Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Google Search

Udise Plus 2022-23 PDF | UDISE+ School login | udiseplus.gov.in | U-dise plus 2022-23 Blank Form

UDISE Plus पोर्टल 2022-23 नोंदणी, ऑनलाइन लॉगिन, स्कूल रिपोर्ट कार्ड आणि डेटा एंट्री मॉड्यूल याबाबत अधिकृत वेबसाइट @udiseplus.gov.in वर माहिती प्राप्त करता येईल. 

यु-डायस प्लस प्रणालीमध्ये केंद्र शासनाकडून दोन टप्प्यामध्ये माहिती संकलित करण्यात येणार आहे. प्रथम टप्यामध्ये शाळेची सांख्यिकी माहिती (शाळेचे ठिकाण, व्यवस्थापन, माध्यम, इत्यादी) शाळा सुरक्षा, अनुदान व खर्च, व्यावसायिक प्रशिक्षण, भौतिक सुविधा, साहित्य उपक्रमे, संगणक आणि नाविन्यपूर्ण डिजीटल उपक्रम, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग इत्यादि माहिती संगणकीकृत करण्यात येणार आहे. याकरिता सर्व शाळांना तालुका स्तरावरून UsernamePassword उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

शिक्षक बदली 2022 नवीन अपडेट जाणून घ्या. - Click Here

दुसऱ्या टप्प्यामध्ये शाळांमधील विद्यार्थ्यांची तपशीलवार माहिती विद्यार्थ्यांचे नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, मोबाईल नंबर, घराचा पत्ता, वर्ग, जनरल रजिस्टर, नंबर, जन्म दिनांक, जात, BPL, दिव्यांगांचे प्रकार, शासनाकडून मोफत देण्यात येणाऱ्या सुविधा, व्यावसायिक शिक्षण संबंधित माहिती, शाळाबाह्य विद्यार्थ्यांची माहिती, आधार संबंधित माहिती, RTE प्रवेश, सहाय्यभूत सुविधा इ. यु-डायस प्लस सॉफ्टवेअरमध्ये शाळास्तरावरून अद्ययावत करण्यात येणार आहे.

UDISE+ 2022-23 माहिती भरण्यासाठी लिंक - Click Here


शाळेचे U-DISE Plus प्रपत्र ऑनलाईन भरण्याचे / नवीन शाळेला यु-डायस क्रमांक मिळण्यासाठी संकेतस्थळ 

http://udiseplus.gov.in


U-DISE Plus 2022-23 Login युनिफाईड जिल्हा शैक्षणिक माहिती प्रणाली (यु-डायस+) ऑनलाईन भरण्यासाठी लिंक Click Here

U-DISE plus प्रपत्रातील माहिती भरण्यासंदर्भातील सर्वसामान्य सूचना वाचा.


U-DISE plus 2022-23 कोरा फॉर्म PDF 2 (मराठी) डाउनलोड करा.- Click Here


U-DISE plus 2022-23 कोरा फॉर्म (इंग्रजी) डाउनलोड करा.- Click Here

U-DISE plus 2022-23 कोरा फॉर्म (इंग्रजी) डाउनलोड करा.- Click Here

Click Here

Join WhatsApp Group

https://chat.whatsapp.com/LnEYrqWCKOhFCwOrZjLxHU

भारत सरकारकडून राज्यातील सर्व मान्यता प्राप्त शाळांची माहिती यु-डायस प्लस प्रणालीमार्फत संगणकीकृत करण्याकरिता कळविले आहे. यु-डायस प्लस प्रणालीमधून प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे केंद्र शासनाकडून समग्र शिक्षा योजनेचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रकास, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, राज्यनिहाय शैक्षणिक निर्देशांक (PGI), National Achievement Survey (NAS), School Education Qulity Index (SEQI) निर्देशांकांची प्रभावीपणे अंमलबजावणी व नियंत्रण करण्याचे नियोजित केले आहे.

दि. १७ ऑक्टोबर २०२२ पासून यु-डायस प्रणालीमध्ये शाळांची माहिती संगणकीकृत करण्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय सूचना केंद्र, शालेय शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडून प्रणाली सुरू करण्यात आली आहे. सन २०२२-२३ चे यु-डायस प्रपत्राबाबत झालेले बद्दल याबाबत जिल्हा स्तरावरील संगणक प्रोग्रामर यांना दि. २० सप्टेंबर २०२२ रोजी आयोजित केलेल्या कार्यशाळेत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई कार्यालयामध्ये सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे.

U-dise Plus 2022-23 फॉर्म भरणे बाबत प्रशिक्षण

प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर जिल्हा स्तरावरील संगणक प्रोग्रामर यांनी यु डायस प्लस प्रणालीचे काम करण्याऱ्या अधिकारी यांनी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा आयोजित करून जिल्ह्यातील यु-डायस संबंधित काम करणारे संबंधित गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, Data entry operator, MIS Coordinator, सहा. कार्यक्रम अधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी, दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता काम करणारे अधिकारी, मोबाईल शिक्षक, इ. अधिकाऱ्यांचे एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करून प्रशिक्षण देण्यात यावे. सदरचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तालुकास्तरावर याचप्रमाणे तालुक्यातील शाळेच्या मुख्याध्यापकांना यु-डायस प्लस प्रणालीबाबत प्रशिक्षण देण्यात यावे. प्रशिक्षणामध्ये माहिती संकलनाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात यावे. सदरची माहिती भारत सरकार व राज्य सरकार विविध योजनांच्या अंमलबजावणासाठी करणार असल्याने सदरची माहिती अचूक असणे आवश्यक आहे.

U-dise Plus 2022-23 परिपत्रक डाउनलोड करा. Click Here

भारत सरकारकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार सर्वांना कळविण्यात येते, की सन २०२२-२३ या वर्षातील सर्व शाळांची माहिती दि. १० नोव्हेंबर, २०२२ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने संगणकीकृत करून अंतिम माहिती भारत सरकारला वेळेत सादर करण्याकरिता आपल्या स्तरावरून संबंधितांना आदेशित करावे. सन २०२३-२४ समग्र शिक्षा या योजनेचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक भारत सरकारला सादर करण्यात येणार आहे व याच माहितीच्या आधारे केंद्र शासनाकडून निधी मंजूर करण्यात येतो.

U-DISE प्रपत्रातील माहिती भरताना शाळा व केंद्र स्तरावर कोणती कार्यवाही करावी? पहा. 

U-DISE प्रपत्रातील माहिती भरताना तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर कोणती कार्यवाही करावी? पहा. 

Post a Comment

0 Comments

close