Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

15 मार्च पासून मध्यान्ह भोजन योजनेंतर्गत तयार आहार मिळणार... MDM App डाउनलोड करा.

कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्याकरीता करावयाच्या उपाययोजना म्हणून माहे मार्च २०२० पासून शाळा स्तरावर शिजविलेल्या आहाराचा पुरवठा करण्याऐवजी कोरडा शिधा दिला जात होता. आता पात्र शाळांतील इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना दि. १५ मार्च २०२२ पासून शाळा स्तरावर तयार आहार देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

दररोजची माहिती भरण्याकरिता MDM App Download link - Click Here


शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमधील इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाते. सदर योजने अंतर्गत इ.१ ली ते ५ वी या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना ४५० उष्मांक (कॅलरी) आणि १२ ग्रॅम (प्रोटीन) युक्त दुपारचे मध्यान्ह भोजन तसेच इ. ६ वी ते ८ वी या उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना ७०० उष्मांक (कॅलरी) आणि २० ग्रॅम (प्रोटीन) युक्त आहार देण्यात येतो. कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्याकरीता करावयाच्या उपाययोजना म्हणून माहे मार्च २०२० पासून शाळा स्तरावर शिजविलेल्या आहाराचा पुरवठा करण्याऐवजी कोरडा शिधा दिला जात आहे. केंद्र शासनाने संदर्भ क्र.१ च्या पत्रान्वये पात्र विद्यार्थ्यांना कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्याकरीता करावयाच्या उपाययोजनांचे पालन करून शाळा स्तरावर तयार आहार देणेबाबत सूचना निर्गमित केलेल्या आहेत. राज्यातील इयत्ता १ ली ते ८ वी च्या शाळा दि.०१ फेब्रुवारी, २०२२ पासून सुरु करण्यात आलेल्या आहेत. स्थानिक परिस्थिती विचारात घेवून विद्यार्थ्यांची उपस्थिती व शाळेचा कालावधी निश्चित करून त्यानुसार अमलबजावणी केली जात आहे. सद्यस्थितीमध्ये राज्यातील कोविड-१९ च्या प्रादुर्भावाची स्थिती नियंत्रणात आल्याने राज्यातील योजनेस पात्र शाळांमधील इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना दि. १५ मार्च २०२२ पासून शाळा स्तरावर तयार आहार देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत 15 मार्च पासून तयार आहार देणेबाबत शासन परिपत्रक डाउनलोड करा. - Click Here

Post a Comment

0 Comments

close