समग्र शिक्षा अंतर्गत शाळासिद्धी उपक्रम अंतर्गत (२०२०-२१ या वर्षातील) स्वयं मूल्यमापन पूर्ण केलेल्या प्राथमिक स्तरावरील १०,००० व माध्यमिक स्तरावरील १८५१ शाळांचे बाह्य मूल्यमापन करणे प्रस्तावित आहे. सदर शाळांचे बाह्य मूल्यमापन करणेसाठी शाळा व निर्धारक निश्चित करुन मूल्यमापन पूर्ण करण्यात येणार आहे.
निश्चित केलेल्या निर्धारकाना NEPA, नवी दिल्ली व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या दतीने २४.०२.२०२३ रोजी ऑनलाइन प्रशिक्षणाचे आयोजन करून शाळांच्या बाह्य मूल्यमापनासाठी प्रती शाळा रु. ४९०/- प्रमाणे आपणास PFMS प्रणालीद्वारे निधी वितरीत केला जाणार आहे. तरी सोबत जोडलेल्या माहिती पत्रकानुसार आपल्या जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांचे बाह्य मूल्यमापन करून तसा अहवाल राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे कार्यालयास coordinationdept@maa.ac.in या ईमेल वर कळविण्यात यावा.
शाळा सिद्धी वेब पोर्टल -
shastasiddhi.niepa.ac.in
१. शाळांची निश्चिती कशी करावी ?
सन २०२०-२1 वर्षातील स्वयं मूल्यमापन झालेल्या वर दिलेल्या सारणीत संख्येएवढी शाळांची निवड करावी.
प्रत्येक केंद्रातील शाळा असावी. तसेच इयत्ता १ ली ते ५ वी इयत्ता १ ली ते ८ वी इयत्ता १ ली ते १० वी इयत्ता ५ वी ते १० वी अशा शाळा घेण्यात याव्यात. ( इयत्ता १० वी १२ वी परीक्षा केंद्र असलेल्या शाळा निवडू नयेत.)
https://shaalasiddhi.piopa.ac.in/shaalasiddhi/Reports/DataStatusReportForPublicNew?AcademicYearld=0 या लिंकवर जाऊन आपल्या जिल्ह्यातील शाळांची Excel sheet डाउनलोड करू शकता. किंवा २०२०-२१ या वर्षातील स्वयं मूल्यमापन पूर्ण केलेल्या राज्यातील शाळांची Excel sheet पत्रासोबत देण्यात येत आहे. यातून आपल्या जिल्ह्यातील शाळा निवडू शकता.
२. निर्धारक निश्चिती कशी करावी ?
उदा: "अ "नावाच्या शाळेचे बाह्य मूल्यमापन करायचे आहे. निर्धारक अ शाळेतील नसावा. "अ शाळा ज्या केंद्रात येते, त्या केंद्रातील निर्धारक नसावा. तसेच निर्धारक म्हणून काम करण्यास इछुक असलेल्या व्यक्तीस शाळा सिद्धी उपक्रमाची माहिती असावी. ( इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेच्या कामात व्यस्त असलेले मनुष्यबळ निवडू नये.)
३. निर्धारक किती नेमावेत ?
कमीत कमी २. जास्तीत जास्त ५.
शाळेतील विद्यार्थी संख्येचा विचार करून निर्धारक निश्चिती करावी,
४. निर्धारक कोण असावेत ?
जिल्हा प्रशिक्षण व प्रशिक्षण संस्थामधील अधिकारी, विषय तज्ञ, विशेष तज्ञ, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, (शाळा सिद्धी उपक्रमाची माहिती असावी)
५. निर्धारक Whatsapp Group प्रत्येक जिल्ह्याचा असेल.
निर्धारक व शाळा यांची जोडी करताना विद्यार्थी संख्या विचारात घेऊन निर्धारक निश्चिती करावी. त्यांचा WhatsApp ग्रुप तयार करण्यात यावा.
६. निर्धारक प्रशिक्षण
प्रत्येक जिल्ह्याचा निर्धारक Whatsapp Group तयार झाल्यावर Zoom द्वारे प्रशिक्षण SCERT महाराष्ट्र, पुणे आणि NIEPA. न्यू दिल्ली मार्फत आयोजन.
प्रशिक्षण तारीख २४.०२.२०२३
प्रशिक्षण लिंक -
7. शाळासिद्धी बाह्य मुल्यमापन मुदत -
27/02/2023 ते 15/03/2023 या कालावधीत शाळा सिद्धी बाह्य मुल्यमापन होणार आहे.
0 Comments