Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

६ जून १६७४ शिवराज्याभिषेक दिन | शिवराज्याभिषेक सोहळा संपूर्ण माहिती

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले होते मात्र प्रचलित राजनीतीनुसार त्याला मान्यता मिळविण्याचे सोपस्कार करणं आवश्यक होते त्यानुसार ६ जून १६७४ रोजी राज्याभिषेकाचा सोहळा करण्याचे शिवरायांनी ठरविले. 


शिवराज्याभिषेक सोहळा प्रश्नमंजुषा सोडवा, आकर्षक शिवकालीन प्रमाणपत्र त्वरित मिळवा. 
रायगडावर ६ जून इ.स. १६७४ रोजी शिवाजी महाराज यांनी गागाभट्ट यांच्याकडून आपला राज्याभिषेक करवून घेतला. राज्याभिषेक सोहळा साठी त्यांनी ३२ मण सोन्याचे सिंहासन बनवुन घेतले. एक मोठा भव्यदिव्य असा राज्याभिषेक सोहळा पार पडला. रयतेला राजा मिळाला. त्या दिवसापासून शिवाजीराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि होन व शिवराई हे चलन जारी केले. रायरीचे नाव रायगड असे बदलले. अनेक देशी विदेशी राजे सरदार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.


राज्याभिषेकाच्या विधी पूर्वी महाराजांनी प्रतापगडाच्या भवानीचे दर्शन घेतले होते. तीन मण सोन्याचे म्हणजेच 56 हजार किंमतीचे छत्र देवीला अर्पण केले होते.

रायगडावर ६ जून इ.स. १६७४ रोजी छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा गागाभट्ट यांनी राज्याभिषेक झाला. सोहळ्यासाठी 32 मण सोन्याचे सिंहासन बनवले गेले होते. शिवराज्यभिषेकासाठी देशातील कानाकोपऱ्यांतून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले होते. सुमारे 11000 ब्राह्मण आणि इतर लोक मिळून जवळपास लाखभर लोक रायगड या ठिकाणी जमा झाले होते.

या सोहळ्यात ब्राह्मण, श्रीमंत गणमान्य व्यक्ती. दुसऱ्या राज्यांचे प्रतिनिधी, विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता असे सर्वच उपस्थित झाले होते.

दुसऱ्या दिवशी महाराजांची सोने, चांदी, तांबे, जस्त, कथील, शिसे, लोखंड अशा सात धातूंनी वेगवेगळी तुला झाली. याशिवाय वस्त्र, कापूर, मीठ, खिळे, मसाले, लोणी, साखर, फळे इत्यादींच्या तुला झाल्या. लाखभर होन ब्राह्मणांना देण्यात आले.

राज्याभिषेकच्या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून, कुलदेवतेला स्मरून, प्रमुख ब्राह्मणांच्या पायी पडून, राज्याभिषेक सुरू झाला. यावेळी शिवाजीमहाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. राज्याभिषेकात राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे दोन प्रमुख विधी होते. लांब दोन फूट रुंद अशा सोन्याने मढवलेल्या मंचावर शिवाजी महाराज बसले. सात प्रधान नद्या व समुद्र येथून आणलेल्या पाण्याने शिवाजीमहाराजांवर जलाभिषेक केला गेला. सोळा सुवासिनींनी पंचारती ओवाळली. यानंतर शिवाजी महाराजांनी लालरंगाचे वस्त्र परिधान केले. जडजवाहिर, अलंकार परिधान केले. गळ्यात फुलांचे हार घातले. एक राज मुकुट घातला. आपल्या ढाल तलवार आणि धनुष्यबाणाची पूजा केली. आणि मुहूर्ताच्या वेळी राजसिंहासनाच्या दालनात प्रवेश केला. दालन ३२ शकुन चिन्हांनी सजवलेले होते. शिवाजी महाराज ३२ मण सोन्याच्या सिंहासनावर आरुढ झाले. सोळा सवाष्णींनी त्यांना ओवाळले.

सोन्याचांदीचे फुले उधळली गेली. विविध तालवाद्य सूरवाद्यांच्या जयघोषात आसमंत भरून गेले. ठरल्याप्रमाणे प्रत्येक गडावरून तोफा डागल्या गेल्या. मुख्य पुरोहित गागाभट्टांनी पुढे येऊन राजांच्या डोक्यावर सोन्यामोत्यांची झालर ठेवत 'शिवछत्रपतींना' आशीर्वाद दिला.

स्वाभिमानाची साक्षात मूर्ती असलेले शिवाजी राजे आजच्या दिवशी छत्रपती झाले. तमाम पोरक्या झालेल्या जनतेला राजा मिळाला. वडिलोपार्जित छत्राखाली नव्हे तर स्वतः मावळ्यांच्या मदतीने उभारलेल्या छत्राखाली शिवाजी राजे बसले आणि स्वयंघोषित नव्हे तर लोक घोषित छत्रपती बनले.

जे शिवराज्य-सुराज्य स्थापन करण्यासाठी राजे छत्रपती झाले, ते राज्य पुन्हा स्थापन आणि सक्षम करण्यासाठी जमेल तिथे जमेल त्या प्रकारे प्रयत्न करूयात.

शिवराज्याभिषेक सोहळा  निमित्ताने सर्वांना खूप खूप शुभेच्छा


शिवराज्याभिषेक दिन भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन.

राज्याभिषेकाच्या माध्यमातून महाराजांनी जुलमी राजवटी उलथवून टाकून नवं स्वराज्य स्थापन केले. त्यांचे हे कार्य असामान्य स्वरूपाचे होते. राज्याभिषेक ही संपूर्ण देशात लोकशाही राज्याची संकल्पना साकारणारी घटना होती.


शिवराज्याभिषेक सोहळा दिनानिमित्ताने प्रश्नमंजुषा सोडवा. - Click Here


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी प्रश्नमंजुषा सोडवा. लगेच प्रमाणपत्र प्राप्त करा. - Click Here


आणखी थोर महापुरुषांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा सोडविण्यासाठी येथे टच करा. - Click Here

Post a Comment

0 Comments

close