Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Whatsapp च्या नव्या पॉलिसीमुळे, 'Signal' या नव्या मेसेजिंग ॲपची क्रेज वाढली

Whatsapp ने नुकतेच नवीन पॉलिसी अपडेट आणले आहे. ते ॲक्सेप्ट केले नाही तर तुमचे अकाउंट डिलीट होणार आहे. त्यामुळे अनेक युजर्स  दुसऱ्या मेसेजिंग ॲपकडे वळत आहेत. WhatsApp ला पर्यायी आणि अधिक सुरक्षित अशा Signal ॲप ला लोकांची पसंती वाढली आहे.

 Whatsapp चे नवीन नियम आणि अटीमुळे युजर्संची डोकेदुखी वाढली. त्यामुळे अनेक जण दुसरा पर्याय शोधत आहेत. सध्या सिग्नल मेसेंजर (signal massenger) ला जगभरात पसंती मिळत आहे. गेल्या दोन दिवसांत सिग्नल युजर्संची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सिग्नल मेसेंजर (signal massenger) वर व्हेरीफिकेशन (verification) कोड उशिराने येत आहे. या ॲपने युजर्संला जोडण्यासाठी एक गाइडलाइन जारी केली आहे.

WhatsApp च्या नव्या पॉलिसी नुसार काय आहेत अटी आणि शर्ती (Terms and conditions ) जाणून घेण्यासाठी येथे टच करा.

Whatsapp चे प्रायव्हसी संबधीचे नवीन नियम ८ फेब्रुवारी पासून लागू होणार आहेत. व्हॉट्सॲपच्या या घोषणेनंतर युजर्सची चिंता वाढली आहे. त्यामुळे ते सिग्नल आणि टेलिग्राम सारख्या मेसेजिंग ॲप्सकडे जाण्यासाठी तयार होत आहेत. 

Comparison Between - WhatsApp Vs Telegram  Vs Signal App.

Most Useful

व्हॉट्सअप तुमचा नंबर, कॅमेरा, साऊंड, चे access घेतो. तसेच जो कंटेंट तुम्ही अपलोड, सबमिट, स्टोर, सेंड किंवा रिसिव्ह करत आहात तो सुद्धा डाटा वापरतो. सिग्नल पर्सनल डेटा मागत नाही, केवळ तुमचा फोन नंबर स्टोर करतो. सिग्नलने डिसेंबर २०२० मध्ये आपले लेटेस्ट व्हर्जन सोबत एक ग्रुप कॉल लाँच केले आहे. सिग्नल पर्सनल डेटा म्हणून केवळ तुमचा फोन नंबर स्टोर करतो. तर टेलिग्राम तुमचे पर्सनल इन्फॉर्मेशन म्हणून कॉन्टॅक्ट इन्फो, कॉन्टॅक्ट्स आणि युजर आयडी मागतो.


ShaleyShikshan

Download Signal messenger app Touch Here.

असे वापरा Signal private messenger ॲप...


सिग्नल मेसेजिंग ॲपवर सर्वात आधी एक ग्रुप बनवा.

ग्रुप सेटिंग्सवर जा आणि ग्रुप लिंकवर टॅप करा.

ग्रुप लिंक क्रिएटसाठी टॉगल ऑन करा आणि शेयरवर टॅप करा.

यानंतर तुमच्या पंसतीच्या जुन्या मेसेंजर ॲपवर शेयर करा.

ग्रुप बनल्यानंतर हे करा

जे लोक या ग्रुपला जोडू इच्छितात ते लिंक शेयर करू शकतात.

या ग्रुपमध्ये नवीन मेंबर्सला अप्रूव्ह करण्यासाठी टॉगल ऑन-ऑफ करा. शेयर लिंक द्वारे नवीन मेंबर्सला यात रिक्वेस्ट येईल.

नवीन मेंबर्सला ॲड करण्याआधी तुम्हाला ग्रुप ॲडमिनकडून अप्रूव्हल घ्यावे लागेल.

हे ही वाचा.


Post a Comment

0 Comments

close