Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

75 हजार पदभरतीच्या अनुषंगाने महत्त्वाच्या सूचना - शासन निर्णय 12 एप्रिल, 15 नोव्हेंबर, 31 ऑक्टोबर, 30 सप्टेंबर, 15 मे,

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात अंदाजे ७५ हजार सरळसेवा कोट्यातील पदे भरण्याचा शासनाचा मानस आहे. सदर पदे भरण्याचे उद्दिष्ट साध्य करणे शक्य व्हावे यासाठी केवळ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातील पदभरती करीता, ज्या प्रशासकीय विभागांनी वित्त विभागाच्या दि. ११.०२.२०१६ च्या शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे सुधारित आकृतीबंध अद्याप अंतिम मंजुर केलेले नाहीत, अशा विभाग / कार्यालयांतील पदे देखील भरतीसाठी उपलब्ध होण्याकरीता, वित्त विभागाच्या दि.३० सप्टेंबर २०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये विहीत केलेले पदभरतीबाबतचे निर्बंध शिथिल करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या अनुषंगाने शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.


8) जिल्हा परिषद पदभरती जाहीरात - Click Here

7) जिल्हा परिषद संवर्ग 'क' ची पदभरती संदर्भात मार्गदर्शक सूचना शासन निर्णय पहा. Click Here

वय, शैक्षणिक अर्हता
जाहिरात प्रसिद्ध करणेबाबत
गुणवत्ता यादी व निवड यादी
कागदपत्रे पडताळणी
पेसा क्षेत्र भरती
नियुक्ती आदेश
याबाबत सविस्तर माहिती साठी शासन निर्णय डाउनलोड करा. Click Here

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा सोडवा. लगेच प्रमाणपत्र प्राप्त करा. - Click Here


6) जिल्हा परिषद संवर्ग 'क' पदभरती अभ्यासक्रम व प्रश्नपत्रिका स्वरूप बाबत शासन निर्णय डाउनलोड करा. Click Here


5) 75 हजार पदभरती करणे संदर्भात मार्गदर्शक सूचना शासन परिपत्रक 12 एप्रिल 2023 अन्वये सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सूचना 

🔹नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत दोन वर्षे इतकी शिथिलता देण्यात आलेली आहे.
🔹सर्व जिल्हा परिषदांतील रिक्त पदांची बिंदुनामावली अंतिम करण्याचे काम पूर्ण झालेले आहे.
🔹सामान्य प्रशासन विभागाच्या दि. २१ नोव्हेंबर, २०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये दिलेल्या निर्देशानुसार परीक्षा टी. सी.एस./ आय.बी.पी.एस. या कंपन्यांद्वारे ऑनलाइन पद्धतीने घ्यावयाच्या आहेत.
🔹Application Portal विकसित करण्याचे काम आय.बी.पी.एस. कंपनी स्तरावर सुरु करण्यात आले. 
🔹आगामी परीक्षा घेण्याबाबत चा Action Plan असावा.

पदभरती संदर्भात शासन परिपत्रक 12 एप्रिल 2023 अन्वये सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सूचना परिपत्रक डाउनलोड करा - Click Here


4) 75 हजार पदभरती ला गती देणे व बिंदूनामावली तपासणी करणेबाबत परिपत्रक 25 नोव्हेंबर - Click Here

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश मंगळवारी मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. पदभरती संदर्भात १४ विभागांचे सादरीकरण करण्यात आले. रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया गतिमान करण्याच्या दृष्टीने मंत्रीमंडळाने १४ विभागांचा सखोल आढावा घेऊन सूचना दिल्या.

3) शासन निर्णय - 15 नोव्हेंबर 2022 येथे पहा. 

ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील सर्व संवर्गाच्या (वाहनचालक व गट-ड संवर्गातील पदे वगळून) पदभरतीबाबत खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.

१. ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील सर्व संवर्गाची (वाहनचालक व गट- ड संवर्गातील पदे वगळून) सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या ८०% मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. सदर मान्यता ही वित्त विभागाच्या निर्देशानुसार दि. १५ ऑगस्ट, २०२३ पर्यंत लागू राहील. त्यापुढील भरती प्रक्रिया वित्त विभागाच्या शासन निर्णय दि.३० सप्टेंबर, २०२२ नुसार सुधारित आकृतिबंध शासनाने मान्य केल्यावरच करता येईल.

