WhatsApp ने नुकतेच आपल्या पॉलिसी मध्ये काही बदल केले आहेत. तुम्ही जर WhatsApp ची पॉलिसी स्विकारली नाही तर तुम्हांला WhatsApp वापरता येणार नाही.
कंपनीने भारतात नवीन पॉलिसी नोटिफिकेशन पाठवायला सुरुवात केली आहे. WhatsApp च्या नवीन पॉलिसीनुसार तुमचा डाटा फेसबूक व इंस्टाग्राम सोबत शेअर केला जाणार आहे.
८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत डेडलाईन
फेसबुकची मालकी असलेल्या इंस्टेंट मेसेजिंग ॲप WhatsApp ने आपली टर्म्स आणि प्रायव्हसी पॉलिसीला अपडेट केले आहे. याचे नोटिफिकेशन भारतात मंगळवारपासून हळूहळू युजर्संना देण्यात येत आहे. व्हॉट्सॲपने युजर्संना नवीन पॉलिसीला ॲक्सेप्ट करण्यासाठी ८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत डेडलाईन दिली आहे. ही पॉलिसी ॲक्सेप्ट केली नाही तर तुमचे व्हॉट्सॲप अकाउंट डिलीट होईल.
Read also
How can you Record WhatsApp Video Call?
WhatsApp युजर्संना जर आपले अकाउंट कायम ठेवायचे असेल तर त्यांना नवीन पॉलिसीला ॲक्सेप्ट करावे लागणार आहे. यासाठी दुसरा कोणताही ऑप्शन युजर्संना देण्यात आला नाही. सध्या या ठिकाणी नॉट नाउ चा ऑप्शन दिसत आहे. जर तुम्ही नवीन पॉलिसीला काही वेळेसाठी ॲक्सेप्ट केले नाही तर तुमचे अकाउंट काही काळासाठी सुरू राहिल.
नवीन पॉलिसीत फेसबुक आणि इंस्टाग्रामचे इंटिग्रेशन जास्त आहे. आता युजर्सचा आधीच्या तुलनेत जास्त डेटा फेसबुककडे राहिल. व्हॉट्सॲपचा डेटा आधीच फेसबुक सोबत शेयर केला जात होता. परंतु, कंपनीने स्पष्ट केले आहे की, फेसबुक सोबत व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामचे इंटिग्रेशन जास्त राहिल.
Read this
QR Code च्या मदतीने पाठवा WhatsApp संदेश कसे ते पहा.
WhatsApp कोणता डाटा शेअर करेल?
व्हॉट्सॲपच्या अपडेटेड पॉलिसीत तुम्हाला कंपनीने देण्यात आलेल्या लायसन्स मध्ये काही गोष्टी लिहिलेल्या आहेत. यात लिहिले की, आमच्या सर्विसला ऑपरेट करण्यासाठी व्हॉट्सॲपला जो कंटेंट तुम्ही अपलोड, सबमिट, स्टोर, सेंड किंवा रिसिव्ह करत आहात त्याचा वापर रिप्रोड्यूस, डिस्ट्रीब्यूट आणि डिस्प्ले करण्यासाठी जगभरात नॉन एक्सक्लूसिव, रॉयल्टी फ्री, सब्लिसेंसेबल आणि ट्रान्सफरेबल लायसन्स देत आहे. तसेच यात लिहिले आहे की, या लायसन्समध्ये तुम्हाला देण्यात आलेला अधिकार आमची सेवेसाठी संचालन आणि उपलब्ध करण्यासाठी सिमित उद्देशसाठी आहे.
हे ही वाचा.
0 Comments