Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कोणतं App तुमची माहिती वापरतंय? असं पाहा

नवी दिल्ली : सध्या वाढत्या तंत्रज्ञानामुळे स्मार्टफोन युझर्सच्या डेटा चोरी आणि डेटा विक्रीचं प्रमाण वाढत आहे. 

जाणकारांच्या मते, कोणतं App युझर्सचा डेटा जमा करत आहे त्याची माहिती घेण्याचे विविध मार्ग आहेत. सायबर सिक्युरिटी कंपनी Kaspersky च्या मते, विविध प्रसिद्ध App युझर्सची वैयक्तिक माहिती मागतात आणि App व्यवस्थित काम करण्यासाठी अनेकदा ही माहिती आवश्यकही असते. App ची आवश्यकता असल्यामुळे युझर्स कोणताही विचार न करताच आवश्यक त्या परवानगी देऊन टाकतात, मात्र त्याचा डेव्हलपर्सकडून गैरवापरही केला जातो.

उदाहरणार्थ, युझर एखादं नेव्हीगेशन App वापरत असेल, तर हे App व्यवस्थित काम करण्यासाठी युझरच्या लोकेशनची माहिती आवश्यक असते. याच पद्धतीने अनेक App युझर्सचा डेटा स्वतःकडे जमा करतात. यामध्ये युझरने दिलेल्या परवानगीचा फायदा घेऊन App डेव्हलपर्स अनावश्यक खाजगी डेटा घेतात आणि त्याची विक्री करुन पैसेही कमावत असल्याचे प्रकार समोर आले आहेत.

💥 Most Useful

युझर्सना आपली कोणती माहिती जमा केली जात आहे ते पाहायचं असेल, तर The AppCensus चा वापर करता येईल. ही एक अशी सेवा आहे, ज्याद्वारे युझर्सचा पर्सनल डेटा कुणी जमा केला आहे त्याची माहिती पाहता येईल. AppCensus कडून डायनमिक अॅनालिसिस मेथडचा वापर केला जातो. एखादं App मोबाइलमध्ये इंस्टॉल केल्यानंतर काही वेळ AppCensus चा सक्रीयपणे वापर करावा लागेल. या काळात संबंधित App ने कोणता डेटा कुणाला पाठवला याचं ट्रॅकिंग AppCensus कडून केलं जातं.

या सेवेचं वैशिष्ट्य म्हणजे संबंधित डेव्हलपरने डेटा एनक्रिप्टेड ठेवला असेल तरीही AppCensus कडून माहिती घेतली जाईल. याचप्रमाणे Exodus Privacy चाही वापर युझर्स करू शकतात. कोणत्या App कडून कोणती माहिती जमा केली जाते त्याबाबत तुम्ही या दोन्ही प्लॅटफॉर्मच्या अधिकृत वेबसाइट किंवा गुगल प्ले स्टोअरवर App डाऊनलोड करुनही पाहू शकता.

Post a Comment

0 Comments

close