Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

थकीत वेतन देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करणेबाबत | थकीत देयकाच्या प्रकारानुसार अपलोड करावयाच्या कागदपत्रांची यादी

थकीत वेतन देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करणेबाबत | थकीत वेतन देयकाच्या प्रकारानुसार अपलोड करावयाच्या कागदपत्रांची यादी




शालार्थ मधून प्रत्येक महिण्याची सॅलरी स्लिप PDF मध्ये कशी डाउनलोड करावी? तेही स्वतःच्या मोबाईल वरुन. अवश्य पहा- Click Here

ई-कुबेर प्रणाली / CMP प्रणालीद्वारे वेतन अदा करणेबाबत शासन परिपत्रक - Click Here


थकित वेतन देयके ऑनलाईन सादर करणेस मुदतवाढ देणेबाबत शासन परिपत्रक - 27 सप्टेंबर 2024

थकीत वेतन देयकाची माहिती शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन पध्दतीने सादर करणे आणि सदरचे थकीत देयकास ऑनलाईन प्रशासकीय मान्यता घेणेबाबत या कार्यालयाचे 12 सप्टेंबर 2024च्या परिपत्रकान्वये यापूर्वी कळविण्यात आलेले आहे.

तथापि, सध्या शालार्थ वेतन प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणीमुळे शाळांना थकीत देयके ऑनलाईन सादर करणे शक्य नाही. तसेच शालार्थ प्रणाली बंद असल्याने थकीत देयके ऑनलाईन फॉरवर्ड करण्यास किमान एक महिन्याची मुदतवाढ मिळणेबाबत राज्यातील काही वेतनपथक कार्यालयाकडून विनंती करण्यात आलेली आहे.

उपरोक्त वस्तुस्थितीचा विचार करता डीडीओ-१ (मुख्याध्यापक) स्तरावरुन थकीत देयके ऑनलॉईन सादर करण्यासाठी दिनांक ५/१०/२०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.




Previous Update

थकित वेतन देयके ऑनलाईन सादर करणेबाबत शासन परिपत्रक - 11 सप्टेंबर 2024



शासन निर्णय 15.07.3017 नुसार थकीत देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीनेच सादर करणेबाबत शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार शालार्थ प्रणालीमध्ये थकीत देयके ऑनलाईन सुविधा विकसित करण्यात आली असून त्याअनुषंगाने थकीत वेतन देयकाची माहिती शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीने सादर करणे आणि सदरचे थकीत देयकास ऑनलाईन प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत दिलेल्या सूचना खालीलप्रमाणे आहेत.

1) संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांनी प्रलंबित वेतन अनुदानाची देयके योग्य ती तपासणी/पडताळणी करून सदर दाव्यांना मंजूरी घेण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये आपल्या लॉगीन वरून थकीत देयकाची माहिती भरावी. तसेच आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. 

तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक, अधीक्षक, वेतन पथक (माध्यमिक) संबंधित सर्व यांचेकडून आजअखेर संचालनालयास ऑफलाईन सादर केलेल्या नवीन/पुनर्मान्यतेची तसेच न्यायालयीन प्रकरणाची थकीत देयके ऑनलाईन सादर करावीत. सन २०२४-२५ मध्ये संचालनालयाकडून प्रशासकीय मान्यता मिळालेली परंतू कोषागारात सादर न केलेली देयके पुनश्च ऑनलाईन पद्धतीने सादर करावीत.


प्रलंबित सर्व थकीत देयकाची माहिती दिलेल्या तारखेपर्यंत शालार्थमध्ये ऑनलाईन भरण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाची राहील.


2) अधीक्षक, वेतन पथक (माध्यमिक) व संबंधित शिक्षणाधिकारी यांनी त्यांच्याकडे ऑनलाईन प्राप्त झालेली थकीत वेतन अनुदानाची देयके नियमानुसार योग्य ती तपासणी व पडताळणी करून सदर दाव्यांना ऑनलाईन मंजूरीकरीता संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे सादर करणे. तथापि ऑफलाईन प्रस्तावासोबत पुढील कागदपत्रे सादर करावीत.


१. थकीत देयक प्रशासकीय मान्यता संदर्भ आदेश (वैयक्तिक मान्यता/वरिष्ठश्रेणी/न्यायालयीन आदेश/अनुदानाअभावी थकीत देयके इत्यादी) 

२. विहित नमुन्यातील संयुक्त स्वाक्षरीचे विवरणपत्र- सोबत प्रपत्र आहे. उपरोक्त अ.क्र. १ च्या अनुषंगाने संबंधित सर्व शाळांना सूचना देण्यात याव्यात.


3) विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी त्यांच्याकडे ऑनलाईन प्राप्त झालेली थकीत वेतन अनुदानाची देयके नियमानुसार योग्य ती तपासणी व पडताळणी करून सदर दाव्यांना ऑनलाईन मंजूरीकरीता संबंधित संचालकांकडे सादर करणे. तसेच उपरोक्त अ.क्र. १ च्या अनुषंगाने संबंधित सर्व शाळांना सूचना देण्यात याव्यात. तथापि ऑफलाईन प्रस्तावासोबत पुढील कागदपत्रे सादर करावीत.

