Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना | राज्यातील 488 आदर्श शाळा योजनेचे पुन्हा होणार नामकरण

राज्यात प्रथम टप्यात ४८८ शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचा निर्णय शासनाने शासन निर्णय दि. 5 मार्च 2021 अन्वये घेण्यात आला होता. सदर शाळा योजनेला आता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना असे नाव देण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला आहे. 

488 आदर्श शाळा बाबत शासन निर्णय 5 मार्च 2021 पहा. - Click Here

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय 2022 या वर्षातील सर्व शासन निर्णय - Click Here

सन २०२१-२०२२ वर्ष स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. देशाच्या इतिहासात अनेक महापुरूषांनी देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करून सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांच्या सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशादर्शक ठरत आहे. " आदर्श शाळा योजना " शासनाची ही महत्वाकांक्षी योजना असून तिथी व्याप्ती व स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष या अनुषंगाने सदर योजनेस स्वातंत्र्य काळातील महापुरूषाचे नाव देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :

राज्यात राबविल्या जाणाऱ्या आदर्श शाळा योजनेला "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना " असे नाव देण्यात येत आहे.

शासन निर्णय डाउनलोड करा. 

Post a Comment

0 Comments

close