२. जिल्हा परिषदांतील गट-क मधील सर्व संवर्गाची (वाहनचालक व गट-ड संवर्गातील पदे वगळून) रिक्त पदे संवर्गनिहाय आरक्षण नियमानुसार निश्चित करून जिल्हा परिषदांनी त्यांच्या स्तरावर जिल्हा निवड मंडळामार्फत भरण्याबाबत सुधारित कालबद्ध कार्यक्रम (परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक) निश्चित करण्यात येवून प्रपत्र- १ मध्ये जोडण्यात आले आहे. सदर कालबद्ध कार्यक्रमाचे सर्व जिल्हा परिषदांनी तंतोतंत पालन करावे. त्याकरिता रिक्त पदे (एकूण रिक्त पदांच्या ८०% मर्यादेपर्यंत), त्यांची आरक्षण निश्चिती, उमेदवारी अर्ज मागविणे, सदर परीक्षेच्या आयोजनासाठी कंपनी निवडणे (आवश्यक असल्यास), परीक्षा घेणे (ऑनलाइन/ऑफलाइन) इ. तदनुषंगिक परीक्षा घेण्यासंबंधीची सर्व जबाबदारी ही जिल्हा निवड मंडळाची व जिल्हा परिषदेची राहील.

२) शासन निर्णय - 31 ऑक्टोबर 2022 येथे पहा. 


शासन निर्णय दि.३०.०९.२०२२ च्या शासन निर्णयामधील पदभरतीवरील निर्बंधांमध्ये शिथिलता देऊन खालीलप्रमाणे पदभरतीस मान्यता देण्यात येत आहे. 

(अ) ज्या विभागांचा / कार्यालयांचा सुधारित आकृतीबंध अंतिम झालेला आहे, अशा विभाग / कार्यालयांतील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे १०० टक्के भरण्यास मुभा देण्यात येत आहे. 

(ब) ज्या विभाग / कार्यालयांचा सुधारित आकृतीबंध अद्याप अंतिम झालेला नाही, अशा विभाग / कार्यालयांतील गट-अ, गट-ब व गट-क मधील वाहनचालक व गट ड संवर्गातील पदे वगळून) सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या ८० टक्के मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरण्यास मुभा देण्यात येत आहे.
(क) वरील (अ) व (ब) प्रमाणे शिथीलता केवळ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातील पदभरतीसाठी दि. १५ ऑगस्ट, २०२३ पर्यंत लागू राहील. त्यापुढील भरती प्रक्रिया वित्त विभाग शासन निर्णय दि. ३० सप्टेंबर २०२२ अन्वये करण्यात येईल. 

(ड) दरम्यानच्या कालावधीमध्ये ज्या प्रशासकीय विभागांनी वित्त विभागाच्या दि. ११.०२.२०१६ च्या शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे सुधारित आकृतीबंध अद्याप अंतिम मंजुर केलेले नाहीत, त्या प्रशासकीय विभागांनी त्यांचाच त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयांतील पदांचा आढावा घेऊन उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने सुधारित आकृतीबंध अंतिम मंजुर करण्याची कार्यवाही तत्परतेने पूर्ण करावी.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय 2022 या वर्षातील सर्व शासन निर्णय - Click Here


1) शासन निर्णय - 30 सप्टेंबर 2022 येथे पहा. 

दि.१२.०४.२०२२ चा शासन निर्णय अधिक्रमित करून पदभरतीबाबत शासन निर्णय 30 सप्टेंबर 2022 नुसार खालीलप्रमाणे सुधारित सूचना देण्यात येत आहेत.

(१) ज्या प्रशासकीय विभागांनी वित्त विभागाच्या दि. ११.०२.२०१६ च्या शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे सुधारित आकृतीबंध अंतिम मंजुर केले आहेत. त्या प्रशासकीय विभागांना सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली पदे १०० टक्के भरण्यास मुभा देण्यात येत आहे.

(२) ज्या प्रशासकीय विभागांनी वित्त विभागाच्या दि. ११.०२.२०१६ च्या शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे सुधारित आकृतीबंध अंतिम मंजुर केले आहेत, त्या प्रशासकीय विभागांना सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता अन्य संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली पदे ५० टक्के भरण्यास अनुमती देण्यात येत आहे. या प्रमाणानुसार पदभरतीसाठी एकही पद उपलब्ध होत नसेल तर, किमान एक पद भरता येईल.

(३) कोविड - १९ च्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक उपाययोजनांतर्गत दि.०४.०५.२०२० चे निर्बंध लागू झाल्यानंतरच्या कालावधीत, मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने निर्माण केलेली पदे व अपर मुख्य सचिव (सेवा) सामान्य प्रशासन विभाग व प्रधान सचिव (व्यय), वित्त विभाग यांच्या उपसमितीने पदभरतीस मान्यता दिलेली रिक्त पदे १०० टक्के भरण्यास मुभा देण्यात येत आहे.


पदभरती शासन निर्णय 30 सप्टेंबर 2022 डाउनलोड करा. Click Here


शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय 2022 या वर्षातील सर्व शासन निर्णय - Click Here

Post a Comment

0 Comments

close