Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राज्यातील शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरु करणे आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थिती बाबत.....

कोविड 19 च्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये याही वर्षी राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे शैक्षणिक वर्ष ऑनलाईन सुरु करण्यात येत आहे. शाळांमध्ये शिक्षक उपस्थिती 50% राहील (इ.10वी व 12वी सोडून) याबाबतचे आदेश शिक्षण संचालक यांनी दिले आहेत.  शिक्षण संचालक यांचे परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. 


राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना दिनांक १४ जून २०२1 पर्यंत विदर्भासाठी दिनांक २७ जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. त्यानूसार दिनांक १५ जून, २०२१ पासून राज्यातील शाळांचे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ सुरु करण्यात येत आहे. विदर्भातील शाळांचे शैक्षणिक वर्ष दिनांक २८.०६.२०२१ पासून सुरु होईल. 

इ. 1ली ते इ. 12वी साठी डी डी सह्याद्री वाहिनीवर ज्ञानगंगा शैक्षणिक कार्यक्रम 14 जून पासून सुरु.... प्रत्येक आठवड्याचे वेळापत्रक पहा.

वार्षिक नियोजन, मासिक नियोजन व वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

सद्या कोरोना च्या परिस्थितीचा विचार करता शाळा विद्यार्थ्यांविनाच सुरु होणार आहेत. शाळेत विद्यार्थी नसले तरी 15 जून पासून ऑनलाईन शैक्षणिक अध्यापनाचे काम सुरु करावयाचे आहे. शाळेतील शिक्षकांच्या उपस्थिती बाबत वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळी परिपत्रके काढण्यात आली होती. काही जिल्ह्यात 100% शिक्षक उपस्थिती अनिवार्य करण्यात आली होती. मात्र आता शिक्षण संचालकांच्या नवीन आदेशामुळे राज्यातील शाळांमध्ये शिक्षक उपस्थिती बाबत एकवाक्यता येणार आहे. 

शाळेमध्ये /कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थिती अशी राहील. 

१. इयत्ता १ ली ते इयत्ता ९ वी व इयत्ता ११ वीचे ५० टक्के शिक्षक उपस्थिती अनिवार्य राहील. 

२. इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी चे १०० टक्के शिक्षक उपस्थिती अनिवार्य राहील. 

३. शिक्षकेतर कर्मचारी यांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य राहील.

४. प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी १०० टक्के उपस्थित राहणे अनिवार्य आहे.


इयत्ता १० वी व इयत्ता १२ वीचा निकाल तयार करण्यासाठी मुल्यांकनाचे काम सुरू असून मर्यादित वेळेत सदर निकाल घोषीत करावयाचा असल्याने राज्यातील विदर्भासह इयत्ता १० वी व इयत्ता १२ वीला शिकविणाऱ्या शिक्षकांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य राहील याबाबत सर्व संबंधित व्यवस्थापनांना सूचना निर्गमित करण्याबाबत आदेशात म्हटले आहे. 

इ. 10 वी मूल्यमापनासाठी Excel Sheet व मूल्यमापन करण्यासाठी SCERT बोर्डाच्या वतीने मार्गदर्शन you tube live

बृहन्मुंबई शहरातील शिक्षकांच्या शाळा / कनिष्ठ महाविद्यालयातील उपस्थिती करीता त्यांना लोकलद्वारे प्रवासाच्या सोयीबाबत शासन स्तरावरून यथोचित सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.

कोविड १९ परिस्थितीमुळे पुढील सुचनेपर्यंत शाळा बंद असल्यातरी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे (SCERT) यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे ऑनलाईन व इतर माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरळीतपणे सुरू राहील याची दक्षता घेण्यात यावी. 

Post a Comment

0 Comments

close