अशासकीय प्राथमिक शाळांतील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची अर्जित रजा रोखीकरणाबाबत संचालक यांचे 30 मे 2024 चे परिपत्रक पहा.
संदर्भ :- १) संचालनालयाचे पत्र क्रमांक प्राशिसं/खाप्राशा/अंदाज-२०३/रजा रोखीकरण/
२०२१/३५०५ दिनांक २५.१०.२०२१. २) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प. बुलडाणा यांचे पत्र क्रमांक वेभनिनिपप्प्रा/ बुल/१५/२०२४ दिनांक १९.०१.२०२४.
३) अधिक्षक, वेतन व भ.नि.नि. पथक (प्राथमिक), बुलडाणा यांचे पत्र क्रमांक वेभनिनिपप्रा/बुल/१२३/२०२४ दिनांक १०.०५.२०२४.
उपरोक्त संदर्भ क्रमांक २ व ३ च्या पत्रान्वये खाजगी प्राथमिक शाळांमधील मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखकरणाचे प्रस्ताव प्राप्त झाल्याचे सदर प्रकरणे निकाली काढण्यासाठी संचालनालयस्तरावरून मार्गदर्शन मिळणेबाबत शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प. बुलडाणा व अधिक्षक, वेतन व भ.नि.नि. पथक (प्राथमिक), जिल्हा बुलडाणा यांनी विनंती केलेली आहे.
उपरोक्त प्रकरणी आपणांस कळविण्यात येते की महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ नियम १६ मधील १८ (ब) नुसार फक्त माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापकाला प्रत्येक पूर्ण वर्षासाठी १५ दिवसांची अर्जित रजा अनुज्ञेय आहे. खाजगी प्राथमिक शाळांतील मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखीकरण अनुज्ञेय नाही.
सर्व प्रकारच्या रजेचे प्रकार व रजा नियमावली PDF डाउनलोड करा. - Click Here
अर्जित रजा रोखीकरण सर्व शासन निर्णय - Click Here
नियम १९ अन्वये कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सुटीचा किंवा तिच्या भागाचा लाभ घेण्यास त्याला प्रतिबंध करण्यासाठी मुख्याध्यापकाला/कर्मचा-याला शिक्षणाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी मिळवावी लागेल.
प्राथमिक शिक्षक/मुख्याध्यापकांना दिनांक ०१.०७.१९९५ अन्वये अर्धवेतनी रजेऐवजी मिळणाऱ्या अर्जित रजा दरवर्षी १० दिवस मान्य केलेली आहे. तथापी, सदरील आदेशामध्ये अर्धवेतनो रजेच्या ऐवजी मिळणाऱ्या अर्जित रजेचे रोखीकरण करता येणार नाही असे नमूद आहे.
महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी (सेवेच्या शती) नियमावली १९८१ मध्ये तरतूद नसल्याने खाजगी प्राथमिक शाळांतील मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखीकरण अनुज्ञेय नाही.
![]() |
परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. |
0 Comments