Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिक्षक दिनानिमित्त Thank A Teacher अभियानांतर्गत शिक्षक कार्य गौरव सप्ताह राबविणेबाबत....

5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त Thank A Teacher अभियानांतर्गत शिक्षक कार्य गौरव सप्ताह दि. ०२ सप्टेंबर २०२१ ते ०७ सप्टेंबर २०२१  या कालावधीत राबविणेबाबत शासन निर्णय निर्गमित... 

प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात शिक्षकांचे महत्व अनन्यसाधारण आहे. शिक्षक आपल्या अध्ययन अध्यापनातून व्यक्ती, समाज आणि राष्ट्राची निर्मिती करतो. त्यांच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन जीवनात यशस्वी होण्यासाठी त्याला प्रेरणा मिळते. शिक्षण क्षेत्रांमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी संपूर्ण देशामध्ये दरवर्षी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या • जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्त सन २०२०-२१ मध्ये Thank A Teacher अभियान राबविले होते. यावर्षी देखील शिक्षकांचा गौरव करण्यासाठी Thank A Teacher अभियानांतर्गत शिक्षक कार्य गौरव सप्ताह साजरा करण्यासाठी शासनाने निर्णय घेतला आहे. 

शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. 

Thank a Teacher अभियानांतर्गत शिक्षक कार्य गौरव सप्ताह गट पहिला इ. 1ली ते इ. 5वी

Thank a Teacher अभियानांतर्गत शिक्षक कार्य गौरव सप्ताह गट दुसरा इ. 6वी ते इ. 8वी

Thank a Teacher अभियानांतर्गत शिक्षक कार्य गौरव सप्ताह गट तिसरा इ. 9वी ते इ. 12वी

विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये शिक्षकाची अत्यंत महत्वाची भूमिका असते. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा गौरव केला जातो. तसेच विद्यार्थी देखील शिक्षकांविषयीच्या आपल्या भावना या दिवशी विविध उपक्रमांच्या माध्यमाद्वारे व्यक्त करत असतात. सद्यस्थितीत कोविड- १९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व ठिकाणी शाळा नियमितपणे सुरु करता आलेल्या नाहीत. तरी देखील अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु रहावे यासाठी दुर्गम भागातील अनेक शिक्षकांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना घरी जाऊन, समुह मार्गदर्शन वर्ग आयोजित करून विविध प्रकारे मार्गदर्शन करून शेवटचा विद्यार्थी शिक्षण प्रवाहात राहण्यासाठी प्रयत्न केले आहे. विविध मार्गाने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु ठेवण्यासाठी आणि विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी शिक्षक सातत्याने प्रयत्न करत आहेत. 

Thank A Teacher अभियानांतर्गत उपक्रमांचे Videos / photos कसे अपलोड करावेत❓ स्पर्धेसाठी नोंदणी कशी करावी❓

Thank A Teacher अभियानांतर्गत शिक्षक कार्य गौरव सप्ताह

  • सर्व शिक्षकांविषयी आदर व आभार व्यक्त करण्यासाठी शासनाने दि. ०२ सप्टेंबर २०२१ ते ०७ सप्टेंबर २०२१ या कालावधीत Thank A Teacher अभियानांतर्गत शिक्षक गौरव सप्ताह साजरा करण्याचे ठरविले आहे. 
  • राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी मधील विद्यार्थ्यासाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. 
  • या कालावधीमध्ये शालेय स्तरावर निबंध लेखन, काव्य वाचन, काव्य लेखन, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करावे.
  • सदर उपक्रमांचे ऑनलाईन/ऑफलाईन स्वरुपात आयोजन करावे.  
  • शिक्षकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात यावा.
  • यामध्ये शाळा, विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर व समाज यांचा सक्रीय सहभाग घेण्यात यावा.






📚शिक्षक समाज परिवर्तनाचे माध्यम निबंध लेखन

शिक्षक दिनानिमित्त Thank A Teacher अभियानांतर्गत खालील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.

शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. 

गट निहाय राबविण्यात येणारे उपक्रम


दिवसनिहाय सेतू अभ्यासक्रम PDF  इ. 2री ते इ. 10वी (45 दिवस) 1 july to 14 August updated

Bridge Course  PDF for Std 2 - Std 10 

सेतू अभ्यासक्रम (bridge course) इयत्तानिहाय डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. 

सेतू चाचणी क्र. 1, 2 व 3 इयत्ता निहाय प्रश्नपत्रिका संच (मराठी+सेमी एकत्रित) 

उपरोक्त प्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करून त्याचे व्हिडीओ, फोटो व इतर साहित्य समाजमाध्यामांवर

Facebook-@thxteacher, 

Go to Facebook - Click Here

Twitter-@thxteacher, 

Go to Twitter - Click Here

Instagram-@thankuteacher 

Go to Instagram - Click Here

Go to Telegram - Click Here

अशा प्रकारे टॅग करुन पलोड करावेत. यावेळी पुढील हॅशटॅग (#) चा वापर करावा.

#ThankATeacher

#ThankYouTeacher

#MyFavourite Teacher!

#MyTeacherMyHero

#ThankATeacher2021

या हॅशटॅग (#) चा वापर करावा.


यामधील सर्वोत्तम असलेल्या कार्यक्रमापैकी "राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद” महाराष्ट्र (SCERT) ने जिल्हानिहाय व गटनिहाय तीन सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड करावी. कोरोनाची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर सदर विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन यथोचित गौरव करण्यात यावा.


सदर कार्यक्रमांचे आयोजन करत असताना कोविड १९ च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घ्यावी.

Post a Comment

0 Comments

close