शैक्षणिक वर्ष २०२2-२3 साठी अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती योजनेची अर्ज नोंदणी सुरू झाली आहे. 15 नोव्हेंबर पर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज दाखल करता येईल.
अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यास डायरेक्ट लिंक व अंतिम मुदत - Click Here
विद्यार्थ्यांनी योग्य कागदपत्रांसह हा अर्ज दाखल करणे तसेच कॉलेजमध्ये जमा करणे गरजेचे आहे. अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालय यांच्यामार्फत भारत सरकारने निश्चित केलेल्या सहा अल्पसंख्यांक समाजाच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. मॅट्रिकपूर्व, मॅट्रिकोत्तर आणि गुणवत्ताधारक विद्यार्थी अशा तीन स्तरावर ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना देण्यात येते. मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौध्द, पारशी आणि जैन समाजातील विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज दाखल करू शकतात.
सेतू अभ्यासक्रम (bridge course 30 days) इयत्तानिहाय डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.
सेतू चाचणी इयत्ता व विषयनिहाय प्रश्नपत्रिका संच (मराठी+सेमी एकत्रित)
अर्जदाराला शालेय परीक्षांमध्ये ५० टक्के गुण असणे अनिवार्य आहे. अर्जासोबत चालू बँक खात्याची योग्य माहिती भरावी. जेणेकरून शिष्यवृत्तीची रक्कम योग्य ठिकाणी व वेळेत जमा होईल. असे आवाहन अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालयाद्वारे करण्यात आले आहे.
अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यासाठी लिंक
नवीन व नुतनीकरण अर्ज नोंदणी लिंक | New and Renewal Application link - Click Here
Defected अर्ज दुरुस्ती बाबत सूचना
ज्या विद्यार्थ्यांचे मोबाईल क्रमांक duplicate आढळले( एका मोबाईल क्रमांक वर एकापेक्षा जास्त अर्ज Nsp पोर्टल वर असणे) अशा सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज system द्वारे defect करण्यात आलेले आहे. कृपया अशा सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज विहित मुदती मध्ये दुरुस्त करण्यात यावे.
Minority scholarship विद्यार्थ्याच्या लॉगिन मध्ये update mobile/bank details या मेनू मधून विद्यार्थ्याचे डिटेल्स दुरुस्ती करू शकता. शाळा स्तरावर एक ही डिफेक्ट केलेला अर्ज प्रलंबित राहणार नाही तसेच पडताळणीसाठी एकही प्रलंबित अर्ज शाळा स्तरावर राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
सर्व कार्यवाही विहित मुदतीत मध्ये करण्यात यावी.
अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती 2022-23 साठी कसा करावा अर्ज ?
1) प्रथमच शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना (नवीन विद्यार्थी) पोर्टलवर “विद्यार्थी नोंदणी फॉर्म” मधील त्यांच्या कागदपत्रांवर छापल्याप्रमाणे अचूक व प्रमाणित माहिती पुरवून नव्याने अर्जदार म्हणून पोर्टलवर “नोंदणी” करणे आवश्यक आहे.
2) नोंदणी दिनांक 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांचे पालक / पालकांनी भरलेले असणे आवश्यक आहे.
3) नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना / पालकांना / पालकांना खालील कागदपत्रे तयार ठेवायची आहे :
I. विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे
II. विद्यार्थ्यांचा बँक खाते क्रमांक आणि बँक शाखेचा आयएफएससी कोड
III.विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक
IV.आधार नोंदणी आयडी किंवा बँक पासबुकची स्कॅन केलेली प्रत
4) अर्ज सबमिट केल्यानंतर, एनएसपी पोर्टलवर लॉग इन करण्यासाठी डीफॉल्ट लॉगिन आयडी आणि संकेतशब्द प्रदान केलेल्या मोबाइल नंबरवर पाठविला जाईल. जर संकेतशब्द प्राप्त झाला नसेल तर लॉगिन पृष्ठावरील विसरलेल्या संकेतशब्दाचा पर्याय वापरायचा आहे.
5) विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्जात सक्षम प्राधिकरणाने दिलेल्या उत्पन्नाच्या दाखल्यानुसार “वार्षिक कौटुंबिक उत्पन्न” प्रमाणपत्र सादर करायचा आहे
अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती 2022-23 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक –
1) नवीन New - Click Here
राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर fresh विद्यार्थी नोंदणीसाठी मार्गदर्शक तत्त्वे
मार्गदर्शक video पहा. 👇
2) नुतनीकरण Renewal - Click Here
मार्गदर्शक video पहा. 👇
अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती फॉर्म /अर्ज दाखल करण्यासाठी अधिकृत वेबसाईट होम पेेेज साठी–येथे क्लिक करा
अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती सन २०२2-२3 ची अधिक माहिती पुढील वेबसाइटवरुन आपल्याला घेता येईल.
तसेच अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती २०२2-२3 बाबत १८००११२००१ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता.
0 Comments