राष्ट्रीय खेळणी जत्रा 2021 निमित्त खेळ व खेळण्यांचे फोटो, व्हिडिओ व तपशील सादर करणेसाठी लिंक...
January 25, 2021
विविध खेळ व खेळणी तयार करण्याच्या माध्यमातून विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या कल्पकतेला आणि सृजनशीलतेला चालना देणे व ती सादर करण्याची संधी देणे या हेतूने आर्टस आणि अस्थेटिक्स विभाग, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांचेमार्फत देशातील पहिली राष्ट्रीय खेळणी जत्रा २०२१ National Toy Fair 2021 चे आयोजन ऑनलाईन पद्धतीने दि.27.02.2021ते 02.03.2021 या कालावधीमध्ये करण्यात येणार आहे.
शिक्षक आणि विद्यार्थी यांनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या खेळण्यांचे फोटो आणि व्हिडिओ यांच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर आभासी पद्धतीने होणाऱ्या जत्रेमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी याद्वारे मिळणार आहे. तसेच राज्यस्तरीय खेळणी / गेम निर्मिती स्पर्धेत निःशुल्क सहभाग घेता येईल.
राज्यस्तरीय खेळणी / गेम निर्मिती स्पर्धेत विद्यार्थी, शिक्षक व अधिकारी यांनी तयार केलेल्या प्रत्यक्ष खेळणी / डिजिटल ॲप्स यांचे फोटो, व्हिडिओ आणि तपशील सादरीकरणाची लिंक खालीलप्रमाणे आहे.
0 Comments