माहे ऑक्टोबर 2024 चे वेतन / निवृत्तीवेतन दिवाळी सणापूर्वी प्रदान करणेबाबत शासन निर्णय घेण्यात आला आहे.
वित्त विभागाच्या अधिनस्त संचालनालय लेखा व कोषागारे यांचेद्वारे प्रशासित करण्यात येत असलेल्या ट्रेझरीनेट, बीम्स, बील पोर्टल, सेवार्थ, ग्रास, निवृत्तिवेतनवाहिनी, कोषवाहिनी, अर्थवाहिनी, महाकोष, वेतनिका, IPLA, VPDAS, इत्यादी संगणक प्रणालींच्या संदर्भात मे. टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड यांचे मार्फत करण्यात येत असलेले Data Managed Hosting चे कामकाज महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ, मुंबई यांचेकडे हस्तांतरीत करण्याची कार्यवाही (Migration) सद्यस्थितीत सुरु आहे. हस्तांतरणाची (Migration ची) प्रक्रिया तांत्रिक स्वरुपाची असल्यामुळे अतिशय गुंतागुंतीची आहे. या प्रक्रियेचा अविभाज्य भाग म्हणून, माहे ऑक्टोबर, २०२४ च्या शेवटच्या सप्ताहामध्ये उपरोल्लेखित सर्व प्रणाली बंद ठेवणे (Down Time घेणे) अनिवार्य आहे.
संचालनालय, लेखा व कोषागारे यांचेद्वारे प्रशासित करण्यात येत असलेल्या सर्व संगणक प्रणालींच्या संदर्भात मे. टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड यांचेकडील Data Managed Hosting चे कामकाज महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ, मुंबई यांचेकडे हस्तांतरीत करण्याच्या कामकाजाच्या पार्श्वभूमीवर दि. ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी देय ठरणारे माहे ऑक्टोबर, २०२४ चे वेतन आणि निवृत्तिवेतन दि. २५ ऑक्टोबर, २०२४ पूर्वी अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
दिवाळी सणाची सुरुवात यावर्षी दि. २२ ऑक्टोबर २०२२ पासून होत आहे. राज्य शासकीय अधिकारी/ कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारक यांना दिवाळी सण साजरा करताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये याउद्देशाने माहे ऑक्टोबर २०२२ चे माहे नोव्हेंबर, २०२२ मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन दिवाळी सणापूर्वी प्रदान करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
२. शासन निर्णय २९.०८.२००५ मधील परिच्छेद १ (८) मधील तरतूद शिथील करुन माहे ऑक्टोबर २०२२ या महिन्याचे वेतन आणि निवृत्तीवेतनाचे प्रदान दि. २१ ऑक्टोबर २०२२ रोजी करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
३. यादृष्टीने मुंबई वित्तीय नियम १९५९ मधील नियम ७१ च्या तरतुदी तसेच महाराष्ट्र कोषागार नियम, १९६८ च्या खंड १ मधील नियम क्र. ३२८ मधील तरतुदी देखील शिथिल करण्यात येत आहेत.
४. वेतन देयकाचे प्रदान विहित कालावधीत होण्यासाठी सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी वेतन देयके त्वरीत कोषागारात सादर करावीत.
५. सदर तरतूदी जिल्हा परिषद, मान्यताप्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठे / अकृषी विद्यापीठे व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी/कर्मचारी, तसेच निवृतवेतनधारक यांना देखील लागू होतील...
६. संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी अधिदान व लेखा कार्यालय तसेच राज्यातील सर्व कोषागारे व उपकोषागारे यांना आवश्यक त्या सूचना तात्काळ निर्गमित करण्यात याव्यात याबाबत आदेशित करण्यात आले आहे.
दिवाळीपूर्वी वेतन निवृत्तीवेतन प्रदान करणेबाबत चे शासन परिपत्रक डाउनलोड करा. Click Here
0 Comments