Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अर्जित रजेचे रोखीकरण सुधारित वेतन संरचनेनुसार करणेबाबत.

राज्यातील खाजगी मान्यताप्राप्त शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ज्यांना अर्जित रजा देय आहे अशा कर्मचा-यांच्या अर्जित रजेचे रोखीकरण सुधारित वेतन संरचनेनुसार करणेबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. 

15 जानेवारी 2001 च्या शासन निर्णयान्वये अर्जित रजेचे रोखीकरण करण्याची 240 दिवसांची मर्यादा 300 दिवसांपर्यंत वाढविली असून, सदर आदेश दिनांक 9 एप्रिल 2001 च्या शासन निर्णयान्वये राज्यातील खाजगी मान्यताप्राप्त प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी यांना लागू करण्यात आले आहेत.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय - शिक्षक, विद्यार्थी व शाळेसाठी उपयुक्त सर्व शासन निर्णय डाउनलोड करा.

अर्जित रजा रोखीकरण सर्व शासन निर्णय - Click Here


15.01.2001 चा अर्जित रजा रोखीकरण GR - Click Here

09.04.2001 च्या शासन निर्णयानुसार फक्त खाजगी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर अर्जित रजा रोखीकरण करता येणार. GR - Click Here


अर्जित रजेचे रोखीकरण सुधारित वेतन संरचनेनुसार करणेबाबत शासन निर्णय -27 फेब्रुवारी 2024


महाराष्ट्र खाजगी शाळांमधील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ मधील नियम १६ मधील खालीलप्रमाणे पोटनियम क्र. १८ (अ) व २९ येथे नमूद कर्मचा-यांनाच रजा रोखीकरण लागू राहील.

"१८ (अ) जर माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकाव्यतिरिक्त (परंतु उप-मुख्याध्यापकासहित) एखादा स्थायी कर्मचारी मोठया सुट्यांना हक्कदार असूनही एखाद्या वर्षात पूर्ण मोठया सुट्यांचा किंवा त्यांच्या एखाद्या भागाचा लाभ घेण्यात प्रतिबंध झालेला असेल तर, त्याबद्दल त्याला पूर्ण सुटीशी त्याने सुटीच्या न उपभोगलेल्या दिवसांच्या संख्येचे जे प्रमाण असेल त्या प्रमाणात वार्षिक ३० दिवसांच्या अर्जित रजेशी प्रमाणशीर असलेल्या संख्याऐवढी अर्जित रजा अनुज्ञेय राहील".

"(२९) ज्याला पोट-नियम (१८) च्या तरतूदी लागू आहेत असा कर्मचारी धरुन नियत वयोमानामुळे सेवानिवृत्त होणारा कोणीही कर्मचारी, सेवानिवृत्तीच्या वेळी त्याच्या खाती ३०० दिवस इतक्या कमाल मर्यादेपर्यंत जितकी अर्जित रजा शिल्लक असेल तेवढ्या रजेच्या बाबतीतील रजावेतनाइतकी रोख रक्कम मिळण्यास पात्र असेल."
उक्त शासन निर्णयातील परिच्छेद क्र. ३ वगळण्यात येत आहे. 

अर्जित रजेचे रोखीकरण सुधारित वेतन संरचनेनुसार करणेबाबत शासन निर्णय डाउनलोड करा. -27 फेब्रुवारी 2024



अर्जित रजेचे रोखीकरण सुधारित वेतन संरचनेनुसार करणेबाबत शासन निर्णय - 04 मे 2022

वित्त विभागाने दि. १ जानेवारी, २०१६ पासून सुधारित वेतन संरचना लागू करण्याबाबत महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, २०१८ अधिसूचित केले असून, त्यानुसार राज्यातील खाजगी मान्यताप्राप्त प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना दि. १/१/२०१६ पासून सुधारित वेतन संरचना लागू करण्यात आली आहे. सुधारित वेतन संरचना लागू झाल्यानंतर वित्त विभाग, शासन निर्णय दि. २४/०५/२०१९ अन्वये दि. १/१/२०१६ रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त / निधन झालेल्या / होणा-या शासकीय कर्मचा-यांच्या खाती जमा असलेल्या अर्जित रजेच्या रोखीकरणाच्या परिगणनेसाठी ग्राहय धरावयाच्या वेतनाच्या अनुषंगाने तसेच अर्जित रजा रोखीकरणाच्या कार्यवाहीबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. त्याआधारे राज्यातील खाजगी मान्यताप्राप्त शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ज्यांना अर्जित रजा देय आहे अशा कर्मचा-यांच्या अर्जित रजा रोखीकरणाबाबत शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

अर्जित रजेचे रोखीकरण सुधारित वेतन संरचनेनुसार करणेबाबत शासन निर्णय दि. 04.05.2022


संदर्भ क्र. 1 - महाराष्ट्र नागरी सेवा रजा अधिनियम 1981 मधील तरतुदी - Click Here

१. दि. १ जानेवारी, २०१६ रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त/शासन सेवेत असताना निधन झालेल्या होणा-या तसेच वरील संदर्भ क्र. २ येथील शासन निर्णयातील परिच्छेद क्र. २ (२) व परिच्छेद क्र. ३ मध्ये नमूद केलेल्या प्रकरणी, खाजगी मान्यताप्राप्त शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ज्यांना अर्जित रजा देय आहे अशा कर्मचा-यांच्या अर्जित रजा रोखीकरणाच्या परिगणनेसाठी "वेतन" या संज्ञेचा अर्थ, हा उपरोक्त संदर्भ क्रमांक ६ येथील अधिसूचनेतील नियम क्रमांक ३ (१२) अन्वये अंमलात आलेल्या मूळ वेतनाच्या व्याख्येनुसार राहील.

२. तसेच उपरोक्त नमूद परिच्छेद-२ मध्ये नमूद अर्जित रजा देय असलेल्या कर्मचा-यांचे बाबतीत सुधारित वेतन संरचनेतील वेतन विचारात घेऊन त्यांना नियमाप्रमाणे अनुज्ञेय असलेल्या शिल्लक अर्जित रजेच्या संबंधातील रजा वेतनाची सममूल्य रोख रक्कम, एका ठोक रकमेत रोखीने प्रदान करण्यात यावी. जर संबंधित कर्मचारी दिनांक १/१/२०१६ ते दि. ३१/१/२०१९ या कालावधीत असुधारीत वेतन संरचनेतील वेतनाच्या आधारे शिल्लक अर्जित रजेच्या रोख सममूल्याची रक्कम यापूर्वी अदा केलेली असल्यास, त्यांना या शासन निर्णयाच्या अनुषंगाने फरकाची रक्कम ठोक रकमेद्वारे रोखीने प्रदान करण्यात यावी.

३. सदर शासन निर्णय वित्त विभाग, अनौपचारिक संदर्भ क्र.७६/२२/सेवा-६, दिनांक ०६/०४/२०२२ च्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

अर्जित रजा रोखीकरण सर्व शासन निर्णय - Click Here

Post a Comment

0 Comments

close