चकोर, बी. डी. गांगुर्डे, बी. व्ही. पांडे, जी. ए. काटे, सचिन पगार, योगेश पाटील, नीलेश ठाकूर आदी सहभागी झाले आहेत.

Post a Comment

0 Comments

close