Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

NTS EXAM 13 जून रोजी होणारी राष्ट्रीयस्तर परीक्षा पुढे ढकलली

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दि. १३ डिसेंबर २०२० रोजी इ. १० वी तील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या राज्यस्तर राष्ट्रीय प्रज्ञाशोध (NTS) परीक्षेतून राष्ट्रीयस्तर परीक्षेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्याची परीक्षा NCERT नवी दिल्ली यांचेमार्फत दि. १३ जून २०२१ रोजी घेण्यात येणार होती. ती आता पुढे ढकलण्यात येत आहे. 

परंतु देशात व राज्यात सद्यस्थितीनुसार कोरोना (COVID-१९) विषाणूंचा वाढता प्रभाव लक्षात घेता सदरची परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. सदरच्या परीक्षेची दिनांक यथावकाश NCERT नवी दिल्ली व परिषदेच्या संकेतस्थळावरून कळविण्यात येईल. 

Model Question paper 


हे ही वाचा.


योजनेचे उद्दिष्ट :- इयत्ता १० वीच्या अखेर प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुध्दिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे, या सहाय्यातून त्यांची बुद्धिमत्ता विकसित व्हावी आणि त्या विकसित बुद्धिमत्तेने त्या विद्यार्थ्यांनी आपली विद्याशाखा व राष्ट्र यांची सेवा करावी, ही या योजनेची उद्दिष्टे आहेत.

निवडपध्दती :- राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT), नवी दिल्ली यांचेमार्फत २०१२-१३ पासून राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (NTS) इ. १० वी साठी दोन स्तरावर घेण्यात येते. 

Post a Comment

0 Comments

close