Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

माहिती फलक - राष्ट्रपुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करताना संबंधित राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती आणि राष्ट्रीय दिन यांचा माहिती फलक (अल्प परिचय) प्रदर्शित करणेबाबत शासन निर्णय.

सन २०२५ पासून राष्ट्रपुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करताना संबंधित राष्ट्र पुरुष थोर व्यक्ती / यांचा माहिती फलक (अल्प परिचय) प्रदर्शित करण्याबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे. 



महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्रमांक: GAD-४९०२२/५०/२०२४-GAD (DESK-२९) मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२. दिनांक: १० जानेवारी, २०२५.

संदर्भ:- GAD-49022/65/2024-GAD (DESK-29), दिनांक २७.१२.२०२४.


परिपत्रक-:

१. सन २०२५ मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिनांचे कार्यक्रम मंत्रालयात व सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयात साजरे करण्याबाबत संदर्भाधीन परिपत्रकान्वये सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

सन 2025 मध्ये साजरे करावयाचे राष्ट्रीय दिन व जयंती, पुण्यतिथीचे कार्यक्रम पहा. - Click Here


२. संदर्भाधीन शासन परिपत्रक सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयाबरोबरच राज्यातील सर्व महाविद्यालये व सर्व शाळा यांनाही लागू करण्यात येत आहे.


३. राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती साजरी करताना त्यांचे जीवनचरित्र (अल्प परिचय) दर्शविणारा फलक लावण्यात यावा.


४. राष्ट्र पुरुष थोर व्यक्ती यांच्या जीवनचरित्राची (अल्प परिचय) माहिती शासनाच्या https://gad.maharashtra.gov.in या वेबसाईटवरील "जयंती फलक" या शिर्षाखाली (Category) वेळोवेळी उपलब्ध करुन देण्यात येईल.


जयंती / विशेष दिन फलक पाहण्यासाठी लिंक - Click Here


५. राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांचे जीवनचरित्राबाबतची (अल्प परिचय) माहिती २३ इंच २५ इंच आकाराच्या सनबोर्डवर छापून सनबोर्ड तयार करण्यात यावेत.


६. याबाबत होणारा खर्च संबंधित कार्यालयाच्या कार्यालयीन खर्चातून भागविण्यात यावा.


७. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२५०११०११३४०४९००७ असा आहे. सदरचे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.


माहिती फलक GR - राष्ट्रपुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करताना संबंधित राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती आणि राष्ट्रीय दिन यांचा माहिती फलक (अल्प परिचय) प्रदर्शित करणेबाबत शासन निर्णय.- Click Here

Post a Comment

0 Comments

close