Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दहावी बारावी बोर्ड परीक्षा 2022 संदर्भात नियंत्रण कक्ष व helpline सुविधा

मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षांसंदर्भात विद्यार्थी, पालक व संबंधित घटक यांना येणाऱ्या सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षा अंतर्गत लेखी परीक्षा दिनांक ०४/०३/२०२२ ते ३०/०३/२०२२ या कालावधीत तर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा दिनांक १५/०३/२०२२ ते ०४/०४/२०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षा 2022 चे  सुधारित अंतिम वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.

कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयोजित उपरोक्त परीक्षेचे निश्चित केलेले स्वरुप व मंडळामार्फत केलेल्या विशेष उपाययोजना यासंदर्भात विद्यार्थी, पालक व संबंधित घटक यांना येणाऱ्या सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी व आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी राज्यमंडळ व सर्व विभागीय मंडळात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. या नियंत्रण कक्षामार्फत तसेच मंडळामार्फत नियुक्त समुपदेशक / शिक्षक समुपदेशक यांचेमार्फत विद्यार्थ्यांचे परीक्षेशी संबंधित बाबींच्या अनुषंगाने समुपदेशन करण्यासाठी हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर सुविधा दि.०४/०२/२०२२ पासून कार्यान्वित करण्यात येत असून सदर नियंत्रण कक्षाचे कामकाज सकाळी ९.०० ते रात्री ७.०० या वेळेत सुरु राहील.

कोविड- १९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मंडळामार्फत सदर परीक्षांबाबत केलेले नियोजन, विशेष उपाययोजना, विविध घटकांसाठी निश्चित केलेल्या विशेष मार्गदर्शक सूचना तसेच नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन सुविधा इत्यादीबाबतचा तपशील विभागीय मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालये यांना देखील विभागीय मंडळ स्तरावर स्वतंत्र परिपत्रकाद्वारे कळविण्यात येत आहे व तो मंडळाच्या www.mahahsscboard.in संकेतस्थळावर जाहीर करण्यात येत आहे.

राज्यमंडळ व विभागीय मंडळातील नियंत्रण कक्ष / हेल्पलाईनसाठी नियुक्त केलेले अधिकारी व मंडळ कर्मचारी यांची नावे व दूरध्वनी / भ्रमणध्वनी क्रमांक इ. तपशील पुढीलप्रमाणे देण्यात येत आहे. तरी, संबंधितांनी आपल्याशी संबंधित असलेल्या विभागीय मंडळाशी संपर्क साधावा.

विभागनिहाय नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन सुविधा PDF डाउनलोड करा. - Click Here





Post a Comment

0 Comments

close