Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बुस्टर डोस नोंदणी Booster vaccine dose registration

10 जानेवारी 2022 पासून आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाइन वर्कर्स आणि 60 वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस (Corona Vaccine Booster Dose) देण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय कोविड-19 लसीकरण कार्यक्रमाचे सध्याचे प्राधान्य म्हणजे सगळ्या पात्र लोकांना दोन डोससह संपूर्ण लसीकरण करणे हे आहे. त्यासाठी सर्व पात्र लोकांना बुस्टर डोस घेणे आवश्यक आहे. 



कोविड-19 लसीच्या बूस्टर डोससाठी काही मार्गदर्शक तत्त्वे केंद्राने स्पष्ट सांगितली आहेत ती खालीलप्रमाणे -

बुस्टर डोस booster dose तिसरा डोस कुणाला दिला जाणार आहे?

1) बूस्टर डोस देताना याआधी जी लस घेतली आहे, त्याच लशीचा बूस्टर डोस देण्यात येणार आहे. 

2) पात्र नागरिकांमध्ये आरोग्यसेवा कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सहव्याधी असलेल्यांचा व्यक्तींचा समावेश आहे. 

3) लसीचे दोन डोस घेतलेल्या पात्र व्यक्ती कोणत्याही लसीकरण केंद्रात जाऊन बूस्टर डोस घेऊ शकतात. 

4) खासगी हॉस्पिटल्स आणि खासगी लसीकरण केंद्रांवर या लसिकरिता पैसे मोजावे लागणार आहेत. 

5) ज्यांचे दोन डोस घेऊन नऊ महिने म्हणजेच 39 आठवडे झाले आहेत, त्यांनाच हा तिसरा बूस्टर डोस घेता येणार आहे.

6) संबंधित व्यक्तीचा नऊ महिने कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर, त्यांना कोविनकडून तिसरा डोस घेण्याबाबतचा मेसेजही येणार आहे.

7) तिसरा डोस घेतल्यानंतर त्याची माहिती लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरही दिसणार आहे.

कोविड लसीकरण ऑनलाईन रजिस्ट्रेशन / नाव नोंदणी कशी करावी❓ लसीकरण प्रमाणपत्र कसे डाउनलोड करावे ❓Step by Step Guide


बूस्टर डोस नोंदणी कशी करावी? Booster dose Registration

1) बूस्टर डोससाठी Cowin वर नव्याने नोंदणी करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. 

2) हा बूस्टर डोस घेण्यासाठी cowin वर स्लॉट बुक करणे गरजेचे नाही. 

3) मात्र बूस्टर डोस कुठे मिळेल याची माहिती कोविन अॅपवरच मिळू शकणार आहे. 

4) लसीकरण केंद्र, तारीख, वेळ इत्यादी माहिती आपल्याला आधीच कळावी म्हणून आपण Cowinच्या वेबसाईटवर, कोविन अॅपवर किंवा खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून नोंदणी करू शकता.

Step by Step Registration

Step 1 खालील लिंक वर क्लिक करा. 

https://selfregistration.cowin.gov.in/


Step 2  आपला यापूर्वी रजिस्टर केलेला मोबाईल नंबर टाका. 

Step 3 मोबाईल नंबर टाकल्या नंतर एक OTP येईल तो टाकून verify and proceed येथे टच करा. 

Step 4 आपल्या नंबर वरुन किती जणांचे रजिस्ट्रेशन झाले आहे हे दिसून येईल. आपल्या नावाखालील तिसरा डोस ची तारीख पहा. 

Step 5 schedule precaution dose वर टच करुन तुम्ही तिसऱ्या डोस साठी नाव नोंदणी करु शकता. 

https://selfregistration.cowin.gov.in/


कोविड लसीकरण ऑनलाईन रजिस्ट्रेशन / नाव नोंदणी कशी करावी❓ लसीकरण प्रमाणपत्र कसे डाउनलोड करावे ❓Step by Step Guide.

कोरोना लस (covid 19 vaccine) कुणी घ्यावी❓ आणि कुणी नाही❓... कोरोना लसीकरणाबाबत तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर पहा...

Post a Comment

0 Comments

close