१. विभागीय शिक्षण उपसंचालक यांचे मंजूरीस्तव शिफारसपत्र

२. थकीत देयक प्रशासकीय मान्यता संदर्भ आदेश (वैयक्तिक मान्यता/वरिष्ठश्रेणी/न्यायालयीन आदेश/अनुदानाअभावी थकीत देयके इत्यादी)

३. विहित नमुन्यातील संयुक्त स्वाक्षरीचे विवरणपत्र- सोबत प्रपत्र आहे.

न्यायालयीन प्रकरणाचे प्रस्ताव संचालनालयाचे न्यायालयीन प्रकरणा बाबतचे परिपत्रक दि. ६/१/२०२३ नुसार सादर करावे.

उपरोक्त अ.क्र. १ च्या अनुषंगाने संबंधित सर्व शाळांना सूचना देण्यात याव्यात.


4) विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडून ऑनलाईन प्राप्त झालेली प्रलंबित वेतन अनुदानाची देयके योग्य ती तपासणी व पडताळणी करून सदर दाव्यांना शासन निर्णय दि. १५/७/२०१७ मधील सुचनांनुसार ऑनलाईन प्रशासकीय मंजूरी संबंधित शिक्षण संचालक यांनी देणे. 


5) प्रत्येक संचालनालय स्तरावरून शा.नि. दि. १५.०७.२०१७ मधील सुचनानुसार प्रशासकीय मंजूरी दिलेल्या दाव्यांची लेखाशीर्षनिहाय पुरवणी मागणी/पुनर्विनियोजन/सुधारित अंदाजाच्या माध्यमातून शासनाकडून निधी उपलब्धतेबाबतचे मागणी प्रस्ताव प्रस्तावित करणे. 


6) वरीलप्रमाणे लेखाशीर्षनिहाय निधी उपलब्धतेनुसार अनुक्रमांक ४ मध्ये नमूद प्रशासकीय मान्यता नुसार, संबंधित सर्व प्रशासकीय आदेश क्रमांक व दिनांक नमूद करून स्वतंत्रपणे निधी वितरण आदेश वितरीत करणे.


थकीत देयकाच्या प्रकारानुसार अपलोड करावयाच्या कागदपत्रांची यादी तपशिल खालीलप्रमाणे आहे.


१. पदोन्नती

शिक्षणाधिकारी यांचा आदेश

लेखाधिकारी यांचे वेतननिश्चिती पडताळणी आदेश


२. वेतनवाढ

मुख्याध्यापकाचा आदेश


३. निवडश्रेणी

शिक्षणाधिकारी यांचा मान्यता आदेश 


४. वरिष्ठ वेतन श्रेणी

लेखाधिकारी यांचे वेतन निश्चिती पडताळणी


५. शिक्षण सेवक मानधन

शिक्षणाधिकारी / शिक्षण उपसंचालक यांचा मान्यता आदेश


५. महागाई भत्ता फरक

शासन निर्णय/मुख्याध्यापक यांचे पत्र


६. सहाव्या वेतन आयोग फरक

मुख्याध्यापक यांचे पत्र.


७. निलंबन/बडतर्फ कालावधीतील फरक

संस्था आदेश, देयक दुबार आहरित केले नसल्याबाबतचे मुख्याध्यापक यांचे हमीपत्र


८. न्यायालयीन प्रकरणे

- विहित नमुन्यातील न्यायालयीन प्रकरणाचे प्रपत्र, न्यायालयाचा निकाल, घटनाक्रम, याचिका, दाखल केलेले प्रतिज्ञापत्र


९. पवित्रद्वारे नियुक्ती असल्यास 

संस्थेचा आदेश व रूजू अहवालाची प्रत 

नियमित वेतनश्रेणी फरक

शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक मान्यता आदेश व वेतननिश्चिती प्रत


शासनास सादर करण्यात येणारी सहा वर्षावरील कालावधीचे थकीत देयकाचा प्रस्ताव विवरणपत्र- ३ मध्ये सादर करावे. सदर प्रस्तावासोबत तपासणीसुचीनुसार सर्व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने प्रस्ताव सादर करावा. डिडिओ-१ (मुख्याध्यापक) स्तरावरून थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यासाठी दि. २५/९/२०२४ पर्यंत सुविधा उपलब्ध राहील त्यानंतर सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी थकीत देयके सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार नाही.


वरीलप्रमाणे दिलेल्या नियोजनानुसार थकीत देयकांसाठी निधी उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टीने आपल्या स्तरावरून दिलेली कालमर्यादा पाळल्यास दि. १५/७/२०१७ च्या शासन निर्णयातील परिच्छेद २ मधील सूचनांनुसार कार्यवाही करणे सोईचे होईल. व पर्यायाने चालू आर्थिक वर्षातील मंजूर असलेल्या तरतूदी मधून नियमित वेतनाचा खर्च नियमितपणे भागविणे सुकर होईल. तसेच थकीत वेतनासाठी तरतूद उपलब्ध करून देणे बाबत कार्यवाही करता येईल. वर नमूद कालमर्यादा सर्वच स्तरावर तंतोतंत पाळली जाईल याची दक्षता घ्यावी.

थकित वेतन देयके ऑनलाईन सादर करणेबाबत शासन परिपत्रक - 11 सप्टेंबर 2024 डाउनलोड करा. Click Here

Post a Comment

0 Comments

close