Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

एकात्मिक व द्विभाषीक पाठ्यपुस्तक योजना बंद | नवीन पाठ्यपुस्तके उपलब्ध करुन देणार

राज्यातील शाळांमध्ये टप्याटप्याने एकात्मिक व द्विभाषीक पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याबाबतची योजना बंद करण्यात येणार आहे. त्याऐवजी नवीन पाठ्यपुस्तके उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. 

राज्यातील शाळांमध्ये टप्याटप्याने एकात्मिक व द्विभाषीक पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याबाबतचा शासन निर्णय दि. २३ जून २०२२ याद्वारे अधिक्रमित करण्यात येत आहे.

23 जून 2022 चा शासन निर्णय डाउनलोड करा. Click Hereशालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय 2023 या वर्षातील सर्व शासन निर्णय - Click Here


एकात्मिक व द्विभाषीक पाठ्यपुस्तक योजना का बंद करण्यात आली? 


एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तकांची अमंलबजावणी करताना खालील बाबी निदर्शनास आल्या आहेत.

१. सदर पाठ्यपुस्तकांच्या अनुषंगाने समाजामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तसेच प्रत्यक्ष अध्यापन करणाऱ्या शिक्षकांशी चर्चा केली असता, द्विभाषिक पद्धतीचा वापर करताना विद्यार्थ्यांना मूळ भाषा शिकण्यात अडचणी येत असल्याचे व त्यामुळे मूळ भाषेचे (प्रादेशिक भाषा / मातृभाषा) शिक्षण योग्य प्रकारे होत नसल्याचे आढळून आले आहे.


२. एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तके ही विशिष्ट सूत्राभोवती (theme) गुंफलेली असल्यामुळे मराठी भाषा इंग्रजी भाषा व गणित या विषयांची तर्कसंगत मांडणी करताना तसेच व्याकरणाचे शिक्षण देताना अनेक अडचणी येत असल्याचे आढळून आले आहे.


३. निपुण भारत अभियानानुसार नवीन अध्ययन निष्पत्तीचा स्तर निश्चित करण्यात आलेला असून, त्याची अंमलबजावणी पूर्व प्राथमिक (बालवाटिका, बालवाडी व अंगणवाडी) स्तरापासून ते इयत्ता तिसरी पर्यंत करण्यासाठीचे केंद्र शासनाचे निर्देश / सूचना आहेत. तथापि, निपुण भारत अभियानामध्ये नमूद केलेल्या अध्ययन निष्पत्तीच्या स्तरापेक्षा एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तकांसाठी वापरलेल्या अध्ययन निष्पत्तींचा स्तर निम्न दर्जाचा असून जुन्या अभ्यासक्रमावर आधारित आहे.


निपुण भारत अभियानानुसार दिलेल्या नवीन अध्ययन निष्पत्तीच्या आधारे अभ्यासक्रम व पाठ्यक्रम यांची नव्याने निर्मिती करण्यात आल्यानंतर राज्यातील मराठी आणि उर्दू माध्यमांच्या सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली करिता वितरीत एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तके बदलण्याची कार्यवाही संचालक, बालभारती पुणे यांच्याकडून करण्यात येईल.

राज्यातील शाळांमध्ये टप्याटप्याने एकात्मिक व द्विभाषीक पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याबाबतचा शासन निर्णय अधिक्रमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

शासन निर्णय 27 फेब्रुवारी 2023 डाउनलोड करा. - Click Here

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२३०२२७१५४१३०५९२१ असा आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय - शिक्षक, विद्यार्थी व शाळेसाठी उपयुक्त सर्व शासन निर्णय डाउनलोड करा.

Post a Comment

0 Comments

close